सत्कार्.....तेव्हढाही.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
22 Apr 2009 - 7:25 am

सत्कार .....तेव्हढाही .....

हाय् ! मी न उरलो , माझाच एव्हढाही
सलगीत कुंतलांच्या रहातोय केवडाही !

साथीस शब्द होते , होत्या भणंग गझला
सर्वस्व मी उधळले , ज्या हातें.....तोकडाही !

प्रेमातली उधारी बाकी तुझीच होती ;
झोळीस पेलला ना व्यवहार रोकडाही !

झालीस दूर जेंव्हा झिडकारुनी मला तू ,
ओठी न आला शिकवा ना शब्द वाकडाही !

माझ्याच आसवांची व्याप्ती मला कळेना
माझा मला नुरावा*अधिकार तेव्हढाही ? * नुरला : न उरला

पाहून मला वळताना तू दाबलास जो हुंदका ,
पचवीन मी स्वतःचा सत्कार तेव्हढाही ! सत्कार्.....सत्कार्.....स्..स्..स्.

गझलआस्वाद

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Apr 2009 - 7:28 am | llपुण्याचे पेशवेll

सुंदर गझल..
माझ्याच आसवांची व्याप्ती मला कळेना
माझा मला नुरावा*अधिकार तेव्हढाही

हे विषेश आवडले.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

चन्द्रशेखर गोखले's picture

22 Apr 2009 - 7:53 am | चन्द्रशेखर गोखले

एक सुंदर गझल वाचण्याचा आनंद मिळाला.

मदनबाण's picture

22 Apr 2009 - 9:52 am | मदनबाण

झालीस दूर जेंव्हा झिडकारुनी मला तू ,
ओठी न आला शिकवा ना शब्द वाकडाही !

व्वा.सुंदर... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.