वा काय फाउंड आहे! (खरं तर त्या मुलीनं काळा विनोद केल्याने ह्याला 'ग्रे हाउंड' असं म्हणणं जास्त योग्य आहे असं माझं वैयक्तिक मत! ;) )
अर्थात हा काळा विनोद होता की मुलीकडून अजाणतेपणाने घडलेली चू़क ह्याबद्दल कोणतीही वाच्यता न करता कवीने तो विचार वाचकांवरच सोपवलाय.
मुलीच्या हाकेला ओ देऊन कोणी प्रेमिक तिच्याकडे लगोलग जातो आणि ती नाही असे पाहून तो खट्टू होतो पण तरीही तिला चिठ्ठी लिहून ठेवण्याचा मोठेपणा तो दाखवतोय वा वा केवढ्या मोठ्या मनाचे लक्षण आहे. प्रेमात समर्पण भाव असावा तर असा.
जर्मनीत नुकत्याच सुरु झालेल्या वसंतऋतूने लिखाळांच्या काव्य प्रतिभेला नव्याने फुटलेल्या ह्या फाउंडच्या अंकुरातून अनेकानेक कवने प्रसवोत अश्या शुभेच्छा मी त्यांना देतोय!
(नमूद करावेसे वाटलेले - अशा प्रकारच्या फाउंडला जालिंदर महाशयांनी सुरुवात केलेली नव्हती असे मला पक्के आठवते आहे. अधिक माहितीसाठी भडकमकर मास्तरांच्या 'फाउंड, हाउंड आणि उंडारलेल्या कविता' ह्या काव्यसंग्रहाची दीर्घ प्रस्तावना वाचावी! ;) )
फार छान कविता...
इतक्या कमी ओळीत सामाजिक आशय व्यक्त करणे लिखाळभाऊंच्या समर्थ लेखणीलाच शक्य आहे.
या सशक्त कवितेचे सामाजिक परिमाण दर्शवणार्या काही शक्यता सुचल्या.
_____________
१.मुलीने मुलाचा पचका इ.इ. करण्यासाठी असे केले आहे आणि मुलाची एकांत-भेटीची ओढ अजमावून पाहण्यासाठी ती असे करत आहे
किंवा
२.तिलाही या मुलाला भेटण्याची तितकीच ओढ आहे परंतु ऐन वेळी अदिस अबाबाचे काका काकू आले आणि त्यांच्याबरोबर तुळशीबागेत किंवा लक्ष्मी रोडवर खरेदीला जायची बाबांची आज्ञा झाली ( बाबांनी फोनवरून आज्ञा केली.)... किंवा चिंचपोकळीची आजी आली आणि तिला भाजीराम मंदिरातल्या कीर्तनाला घेऊन जावं लागलं; तिने हे टाळण्याचा खूप प्रयत्न केला पण हाय रे दैवा, ते शक्य नाही झाले.....
गमतीची गोष्ट अशी की ही फाउंड कविता वाचून समस्त नागरिकांना ( मुलगा कविमनाचा ..चांगला) आणि मुलीने थट्टेखोर पणाने मुलाची प्रतारणा केली आहे, असेच वाटत आहे.... यात स्त्रियाही खूप..... यावरून आजकाल स्त्रियांचाही स्त्रियांवरचा विश्वास उडत चालला आहे , हे जालिंदरजींचे ( तेव्हा वादग्रस्त ठरलेले )वाक्य आजच्या समाजासाठी किती चपखलपणे लागू पडते हे दिसून येते.
____________________________________--
ही चिठ्ठी मुलीच्या खिडकीबाहेर कशी काय पडलेली होती...?अजून एक प्रश्न.
... ती चिठ्ठी दाराबाहेरच पडलेली असायला हवी होती.
किंवा तो मुलगा नेहमी खिडकीतून आत प्रवेश करत असावा, तिथे त्याला ही चिठ्ठी मिळाली आणि त्याने वैतागून ती तिथेच फेकली असावी.
किंवा पुढच्या एकांतातल्या भेटीत त्याने तिला ही चिठ्ठी दाखवून जाब विचारला आणि तिने "जाउदेत रे" असे खिदळत म्हणत आपले चांदण्यांचे हात त्याच्या गळ्यात टाकत ती चिठ्ठी खिडकीबाहेर फेकून दिली.
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
प्रतिक्रिया
21 Apr 2009 - 9:18 pm | शितल
केला.
=))
21 Apr 2009 - 9:33 pm | चतुरंग

चतुरंग
21 Apr 2009 - 10:25 pm | बेसनलाडू
रंगासेठ, आज एकदम श्टेपाउट् होऊन?!
