सहज एक विरंगुळा म्हणून आणि आज कालची मूलं कशी विचार करतात या साठी ही कविता ...कवितेची सुरवात मी करते तुम्हाला काही सुचते का ते सांगा... पूर्ण आपण करुयात...
रोज रोज तुला
गुलाबाचे फुल द्यायला
एक रुपाया भार पडतो
माझ्या खिशाला
रोज रोज भेळ -पुरी खायला
लाज नाही वाटत मनाला??
काय होत तुला
डबा घरुन आणायला???
रोज रोज फिरायला
रि़क्षा लागते तुला
थोडं फार चालताना काय
पाय लागतात दुखायला
दर महिन्याला
तुला ड्रेस द्यायला
काय बापाची
जहागीरी समजते मला??
-------------
-----------
-------
-----
प्रतिक्रिया
25 Apr 2009 - 8:23 am | भडकमकर मास्तर
आज काल मुले फार आगाउ झाली आहेत.
पूर्वी असे नव्हते .
पूर्वीची मुले फार चांगली आणि समंजस आणि आज्ञाधारक इ.इ. होती.
त्यांना पैशाची किंमत नाही.
सारखे अरबट चरबट खायला हवे.
कष्टाची सवय नाही.
पूर्वी मुले फार कष्ट करत असत.
कमवायची अक्कल नाही आणि सतत पैसे मागतात.
पूर्वी मुले स्वतः लहानपणापासून पैसे मिळवत असत.
त्यांना आई-वडिलांकडे पैसे मागायला लागत नसत.
ही तुमची भावना कवितेत फार छान व्यक्त झालेली आहे.
_____________________________
कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?