संध्याखंत - २

आजानुकर्ण's picture
आजानुकर्ण in जे न देखे रवी...
4 Feb 2008 - 10:24 am

आमची प्रेरणा नंदनशेठ यांची अप्रतिम कविता झांज
हा अंगठा आमचे द्रोणाचार्य केशवसुमार यांच्या चरणी अर्पण.

(एकलव्य) आजानुकर्ण

आम्ही परतुनी आलो
झाली होती सांज
बल्ब लावूनी बसलो
सुरु जाहली खाज

नाही बिलगाया कोणी
मनात येती इच्छा
माडीवरती जाऊनी
करावयाची का पृच्छा

रंगीत बाटलीतूनी
वाहतील सोनेरी धारा
पेल्यात तरंगे जणू
जीव अमुचा सारा

रात्र येई गोकुळी
आम्ही करितो खंत
'साकी' दिसे ना कुठे
आता तुम्हीच ओता पंत

(ह. घ्या.)

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

4 Feb 2008 - 10:40 am | आनंदयात्री

'साकी' दिसे ना कुठे
आता तुम्हीच ओता पंत

हाण तिच्यायला ..........

बल्ब लावूनी बसलो
सुरु जाहली खाज

हे फारच मार्मिक :) .... तुमची प्रतिभा अशीच के.सु. सेठ बरोबर वाढत राहो... अन अशी उत्तमोत्तम हास्यकविता प्रसवत राहो.

विसोबा खेचर's picture

4 Feb 2008 - 10:44 am | विसोबा खेचर

वा कर्णा, मस्तच विडंबन केले आहेस. सगळी कडवी आवडली पण,

रात्र येई गोकुळी
आम्ही करितो खंत
'साकी' दिसे ना कुठे
आता तुम्हीच ओता पंत

हे जास्त आवडले...! :)

आपला,
(ग्लेनफिडिचप्रेमी) तात्या.

अवांतर - मिपावर आणिबाणी जाहीर झाल्यापासून इथे फारसा दिसत नव्हतास. आज तुझी विडंबनात्मक कविता इथे वाचली आणि आनंद वाटला. घरी परतलास याचे बरे वाटले! प्रियाली, विकास आणि सर्कीटचीही वाट पाहतो आहे!

असो! जे येतील ते आपले! परके असतील ते येणार नाहीत...! शिंपल..! :)

आपला,
(माणूसप्रेमी) तात्या.

नंदन's picture

4 Feb 2008 - 12:28 pm | नंदन

मस्तच विडंबन केले आहेस. सगळी कडवी आवडली पण,

रात्र येई गोकुळी
आम्ही करितो खंत
'साकी' दिसे ना कुठे
आता तुम्हीच ओता पंत

हे जास्त आवडले...! :)

-- असेच म्हणतो :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Feb 2008 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रियाली, विकास आणि सर्कीटचीही वाट पाहतो आहे!

तात्या,
वरील मंडळी इथे लिहितील हो !!! आम्हाला चिंता आहे ती आपल्या दोस्त खॉसाहेबांची, त्यांना आवाहान (आव्हान द्या ना ) करा ना ;)
असो! जे येतील ते आपले! परके असतील ते येणार नाहीत...! शिंपल..! :)
हा नियम खॉसाहेबांनाही लागू आहे का ? :)

खॉसाहेबाच्याही लेखनाचा पंखा
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्किट's picture

4 Feb 2008 - 11:20 pm | सर्किट (not verified)

अवांतर - मिपावर आणिबाणी जाहीर झाल्यापासून इथे फारसा दिसत नव्हतास. आज तुझी विडंबनात्मक कविता इथे वाचली आणि आनंद वाटला. घरी परतलास याचे बरे वाटले! प्रियाली, विकास आणि सर्कीटचीही वाट पाहतो आहे!

तात्या,

कार्यबाहुल्यामुळे गेले दोन महिने मिपाच काय इतर कुठेही लिहिणे झालेले नाही. (आमच्या आजोबांच्या भाषेत सांगायचे तर "सध्या पादायलाही फुरसत नाही.")

फेब्रुवारी महिनाही वाईटच दिसतोय.

मार्च एक पासून जरा शांतता येईल, आणि मग इतर काही करता येईल.

- सर्किट

प्रमोद देव's picture

4 Feb 2008 - 10:48 am | प्रमोद देव

कर्णा तू ही! कमाल केलीस बाबा! मस्तच केले आहेस विडंबन!
मजा आली. बाकी 'द्रोणाचार्य' सुमारांचा शिष्य शोभतोस!
पुलेशु!