(पंच)बेसनलाडू
लिखाळशेठ, फाउन्ड कविता आवडली. रंगाशेठच्या समीक्षेने चार चाँद लागले ;)
(अन् फाउन्ड्)बेसनलाडू
25 Apr 2009 - 11:23 pm | लिखाळ
वाहवा असे रसग्रहण पाहून आनंद झाला. फाउंड हाउंड आणि उंडारलेल्या कविता हा संग्रह वाचला नाही. आता वाचेन म्हणतो :)
-- लिखाळ.
21 Apr 2009 - 10:44 pm | उमेश कोठीकर
दुपारी
घरी कोणी नसेल
नक्की ये! म्हणालीस.
आलो होतो;उशीर झाला.
दुसर्याच मुलासोबत होतीस!
काय हे?
22 Apr 2009 - 7:15 am | llपुण्याचे पेशवेll
वा वा! लिखाळशेठ सुंदर कविता... :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
22 Apr 2009 - 7:16 am | विनायक प्रभू
छान फाउंड.
मी फुल्टू मधे ग्राउंड
22 Apr 2009 - 7:48 am | भडकमकर मास्तर
फार छान कविता...
इतक्या कमी ओळीत सामाजिक आशय व्यक्त करणे लिखाळभाऊंच्या समर्थ लेखणीलाच शक्य आहे.
या सशक्त कवितेचे सामाजिक परिमाण दर्शवणार्या काही शक्यता सुचल्या.
_____________
१.मुलीने मुलाचा पचका इ.इ. करण्यासाठी असे केले आहे आणि मुलाची एकांत-भेटीची ओढ अजमावून पाहण्यासाठी ती असे करत आहे
किंवा
२.तिलाही या मुलाला भेटण्याची तितकीच ओढ आहे परंतु ऐन वेळी अदिस अबाबाचे काका काकू आले आणि त्यांच्याबरोबर तुळशीबागेत किंवा लक्ष्मी रोडवर खरेदीला जायची बाबांची आज्ञा झाली ( बाबांनी फोनवरून आज्ञा केली.)... किंवा चिंचपोकळीची आजी आली आणि तिला भाजीराम मंदिरातल्या कीर्तनाला घेऊन जावं लागलं; तिने हे टाळण्याचा खूप प्रयत्न केला पण हाय रे दैवा, ते शक्य नाही झाले.....
गमतीची गोष्ट अशी की ही फाउंड कविता वाचून समस्त नागरिकांना ( मुलगा कविमनाचा ..चांगला) आणि मुलीने थट्टेखोर पणाने मुलाची प्रतारणा केली आहे, असेच वाटत आहे.... यात स्त्रियाही खूप..... यावरून आजकाल स्त्रियांचाही स्त्रियांवरचा विश्वास उडत चालला आहे , हे जालिंदरजींचे ( तेव्हा वादग्रस्त ठरलेले )वाक्य आजच्या समाजासाठी किती चपखलपणे लागू पडते हे दिसून येते.
____________________________________--
ही चिठ्ठी मुलीच्या खिडकीबाहेर कशी काय पडलेली होती...?अजून एक प्रश्न.
... ती चिठ्ठी दाराबाहेरच पडलेली असायला हवी होती.
किंवा तो मुलगा नेहमी खिडकीतून आत प्रवेश करत असावा, तिथे त्याला ही चिठ्ठी मिळाली आणि त्याने वैतागून ती तिथेच फेकली असावी.
किंवा पुढच्या एकांतातल्या भेटीत त्याने तिला ही चिठ्ठी दाखवून जाब विचारला आणि तिने "जाउदेत रे" असे खिदळत म्हणत आपले चांदण्यांचे हात त्याच्या गळ्यात टाकत ती चिठ्ठी खिडकीबाहेर फेकून दिली.
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
22 Apr 2009 - 7:53 am | दशानन
नतमस्तक तुम्हा सर्वांच्या समोर !
माझा साष्टांग नमस्कार घ्यावा व मला आपला शिष्य बणवावा ही विनंती ;)
थोडेसं नवीन !
25 Apr 2009 - 11:25 pm | लिखाळ
हा हा हा .. लै भारी.. मस्तच :)
खिडकीबाहेर चिट्ठी असण्याचे कारण चांगले शोधले आहे ;)
-- लिखाळ.
22 Apr 2009 - 9:40 am | विसोबा खेचर
सह्ही कविता भिडू...!
'आलो होतो' वरून 'हासत मी, काही श्वासांसाठी फक्त!' हे शब्द सहजच आठवले!
तात्या.
22 Apr 2009 - 9:46 am | मदनबाण
मस्तचं... :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
22 Apr 2009 - 10:25 am | राघव
मस्त कविता! :D
त्यात चतुरंगांनी भर टाकली आहेच!!
राघव
22 Apr 2009 - 1:46 pm | ऋषिकेश
कविता आणि दोन्हि समिक्षा आवडल्या :))
ऋषिकेश
25 Apr 2009 - 11:26 pm | लिखाळ
प्रतिसाद, रसग्रहण आणि समिक्षेबद्दल सर्वांचे आभार :)
-- लिखाळ.