अमावस्येचा बघतो तुझा चंद्र कधीचा
अंधारले नयन दर्शना घाबरले
का डांबर सदा बरसले तुजवरी
बरसताना बरे मला ते विसरले ;)
अगडबंब देह काळवंडलेली काया तुझी
वाटेवरुन तुझ्या रेडेही मागे सरकले
घाबरले तुज पाहता भुत पिशाच्च आणी हडळी
येता तु गल्लीमधले माझ्या श्वानही टरकले
जळफळली कढई, सखे तुज पाहता
गोंजारता गाल तुझे बघ माझे हातही करपले
आपला,
मराठमोळा.
प्रतिक्रिया
13 Apr 2009 - 7:22 pm | सूहास (not verified)
वाटेवरुन तुझ्या रेडेही मागे सरकले
लई हसलो...
सुहास
" जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..