गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार
यावर्षीही तिथीप्रमाणे शिवजयंती सारातोव्ह्,रशियातील आमच्या होस्टेलमधे करण्याची ५ वर्षांची प्रथा आम्ही चालु ठेवली.१३मार्च२००९ रोजी संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात शिवरायांची आरती,त्यांचा संक्षिप्त जीवनक्रम,काही कविता,फत्तेखानाची पुरंदरवरची फजिती आणि शाहिस्तेखानावर हल्ला ही कथाकथने,एक भाषण्,'राजा शिवछत्रपती'चे 'इंद्रजीमी जंबपर' व 'हिंदवी राज्य हे आले' ही गाणी झाली. त्याचबरोबर सावळ्या तांडेलांची शिस्त आणि कान्होजी जेध्यांची निष्ठा यावर दोन छोटीसे नाट्यप्रसंग झाले.
माझे भाषण येथे पाहु शकता(हे अर्धेच भाषण आहे.मुख्य मुद्दे शुट झालेले नाहीत)
भाग १- http://www.youtube.com/watch?v=K6WvSeKM4ts
भाग२- http://www.youtube.com/watch?v=8KLjRJM-nck
गीत-हिंदवी राज्य हे आले रे आले
गायक्-विक्रांत ओव्हळ,लेखक्-शरद मोहरकर
मुळ गीत्-आनंदाच्या गावाला
http://www.youtube.com/watch?v=bhhR3UOpGc0
फोटो येथे बघु शकता-
http://picasaweb.google.ru/chinya1985/Shivjayanti2009#
प्रतिक्रिया
17 Apr 2009 - 6:20 am | विनायक प्रभू
भारी
17 Apr 2009 - 9:58 am | चिरोटा
मस्त.शिवरायांची ही कहाणी मद्वदेवांपर्यंत पोचावी ही इछ्छा. :)
क्ष्^न + य्^न = झ्^न
17 Apr 2009 - 1:07 pm | चिन्या१९८५
धन्यवाद विनायक प्रभु आणि भेंडी बाजार!!!!!!!
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
17 Apr 2009 - 1:18 pm | क्लिंटन
चिन्यासाहेब,
रशियात महाराजांची जयंती करायचा उपक्रम खूपच आवडला.ही कल्पना अमेरिकेत विद्यार्थी असताना मला का सुचली नाही कळत नाही. माझ्या तिकडील मित्रांना ही कल्पना सुचवतोच.त्यांना नक्कीच आवडेल.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
17 Apr 2009 - 1:24 pm | चिन्या१९८५
धन्यवाद क्लिंटन्.मागच्या वर्षीच्या शिवजयंतीचा सविस्तर वृत्तांत माझ्या ब्लॉगवर वाचु शकता
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
17 Apr 2009 - 3:13 pm | धमाल मुलगा
मस्त वाटलं वाचून.
चिन्याशेठ, गेल्या साली केलेला हा उपक्रम ह्यावर्षीही छान चालु ठेवलात, अभिनंदन. आनंद वाटला.
अवांतर: हल्ली आपला वावर फारच रोडावला चिन्या. बर्याच दिवसांत काही लिहिलं नाहीत शेठ.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
17 Apr 2009 - 6:44 pm | क्रान्ति
अतिशय लक्षणीय आणि स्तुत्य उपक्रम! सगळे दुवेही वाचले, पाहिले. खूप खूप आवडले. अशाच उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा.
=D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
17 Apr 2009 - 8:38 pm | चिन्या१९८५
धन्यवाद धमाल मुलगा आणि क्रांती!!!!
धमाल्,सध्या मी शेवटच्या वर्षाला आहे.त्यामुळे खुप अभ्यास आहे.आता मागच्या महिन्यातले शिवजयंतीचे भाषण जेमतेम अर्ध्या तासात तयार केले होते आणि त्याचा वृत्तांत टाकायला पण एक महिना लागला.तरीही पुढील आठवड्यात एखादा लेख टाकायचा प्रयत्न करतो.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/