जिकडे तिकडे अंधश्रद्धेचे थैमान,
कुणा अशुभ कुणा शुभाचे वरदान !
जळी स्थळी भिन्न त्याचे माप,
श्रद्धेवर अश्रद्धेने केलेला घात,
दुबळ्या मनावर घडलेला अपघात !
मांजर आडवे जाता कर्म बिघाड,
वाट पाहतात पिल्ले तिची रस्त्या पार !
घुबडाचे तोंड का असे अपशकून ?
पाहून नये का जग तिने जन्म घेऊन ?
टिटवीचे ओरडणे मारते कुणा,
तिलाही होतच असतील मरण यातना !
पापणीची फडफड धरी स्वतःवरच रोष,
देहाच्या त्रीदोषांपैकीच हा एक दोष !
आहे ना थोडी श्रद्धा विधात्यानेच सृष्टी निर्मिल्याची ?
जे घडते ते त्याच्याच इशार्यांनी
सारेच असे शुभ नसे कुणी अपशकूनी
श्रद्धेला नेऊन ठेवा उच्च स्थानी .
प्रतिक्रिया
20 Apr 2009 - 7:15 pm | क्रान्ति
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातलं अंतर कळायला हव. नेहमीसारखीच छान कविता, सहज, सोपी.
:)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
20 Apr 2009 - 7:44 pm | सूहास (not verified)
सुहास
आज मम्मीची खुप आठवण येत आहे...
20 Apr 2009 - 8:03 pm | प्राजु
श्रद्धा आणि आंधश्रद्धा यामध्ये एक पुसटशी सीमारेषा आहे. ती समजायला हवीच. नक्कीच!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Apr 2009 - 11:20 am | जागु
क्रांती, सुहास, प्राजू, तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
21 Apr 2009 - 4:19 pm | उदय सप्रे
एकदम मस्त !
जोर्का झटका धीरे से लगे.....सारखं , एकदम मस्तच , वादच नाही !
21 Apr 2009 - 4:40 pm | मदनबाण
छान कविता... :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.