संसार, म्हणजे एक घर
थोड गुपितच ठेवावं
आरपार दिसू नये
म्हणून पडद्यांनी सजवावं
संसार, म्हणजे एक घर
भावनांना हळूवार टिपावं
अश्रूच्या धारांना
पागोळ्यांत साठवावं
संसार म्हणजे एक घर
प्रेमाच्या पायावर बांधावं
उन्हाच्या झळा साहण्यास
सोशिकतेच छप्पर असावं
संसार म्हणजे एक घर
काचेच्या खि़डक्यांचं असावं
तडा जाऊ नये
म्हणून विश्वासाच कुंपण असावं
संसार म्हणजे एक घर
प्राजक्ताने अंगणी फुलाव
टाकाऊ वस्तुंनाही
तडजोडीने सजवावं.
प्रतिक्रिया
15 Apr 2009 - 3:30 pm | उमेश कोठीकर
मस्त जागू.सुंदर.
संसार म्हणजे एक घर
नाव विश्वास असावं
छत असावे चांदणे
दार मायेचं असावं!
15 Apr 2009 - 3:23 pm | सूहास (not verified)
काय लिहु??
ईतक्या साध्या भाषेत कस काय लिहीता आपण ?
असाच एक प्रश्न पडतो..
सुहास
मिपादर्शनम सुखकारकम..
15 Apr 2009 - 4:35 pm | मीनल
छान आहे कविता.
मीनल.
15 Apr 2009 - 4:48 pm | दत्ता काळे
संसार, म्हणजे एक घर
भावनांना हळूवार टिपावं
अश्रूच्या धारांना
पागोळ्यांत साठवावं
- हे मला फार भावलं.
15 Apr 2009 - 5:34 pm | स्वाती राजेश
सोपी भाषा....
संसार, म्हणजे एक घर
भावनांना हळूवार टिपावं, अश्रूच्या धारांना पागोळ्यांत साठवावं
छानच आहे...
15 Apr 2009 - 6:58 pm | क्रान्ति
किती सहजपणे किती मोठ्या गोष्टी सांगितल्यास ग! खूप खूप भावली तुझी कविता मनाला.
:)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
15 Apr 2009 - 7:06 pm | सँडी
सहज आणि सुंदर.
-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
15 Apr 2009 - 7:08 pm | मराठमोळा
कविता आवडली :)
संसार म्हणजे एक घर
दोन जीवांचं स्वप्न असावं
संकटवादळे असंख्य तरी
एकमेकांचा आधार व्हावं
संसार म्हणजे एक घर
आनंदाचं आंगण असावं
भरभराटीचा वारसा अन्
सुखी लक्ष्मीने नांदावं
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
15 Apr 2009 - 9:02 pm | शितल
सुंदर कविता.
:)
15 Apr 2009 - 9:03 pm | मदनबाण
संसार म्हणजे एक घर
प्रेमाच्या पायावर बांधावं
उन्हाच्या झळा साहण्यास
सोशिकतेच छप्पर असावं
व्वा. सह्ह्ही. :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
15 Apr 2009 - 11:54 pm | प्राजु
संसार म्हणजे एक घर
काचेच्या खि़डक्यांचं असावं
तडा जाऊ नये
म्हणून विश्वासाच कुंपण असावं
क्या बात है! खूपच आवडली कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Apr 2009 - 11:55 am | जागु
उमेश, सुहास, मिनल, दत्ता, स्वाती, क्रांती, सँडी,मराठमोळा,शितल, मदनबाण्,प्राजू तुम्हा सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
17 Apr 2009 - 12:43 pm | सुचेता
अतिशय सुरेख कविता... भावली.
सुचेता