ही धार पहिलटकरीण ...

अप्पासाहेब's picture
अप्पासाहेब in जे न देखे रवी...
20 Sep 2007 - 12:17 pm

ही धार पहिलटकरीण , नाकास दर्प ओला
काल ठेविला तो 'ओपनर ' कुठे रे गेला

गलासात आज माझ्या ओतु नकोस सोडा
चखण्यात मात्र घाला कांदा अजुन थोडा

अंड्यास कोंबडीच्या सोली हलकेच आता
फर्साण शेवगाठी अन बोंबिल भेळ भत्ता

सलाम आन्टीला तो, जल्लाद फार्मुल्याला
घोट एकुलाच जिर्ता , आत्मा फरार जाला

नवटाक शेरभराची शीडात भरेल वारा
मी डोलतो असा हा, पाहीजे कुणां किनारा

(च्यामारी , आपल्याला बी जमतयां की )

कवितागझल

प्रतिक्रिया

गुंडोपंत's picture

20 Sep 2007 - 12:58 pm | गुंडोपंत

"घोट एकुला जिर्ता , आत्मा फरार जाला

नवटाक शेरभराची शीडात भरेल वारा
मी डोलतो असा हा, पाहीजे कुणां किनारा"

हे सही... खास आवडले!

आपला
गुंडोपंत

सहज's picture

20 Sep 2007 - 1:06 pm | सहज

च्यामारी , आपल्याला बी जमतयां की

विसोबा खेचर's picture

20 Sep 2007 - 1:21 pm | विसोबा खेचर

ही धार पहिलटकरीण , नाकास दर्प ओला
काल ठेविला तो 'ओपनर ' कुठे रे गेला

वा वा! पहिल्या धारेला 'पहिलटकरीण असं संबोधून अगदी कौटुंबिक माहोल निर्माण झाला आहे! :)

अरे आप्पा, तुझं किती कौतूक करू रे? प्रत्येक कडवं अगदी सुरेख जमलंय!

नवटाक शेरभराची शीडात भरेल वारा
मी डोलतो असा हा, पाहीजे कुणां किनारा

पाहिजे कुणा किनारा.. !

वा वा! क्या बात है..

आप्पा अजूनही लिही रे! सनातन डॉट कॉम वरून 'च्यामारी, तात्याच्या साईटवर ना? अश्याच गझला पडायच्या!' असे हिणकस शेरे कदाचित ऐकू येतील त्याकडे लक्ष देऊ नकोस..:)

लिही बिनधास्त तिच्यायला...

आपला,
(बाईबाटलीतला!) तात्या.

विसुनाना's picture

20 Sep 2007 - 2:52 pm | विसुनाना

तात्या, मिसळपाव तात्याचं आहे म्हणून तर त्याचा दर्जा चांगला हवा ना?
शेरे आले तरच शेर/गझल होणार ना उत्तम?

एकेक विनोदी, वेगळा शेर म्हणून ठीक आहेत वरच्या द्विपदी.
पण गझल/हजल जे काही असेल ते चांगल्या दर्जाचं हवं ना?
काही नियम तरी पाळायला पाहिजेत की नाही?

मिसळीत माशी पडलेली चालंल काय तुमास्नी?
का अप्पासाहेबांना शालजोडीतून देतायसा?

तात्या, मिसळपाव तात्याचं आहे म्हणून तर त्याचा दर्जा चांगला हवा ना?

पण गझल/हजल जे काही असेल ते चांगल्या दर्जाचं हवं ना?
काही नियम तरी पाळायला पाहिजेत की नाही?

अहो दर्जा, ष्टॅन्डर्ड वगैरेंसारख्या गोष्टी इतर संकेतस्थळांवर मुबलक प्रमाणात आहेतच की! आमची आपली अशीच एक लहानशी टपरी आहे ही! आणि मिसळपाव दर्जेदार आहे, ष्टॅन्डर्ड आहे असाही आमचा दावा नाही/ना आम्हाला असा दावा करायची इच्छा आहे! :)

पांथस्थ येतील, जरा आमच्या टपरीत विसावतील, मिसळ खातील आणि पुढे जातील. ज्यांना इकडची मिसळ आवडणार नाही, किंवा त्यात माशी वगैरे सापडेल ते पुन्हा येणार नाहीत आणि ज्यांना आवडेल, माशी वगैरे सापडणार नाही ते पुन्हा पुन्हा येत राहतील!

शिंपल!:))

आम्ही आपलं सगळ्यांना प्रेमाने, आपुलकीने बोलवायचं काम करतो अणि करत राहू!

तात्या.

जुना अभिजित's picture

20 Sep 2007 - 1:31 pm | जुना अभिजित

तुमच्या कवितेच्या वाचण्यानेच झिंग आली. भट्टी जमली आहे. नवसागर परफपरफेक्ट. गाडी येकदम यक्स्प्रेस सुटली आहे...

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित..(दोन घोट सोमरसाचे पण चालतील)

रंजन's picture

20 Sep 2007 - 6:30 pm | रंजन

आप्पासाहेब, जरा दमान डोला.. हॉटेलात डॉक्टर आहेत का हो?