आज राहुलने मला घरी बोलावले आहे, त्याला माझ्या बरोबर काही तरी महत्वाचे बोलायचे, विचारायचे आहे.
मला कल्पना आली आहे, तो आज मला काय विचारेल, मी माझ्या मनाची तयारी करून ठेवली आहे.
साहिलने कार काढली आणि राहुलच्या घरी जायला निघाला, राहुलच्या घराकडे जाताना मध्ये एक सुंदर तलाव लागतो ५ मि. तेथे बसु आणि मग राहुलच्या घरी जाऊ असा विचार करून साहिलने कार तलावाच्या जवळ पार्क केली आणि कार मधुन उतरून तलावाच्या काठी एका शांत ठिकाणी येऊन बसला.
सुर्य मावळतीला चालला होता, आकाशात सुंदर रंगांची उधळण करीत तो दिनकर अस्ताला चालला होता ,त्याचे सुंदर प्रतिबंब पाण्यात पडले होते, साहिल त्या प्रतिबिंबाकडे एकटक पहात होता, त्याच्या मनातही अनेक चांगल्या -वाईट विचारांची उधळ्ण चालु होती.
"चिनार" राहुलची पत्नी, तिला जाऊन आज १५ दिवसच झाले होते. राहुल आणि साहिल दोघे मित्र, कित्येक वर्षाची मैत्री, साहिलची पत्नी राधिका. राधिका आणि चिनार एकाच कॊलेज मधील त्यामुळे दोन्ही फॆमिली मध्ये छान मैत्री झाली. प्तत्येक सण, घरगुती कार्यक्रमामध्ये एकमेकांची उपस्थितीही आवर्जुन असायची.
पण आज साहिलला राहुल समोर जायला, त्याच्या नजरेला नजर भिडुन तो विचारेल त्या प्रश्नांची खरी उत्तर द्यायला त्याला कितपत जमेल ह्या बद्दल खुद्द साहिलला ही शंका होती.
साहिलच्या डोळ्या समोरून चिनारचा चेहरा जाईना, चिनार जिचा चेहेरा डॊळ्या समोर आल्यावर त्याच्या अश्रुंचा बांध फुटला.
साहिल मनातल्या मनात स्वत:शीच संवाद साधत होता.
कोणत्या गोष्टीचा राग मनात घरून तु मला नाकारून त्या राहुलशी लग्न केलेस, मी का नाही ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र तु़झ्याकडुन अबोल राहिले.
राहुलशी लग्न करून तु मनापासुन सुखी राहणार नाहीस हे तुलाही माहित असुन मुद्दाम त्याच्याशी लग्न केलेस.
तुझ्या लग्ना नंतर वर्षभरात माझे ही लग्न जमले, आमच्या लग्नात तु माझ्या बायकोची मैत्रीण म्हणुन आलीस आणि माझ्या लग्नात माझे लक्ष बायको पेक्षा नकळत तुझ्याकडे जात होते, ते तु जाणलेस आणि हळुच तु तेथुन निसटलीस.
लग्न झाल्यावर माझी बायको राधिका आणि तुझी कॉलेज पासुन मैत्रीणी त्यात एकाच शहरात त्यामुळे तुझे आमच्या घरी आणि आमचे तुमच्या घरी येणे जाणे असायचे, तुझ्या नवरा मला ही ओळखत होता त्यामुळे आपले फॆमिली रिलेशन वाढले, पण जेव्हा जेव्हा आपण सर्व एकत्र तुझ्या वागण्यात माझ्या पासुनचा एक प्रकारचा अलिप्तपणा जाणवायचा मला. कदाचित तु स्वतःलाच माझ्यापासुन मुद्दाम दुर ठेवत असावीस.
तुला मनमोकळे हसताना, बोलताना मी लग्ना आधी पाहिले आहे, त्यामुळे लग्न झाल्या नंतर तुझ्यात आलेला अबोलपणा छळायचा मला. लग्ना नंतर दोन सेकंद जरी आपली नजरा नजर झाली तरी तु तुझी नजर फिरवायचीस . पण तुझ्या मनात माझ्या बद्दल असलेले प्रेम, काळजी तु़झ्या कृती मधुन कळुन जायची मला.
माझ्या पत्नी राधिकाकडे मी कधीही मुद्दाम तुझ्या बद्दल विचारायचो नाही, पण मन सदैव तुझ्या जवळ घुटमळायचे. तसे तिला नवरा म्हणुन मी काहीही कमी केले नाही. पण तिच्यावर मनापासुन प्रेम ही करू शकलो नाही.
आपल्या दोघांच्या नात्यात संशय घेण्या सारखे काहीच नव्हते. पण तरीही आज मला राहुलला उत्तर देणे भाग आहे.
