तुझेच नाव
स्वप्नांच्या ओठी
"तू"च निघे मोती
शब्दांच्या पोटी
निळ्या या नभात
भासे तुझे रूप
पृथ्वी सर्व वाटे
तुझेच स्वरूप!
दिसे फक्त तूच
नेत्री येई पाणी
ऐकू येते फक्त
नाव तुझे कानी
आरशात तूच
दिसते साकार
एकांतही घेतो
तुझाच आकार!
तळ्यात चंद्र
तुझेच बिंब
फुलांत तूच
दवाने चिंब
होउनी श्वास
जाई तू आत
स्पंदते नित्य
तू हृदयात
मंदिरी मूर्तीत
हसते तूच
कणीकणी माझ्या
वसते तूच!
प्रतिक्रिया
23 Apr 2009 - 9:51 am | मराठमोळा
भाग्यवान आहे ह्या कवितेतली प्रेयसी/देवता
सगळीकडे तुच तु.. छान...
आरशात तूच
दिसते साकार
एकांतही घेतो
तुझाच आकार!
तळ्यात चंद्र
तुझेच बिंब
फुलांत तूच
दवाने चिंब
आवडेश...
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
23 Apr 2009 - 11:37 am | उदय सप्रे
तू तुझ्यासारखीच आहेस , मी - जसा माझाहेतू
तुझे अस्तित्व तुझ्यासरखेच जाते उतू
तुला गर्व तुझ्या सौंदर्याचा , पण म्हणून नको तू मातू
तुझे सौंदर्य संपल्यावरही माझे प्रेम उरेल ....ही माझी हमी
लगे रहो उमेश साहेब !
23 Apr 2009 - 5:32 pm | उमेश कोठीकर
उदयजी,दंडवत.
23 Apr 2009 - 10:14 pm | क्रान्ति
छान कविता.
:)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com