गदीमांची क्षमा मागून 'रंगू बाजारला जाते' च स्वैर विडंबन
कोंबडी भुंकाया लागली भूंकू द्या
अंडी इकाया नेते इकू द्या
कोंबू डुलत डुलत चालते
गोऱ्या हातात लेखनी हालते
लेखन चोरावी एकदा वाटते, वाटते, वाटते, नको बा
जरा थांबून बोल ग कोंबू
(माझ्या डोस्क्यातल) तुझ्या डोक्यात कसं ग कोंबू ?
माजी कलेजी तुटते, तुटली तर , इकूया
कोंबू ओळख आहे मी कोण ?
माझ्या हातातला लेखण !
मी मनातल मनात ठेवते, ठेवते, ठेवते, ठेवु द्या
तुझा पाठलाग कोंबू करीन
अशी मुरडून कान मी धरीन
तुझं खानपट थोडं फोडते, फोडते, फोडु द्या
केली थट्टा अंगाशी आली
लाज कोंबूची माझ्या गेली
कोंबू थाटात कवन पाडते, चालते ? चालते तर , चालू द्या
चु भू द्या घ्या
प्रतिक्रिया
21 Apr 2009 - 7:34 pm | सँडी
कोंबडी भुंकाया लागली भूंकू द्या
=)) =)) हे आवडलं.
-सँडी
काय द्याचं बोला.