जुना अभिजित's picture

4 Feb 2008 - 1:15 pm | जुना अभिजित

खल्लास एकदम..

'साकी' दिसे ना कुठे
आता तुम्हीच ओता पंत

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

केशवसुमार's picture

4 Feb 2008 - 4:39 pm | केशवसुमार

च्या मारी कर्णा,
संजोपरावांच्या आश्रमातून डायेक्ट आमच्या आश्रमात !!??!!??
असो आलाच आहेस तर स्वागत आहे.. ;)
'साकी' दिसे ना कुठे
आता तुम्हीच ओता पंत
- हे बाकी एकदम झकास..
उत्तरोत्तर अशीच प्रगती करत रहा..
(बाई, बाटली, बिडीत अडकू नकोस आमच्या सारखा)
तथास्तु..
(द्रोणाचार्य)केशवसुमार

'द्रोणाचार्य' .. (म्हणजे आता वानप्रस्थाश्रमाचा रस्ता धरायची वेळ झाली की काय?)
(विचारात पडलेला)केशवसुमार

अवांतर.. नंदनशेठच्या कवितेचे नाव चुकलास कीरे शिंच्या!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Feb 2008 - 6:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विडंबन मस्त जमलंय !!!

'साकी' दिसे ना कुठे
आता तुम्हीच ओता पंत

हाहाहा:))) लै भारी

सख्याहरि's picture

4 Feb 2008 - 8:29 pm | सख्याहरि

'साकी' दिसे ना कुठे
आता तुम्हीच ओता पंत
....
वा वा... कमाल केलीत!

ऋषिकेश's picture

4 Feb 2008 - 11:37 pm | ऋषिकेश

झकास विडंबन.. आणि शेवटच्या दोन ओळीतर भन्नाट :)

-ऋषिकेश

प्राजु's picture

5 Feb 2008 - 12:14 am | प्राजु

मस्त झालंय हे विडंबन.
तात्या, आता विडंबन संग्रहसुद्धा काढा.

- प्राजु

आजानुकर्ण's picture

5 Feb 2008 - 10:20 am | आजानुकर्ण

सर्वांना विडंबनाचा पहिला प्रयत्न आवडला हे आम्हालाही आवडले ;)

केशवसुमाराचार्य,
चूक झाल्याबद्दल क्षमस्व. शिष्याला क्षमा करा. चुकीचे प्रायश्चित्त म्हणून दुसर्‍या अंगठ्याचे नख सादर करत आहे. आधीचा अंगठा पोचला असेलच.

तात्या,
मराठी संकेतस्थळांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, आभासी यापैकी एक किंवा अधिक किंवा सर्व किंवा यापेक्षा वेगळा अशा प्रकारचा वाद न घालणे, वादास प्रोत्साहन न देणे किंवा वादामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग किंवा वादविवादास सहाय्य न करणे अशा प्रकारचे साधे सोपे धोरण अमलात आणण्याचा हेतू किंवा विचार किंवा योजना किंवा तिन्हीपैकी एक किंवा अधिक किंवा सर्व किंवा यापेक्षा वेगळे करण्याचा हेतू आहे.

(विडंबक) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

5 Feb 2008 - 10:28 am | विसोबा खेचर

मराठी संकेतस्थळांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, आभासी यापैकी एक किंवा अधिक किंवा सर्व किंवा यापेक्षा वेगळा अशा प्रकारचा वाद न घालणे, वादास प्रोत्साहन न देणे किंवा वादामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग किंवा वादविवादास सहाय्य न करणे अशा प्रकारचे साधे सोपे धोरण अमलात आणण्याचा हेतू किंवा विचार किंवा योजना किंवा तिन्हीपैकी एक किंवा अधिक किंवा सर्व किंवा यापेक्षा वेगळे करण्याचा हेतू आहे.

ठीक ठीक! आमच्या शुभेच्छा आहेत.. :)

तात्या.

बेसनलाडू's picture

5 Feb 2008 - 11:43 am | बेसनलाडू

शाबूत आहे ना कर्णा? कधीमधी दाखवायला बरे पडेल हो ;)
(अंगठाबहाद्दर)बेसनलाडू

आजानुकर्ण's picture

5 Feb 2008 - 8:27 pm | आजानुकर्ण

बेला,
मधले बोट हा.घ.तों.बो. करण्यासाठी वापरले आहे.

(मौनं सर्वार्थसाधनं) आजानुकर्ण

बेसनलाडू's picture

5 Feb 2008 - 11:39 pm | बेसनलाडू

उत्तम. गुणी बाळ :)
(मास्तर)बेसनलाडू