लंडनमध्ये जर तुमचं कोणीच नसेल तर अशांसाठी Indian Y.M.C.A. (Young Men Christian Association)ही सर्वोत्तम जागा आहे.अत्यंत मध्यवर्ती ठिकाण(Central London) हीथ्रो वरुन पाच पाउंडात सरळ वोरेन स्ट्रीट स्टेशनला यायचं,रस्ता ओलांडला की आलच आपलं ठिकाण.रिसेप्शनला "आपला" भारतीय माणूस बसलेला असतो,आणि गांधीजींचा मोठ्ठा फोटो या मुळे विलायतेत पोहोचलोय यावर विश्वास बसत नाही.रिसेप्शनला हिंदीत बोलाल तर जरा भाषेची अडचण होते.अहो इंग्रजी मुळे नाही तर तामिळ मुळे.सगळा स्टाफ एकतर तमिळ किंवा मल्याळी.मी डोर्मिटरीचं बुकिंग केलं होतं.रुममध्ये गेल्यावर माझ्यासारखाच एक परिक्षार्थी भेटला,इतर तिघेसुद्धा भारतीय डाक्टर होते.चला,आयतेच मित्र मिळाले.जेवायला निघालो.वेळ ७ ते ८.३० फक्त.अनलिनिटेड जेवण,आपली चावी दाखवायची व्हेज/नोन.व्हेज डिश उचलायची,आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे पाहीजे तेवढा वरण भात!!!माणसाला लंडनमध्ये यापेक्षा अजून काय पाहीजे!पोटभरल्यावर आणि वातावरणाला जरा सरावल्यावर इकडे तिकडे बघू लागलो.सगळ्या आपल्या लोक्स मध्ये एखादा बिचारा गोरा /गोरी दिसायचे.थोडा कानोसा घेतल्यावर चक्क मराठी एकू यायला लागली.मुंबइचे काहीजण होते,एक पुण्याचा होता.लंडनच्या मधोमध एक भारतच वसवलाय.तिथला ७ दिवसांचा मुक्काम कधी संपला ते कळलंच नाही.बाहेर सोफ्यावर एक काका वाचत बसले होते,मला ते जरा मराठी वाटले.विचारलं तर ते एम.पी.चे निघाले.स्वतःचे होटेलचे बुकिंग क्यान्सल करून YMCAला आले होते.म्हणाले,I cannot compare the charm of this place to anything else.I had to come and stay here.तर मित्रांनो,लंडनला जाल तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या.A home away from home.
प्रतिक्रिया
22 Apr 2009 - 10:59 pm | अडाणि
अहो तिथे जाण्यासाठी अजून माहिती तर द्या... कुठे संकेतस्थळ आहे का ? बुकिंग कुठे करायचे? हि पण माहिती द्या ना...
-
अफाट जगातील एक अडाणि.
22 Apr 2009 - 11:18 pm | संदीप चित्रे
चांगल्या माहितीबद्दल धन्यवाद
23 Apr 2009 - 5:29 am | स्वामि
www.indianymca.org phone no. +44 20 73870411.तुम्ही इमेल पाठ्वू शकता अथवा फोनवर एका दिवसाचे पेसे देउन उर्वरीत रक्कम तेथे गेल्यावर देता येते.
23 Apr 2009 - 7:47 am | भडकमकर मास्तर
चांगला पण त्रोटक लेख आहे...
स्वामिभौ,
सविस्तर लिहिलेत तरी चालेल...
_____________________________
कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?