--------------------------------
सार्यांशी दोस्ती आता सार्यांशी गट्टी,
खेळायचं खूप आता सुट्टीच सुट्टी.
खेळायचे घरी आता कॅरम आणि पत्ते
सार्या खेळात होईल माझीच फत्ते.
'अभ्यास करा,' अशी आता होणार नाही कटकट
टि.व्ही. बघताना कुणी करणार नाही वटवट
पाण्यात पोहायचं.रानोमाळ हिंडायचं.
पक्षांची गाणी ऐकत रहायचं.
खूप खूप फिरायचं.प्रवासाला जायचं
इतिहासातले गड किल्ले पाहून यायचं.
चित्रे बघायची.चित्रे काढायची.
टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवायची.
कधी-मधी कामात, आईला मदत सुध्दा करायची.
खाऊ मात्र रोज नवा, मागणी अशी हट्टाची.
अशी मज्जा, तश्शी मज्जा, मजेची सुट्टी.
खेळायचं खूप आता सुट्टीच सुट्टी.
कवयित्री - सौ .उज्ज्वला केळकर, सांगली
--------------------------------------------
अवश्य भेट द्या गंमत गाणी या ब्लॉगला
प्रतिक्रिया
15 Apr 2009 - 3:36 pm | आनंदयात्री
मस्त .. ती टिपिकल बालगीताची चाल आपोआप लागली वाचतांना. छान आहे बालगीत :)
15 Apr 2009 - 3:40 pm | पाषाणभेद
मस्त. उज्ज्वलाताईंचे अभिनंदन.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
15 Apr 2009 - 4:31 pm | मीनल
ब्लॉग छानच आहे.चित्रही मस्त आहेत.
मीनल.
15 Apr 2009 - 7:01 pm | क्रान्ति
बालगीत सुरेख आणि ब्लॉग तर लहानपणची आठवण करुन देणारा. मस्त!
=D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
15 Apr 2009 - 7:15 pm | लिखाळ
वा !! ब्लॉग आणि कविता छान आहेत :)
-- लिखाळ.