१५ दिवसा पुर्वी तुला अचानक तुला हॊस्पीटल मध्ये दाखल केल्याचा फोन आला, शेवटची घटका मोजत होतीस, राधिकाला तर तु काही क्षणांची सोबती आहेस हे ऐकुन धक्का बसला होता. घर ते हॊस्पीटल हे अंतर खुप मोठे वाटु लागले, माझ्या मनाची अवस्था तर शब्दात आणि आश्रुत ही व्यक्त होण्या पलीकडे गेली होती. राधिका पळत पळत तुझ्या रूम मध्ये आली, मला तुझ्या रूमच्या दिशेने येताना पायातील सर्व बळ निघुन गेल्या सारखे वाटत होते, रूमच्या दारात मी उभा राहिलो, तु नजरेने मला आत येण्याची खुण केली, मी येऊन तुझ्या जवळ बसलो, तु ,तुझ्या हातात माझा हात घेऊन २० वर्षाने माझ्या नजरेत नजर मिळवुन काहीही न बोलता, गोड हसत समाधानाने प्राण सोडलास.
राहुलला आज त्याच बद्दल अनेक प्रश्न विचारायचे असणार ह्या गोष्टीची मला खात्री आहे.
पण त्याला काय माहित २० वर्ष माझे प्रेम त्याच्या छता खाली बंद होते.
प्रतिक्रिया
14 Apr 2009 - 6:32 am | प्राजु
लघुकथा आवडली .
वर्णनही सुंदर केलं आहेस.
प्रसंग डोळ्यापुढे उभे राहिले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Apr 2009 - 6:50 am | आनंदयात्री
असेच म्हणतो.
छानसी लघुकथा.
(पुढे वाढवता आली असती(?) )
14 Apr 2009 - 6:57 am | दशानन
खुप सुंदर !
14 Apr 2009 - 7:31 am | मदनबाण
हम्म्म...चांगल्या प्रेमात नेहमी लोचा का होतो हे अजुन न कळण्यासारखं आहे !!!
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
14 Apr 2009 - 3:35 pm | अनिल हटेला
सहमत !! :-(
लघुकथा आवडली !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
14 Apr 2009 - 9:48 am | मराठी_माणूस
राधीके वर आपण अन्याय केला आहे हे साहील च्या मनोगतात दिसायला हवे होते . २० वर्षे आपण राधीकेशी बेईमानी केली ह्याची कूठेच खंत दिसली नाही.
22 Apr 2009 - 6:08 am | नेत्रेश
साहीलने कधी राधीकेशी बेईमानी केली ?
14 Apr 2009 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कथा !
14 Apr 2009 - 11:24 am | अवलिया
क्या बात है !!!
मस्त कथा !!
--अवलिया
14 Apr 2009 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार
कथा आवडली.
काहि प्रश्न अनुत्तरीतच राहिलेत असे वाटत नाही का ? 'चिनारला' अशी काय अडचण होती की तिने राहुलशी लग्न केले ?
चिनार हे नाव आहे मस्त पण ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
14 Apr 2009 - 2:18 pm | क्रान्ति
पराशी सहमत.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
14 Apr 2009 - 3:15 pm | वाहीदा
पण त्याला काय माहित २० वर्ष माझे प्रेम त्याच्या छता खाली बंद होते.
शेवट ची ओळ आवडली
कित्ती छान लिहीले आहेस ग ...खुप दिवसा नंतर छान वाचायला मिळाले
~ वाहीदा
14 Apr 2009 - 8:24 pm | भाग्यश्री
ए छान लिहीलंयस.. :)
14 Apr 2009 - 8:47 pm | शितल
सर्व वाचकांचे सर्वांचे मनापासुन आभार. :)
14 Apr 2009 - 8:47 pm | रेवती
कथा छानच आहे.
दुर्दैवी कथेमुळे जरा कसेतरीच वाटले.
रेवती
14 Apr 2009 - 11:07 pm | समिधा
कथा मस्तच लिहीली आहेस,आवडली.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
14 Apr 2009 - 11:10 pm | चकली
कथा आवडली.
चकली
http://chakali.blogspot.com
15 Apr 2009 - 12:58 pm | शाल्मली
लघुकथा आवडली.
--शाल्मली.
15 Apr 2009 - 1:55 pm | यशोधरा
छान लिहिले आहेस शीतल :)
15 Apr 2009 - 2:34 pm | अमोल केळकर
कथा मस्त
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे पहा
15 Apr 2009 - 2:37 pm | भडकमकर मास्तर
छान गोष्ट :
अधिक स्पष्टीकरण आवडलं असतं...
अवांतर : चिनार वृक्ष असतो ...म्हणून ते पुरुषाचं नाव असायला हवं असं थोडंच आहे?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Apr 2009 - 6:18 pm | स्वाती राजेश
लघुकथा आवडली....
वर्णन सुद्धा छान, डोळ्यासमोर चित्र उभे राहते.
15 Jun 2016 - 5:20 pm | मराठी कथालेखक
छान कथा...
15 Jun 2016 - 10:26 pm | रातराणी
कथा आवडली.
17 Jun 2016 - 3:27 pm | विदिश सोमण
छान कथा! आवडली आणि मनाला भिडली.