खरंच मला बरंच काही करायचायं
आयुष्यातला प्रत्येक क्षण न क्षण तुझ्या साथीनी जगायचायं
हातात हात गुंफून तुझ्या प्रत्येक स्वप्न पहायचाय !!
अगणित चांदण्या मोजत रात्रभर जागायचाय
आणि वाळूत रेषा ओढत सुर्यास्त बघायचाय !!
प्रणयाला चंन्द्र साक्षीला हवा
सोबत तुझी उब आणि हवेतील गारवा !!
तुझ्या सोबतीनी मला गरुडा साऱखं उडायचाय
मला जाणणारं तुझं मन मात्रा आयुष्यभर जपायचाय
खरंच मला बरंच काही करायचायं !!
प्रतिक्रिया
24 Apr 2009 - 3:14 pm | सागर
अश्विनी ,
मस्त कविता आहे... :)
खरंतर प्रत्येकालाच आयुष्यात बरंच काही करायचं असतं
प्रत्येकाच्या मनातील गोष्ट तू नेमकी मोजक्या शब्दांत मांडली आहेस...
"मुक्तछंद" या प्रकारात अशा प्रकारच्या कविता फार सुंदर लिहिता येतात असे माझे मत होते
तुझ्या कवितेने माझ्या विचारांना मोठे बळ मिळाले एवढेच म्हणेन :)
अजून कविता येऊ देत..
(कविताप्रेमी) सागर
24 Apr 2009 - 3:16 pm | अनंता
चांगले भाव पण ...(देवकी पंडित स्टाईल) व्याकरणाकडे अजून लक्ष द्यायला हवे होते.
घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)
25 Apr 2009 - 8:51 am | क्रान्ति
मला जाणणारं तुझं मन मात्र आयुष्यभर जपायचंय.
अगदी खास!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
25 Apr 2009 - 11:46 am | अश्विनि३३७९
मी बरेच महीने मिपाची वाचक आहे . मी मिपा वर अ़क्षरशः रमते... मिपा वर फार मोठे साहित्यातले जाणकार आहेत हे मला माहीतेय ..पण एक सदस्य म्हणून केलेला हा पहिला वहिला प्रयत्न ...
25 Apr 2009 - 3:04 pm | विसोबा खेचर
अगणित चांदण्या मोजत रात्रभर जागायचाय
आणि वाळूत रेषा ओढत सुर्यास्त बघायचाय !!
साला, कॉलेजात होतो तेव्हा अशीच स्वप्न पाहायचो. पुढे केव्हातरी वरील काही स्वप्न खरीही ठरली. पण वास्तवात जे आयुष्य समोर येत गेलं, जे अनुभव घेतले/आले त्यानंतर आता या सार्या स्वप्नातला फोलपणा लक्षात येऊ लागला आहे!
वरील कविता म्हणजे छान वातानुकुलीत खोली! आम्हाला तिच्यायला रखरखत्या उन्हातच हिंडावं लागलं! :)
तात्या.
25 Apr 2009 - 7:06 pm | शितल
मस्त कविता.:)
कविता वाचुन असे आपण ही जगायचे आहे असे वाटते. :)
25 Apr 2009 - 7:07 pm | शितल
मस्त कविता.:)
कविता वाचुन असे आपण ही जगायचे आहे असे वाटते. :)
27 Apr 2009 - 11:23 am | अश्विनि३३७९
तुमची प्रतिक्रिया अपेक्षित होती तात्या!!
धन्यवाद !!
27 Apr 2009 - 11:24 am | अश्विनि३३७९
धन्यवाद शितल ..
27 Apr 2009 - 11:41 am | ऋषिकेश
कविता आवडली
ऋषिकेश