आज वेगळे भजन गाण्याचा बेत आहे.
स्टँड नव्हे स्टेशनवर भीक मागण्याचा बेत आहे.
भेटता मजला दानशुर नव्या वळणावरी ह्या
आज दोन्ही पायाने लंगडा होण्याचा बेत आहे.
संगे माझ्या कशाला इतर भिकार्यांनी फेर धरला
ही त्यांची चाल की हा जागेच्या भांडणाचा बेत आहे.
टाकली कटोर्यात जेव्हा लोकांनी जराशी जास्त नाणी
देव वदला, आज तुला पिझ्झा देण्याचा बेत आहे.
तु भेटलीस पुलाखाली की दोघे वडापाव खाऊ
की तुझा आज चायनीज खाण्याचा बेत आहे.
रोजच्यासम आज पोलिसा मी लाठी खाणार नाही
आज माझाही जरासा आराम करण्याचा बेत आहे.
आपला,
मराठमोळा
प्रतिक्रिया
20 Apr 2009 - 7:53 pm | प्राजु
बॉस! ये बात कुछ जमी नही!!
असो.. पु ले. शु.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Apr 2009 - 7:56 pm | सूहास (not verified)
"जवाब नही"
सुहास
आज मम्मीची खुप आठवण येत आहे...