आजकाल अचानक पाऊस आल्यावर "द्रोणीय परिस्थिती" होती म्हणून अचानक पाऊस आला असे म्हणायची प्रथा आहे. पुर्वी हाच अचानक पाऊस "कमी दाबाचा" पट्टा असल्यामुळे पडे. हवामान लहरी असते म्हणून असे होत असावे.
तरीही एखाद्याला जर एखादा समारंभ उघड्या मैदानात, हिरवळीवर करायचा असेल तर, समारंभाचा रसभंग व आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून येथे तुम्हाला भारतातील कोणत्याही शहराचे हवामान होरा पाहता येईल.
शेतकऱ्यांना जर अशी माहिती मिळाली तर फार बरे होईल.
http://weather.nic.in/ येथे असलेल्या दुव्यांवर तुम्हाला वेगवेगळ्या उपग्रहांनी घेतलेले फोटो पहाता येतील.
ह्याही पुढे जाऊन जर तासातासाचे हवामान अंदाज पहायचे असतील तर येथे जा-
http://www.intellicast.com/Global/Satellite/Infrared.aspx?location=default
http://www.intellicast.com/Local/Weather.aspx?location=INXX0102
http://www.intellicast.com/Local/Hourly.aspx
प्रतिक्रिया
19 Apr 2009 - 6:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद ! चांगले दुवे.
बाय द वे, "कमी दाबाचा" पट्ट्यामुळे पाऊस झाला असे म्हणतात, पण द्रोणीय खर्रच माहित नव्हते...धन्यू !!!
19 Apr 2009 - 7:49 am | सुनील
धन्यवाद. बरीच प्रगती झाली दिसतेय हल्ली!
पूर्वी हवामानखात्याने भरपूर पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला की खुशाल छत्री घरी ठेऊन जावे, असे सांगत! :)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
23 Jul 2009 - 11:48 pm | अमृतांजन
आणखी एक चांगला दुवा मिळालाय-
http://www.imd.ernet.in/section/satmet/dynamic/insat.htm
ह्या इमेजेस रोज पाहील्या की वर्षाअखेर आपल्यालाही बर्यापैकी हवामान कळू शकेल.
24 Jul 2009 - 8:09 pm | नितिन थत्ते
द्रोणीय परिस्थिती आणि कमी दाबाचा पट्टा हे एकच असावे. शब्दांचे संस्कृतीकरण होताना असे होत असावे.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)