फस्क्लास भेळ !!

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
2 Feb 2008 - 10:29 pm

कल्याण भेळ, बिबवेवाडी-को॑ढवा रोड (पुणे) येथे अतिशय सुरेख भेळ मिळते, ती खाल्ल्यावर तिथलेच 'पान्-पट्टी' आईसक्रीमसुद्धा खावे, म्हणजे जिवास बरे वाटते.
अनामिका भेळ, नारायण पेठ सुद्धा मस्त असते..

मौजमजाआस्वाद

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

2 Feb 2008 - 10:34 pm | इनोबा म्हणे

प्रसादराव,
लॉ कॉलेज जवळच्या कॅनॉल रोडवर गणेश भेळवाला आहे,तिथे एकदा भेट देऊन बघा.काय मस्त भेळ आहे!

(पक्का पुणेरी)-इनोबा

डॉ.प्रसाद दाढे's picture

2 Feb 2008 - 10:36 pm | डॉ.प्रसाद दाढे

हो हो..तीही मी खाल्लीय!! सॉलीड आहे..!

केशवसुमार's picture

2 Feb 2008 - 10:40 pm | केशवसुमार

कल्पना

प्राजु's picture

2 Feb 2008 - 10:43 pm | प्राजु

आमच्या कोल्हापूरच्या राजाभाऊची भेळ खाऊन पहा...
या सगळ्या भेळी विसरून जाल..

- (राजाभाऊ भेळप्रेमी)प्राजु

रम्या's picture

4 Feb 2008 - 2:54 pm | रम्या

अगदी बरोबर प्राजु,
मी राजाभाऊंची भेळ एकदाच खल्ली आहे. पण खाताक्षणीच तिच्या प्रेमात पडलो आहे.
या भेळीसाठी कांदा कापणार्‍या माणसा समोर मोबाईल स्टॉपवॉच सुरू केला.
पठ्ट्याने १५ सेकंदात एक पुर्ण कांदा बारीक कापला!!
रम्या

झकासराव's picture

6 Feb 2008 - 7:43 am | झकासराव

प्राजु आणि रम्या!
सहीच रे.
राजाभाउ भेळ बेष्टच.
रंकाळ्याला गेला की सगळ्या गाड्यांवर राजाभाउ लिहिलेल आहे. मी एकाला विचारल तर तो फक्त हसला होता. :)
चव मात्र चांगलीच होती. (कोल्हापुरात भेळ वाला मराठीच असतो)
आणि आता इथे पुण्यात मात्र भैयाने बनवलेली भेळ खाववत नाही. :(
मी आताशा भेळ खाण बंदच केलय पुण्यात.
हा गणेश भेळेच नाव फार ऐकल आहे. त्यांच्या पुण्यात १७ शाखा आहेत अस वाचलय मी.
तिकडे एकदा खावुन बघाव म्हणतो :)

विसोबा खेचर's picture

2 Feb 2008 - 11:28 pm | विसोबा खेचर

भेळ आमच्या मुंबईच्या विठ्ठलची. व्ही टी स्थानकाजवळ!

असो,

दाढेसाहेब, तुम्ही मिपावर उत्तम मिसळ, भेळ मिळणार्‍या ठिकाणांचे संकलन करण्याचे हे जे काही सत्र आरंभले आहे ते अत्यंत स्तूत्य आहे...! :)

उतम मिसळ मिळणार्‍या ठिकाणांच्या संकलनासोबतच उत्तम भेळ मिळणार्‍या ठिकाणांचेही संकलन आता होऊ द्या!

आपला,
(आवडत्या स्त्रीसोबत निवांत अश्या समुद्र किनारी मावळतीचे रंग पाहात पाहात भेळेची मजा लुटणारा!) तात्या.

डॉ.प्रसाद दाढे's picture

3 Feb 2008 - 10:55 am | डॉ.प्रसाद दाढे

फार पूर्वी फडके रोड, डो॑बिवली येथे 'रसना' नावाचे हॉटेल होते, तेथे भेळ फार झकास मिळत असे..पण ते दुकान (का कुणास ठाऊक?) ब॑द पडले आणि जिवास चुट्पुट लावून गेले..
पुणे- ब॑गळूर महामार्गावर खेड्-शिवापूर येथे 'वनपत्रे ब॑धू' या॑ची छान सुकी भेळ मिळते. वाटेत था॑बून ती सोबत बा॑धून घ्यावी आणि भेळीच्या फक्क्या मारत पुढील ड्रायव्ही॑ग करावे..

संजय अभ्यंकर's picture

3 Feb 2008 - 11:04 am | संजय अभ्यंकर

१) सिक्कानगर - गिरगांव

२)ढोले पाटिल रोड.. पुणे

३) सुखसागर - मुंबई आणि बँगलोर

४) क्लेअर रोड - नागपाडा

५) बाभई नाका - बोरिवली (मंगेश वडापाव वाल्या समोर)

तसेच दक्षिण-मध्य मुंबईत डोक्यावर टोपलि घेउन प्रत्येक चाळीत फिरणारे भय्ये सुद्धा चांगलि भेळ बनवतात.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे's picture

3 Feb 2008 - 1:50 pm | डॉ.प्रसाद दाढे

१५-१६ वर्षा॑पूर्वी सारसबागेबाहेरसुद्धा भेळ चा॑गली मिळत असे..आता माहीत नाही, खूप दिवसात खाल्ली नाही..
पुण्यात चा॑गले व रसाळ 'राय्-आवळे' हमखास कुठे मिळतात हो? मी खूप शोधतो आहे..मीठ मसाला लावलेले चन्या-मन्या बोरे, राय आवळे हे कॉम्बिनेशन म्हणजे लहानपणात परत गेल्या सारखे वाटते..शाळेतून परत घरी येताना (कि॑वा शाळा बुडवून पिक्चर पाहताना) खाण्याचा खाऊ असायचा तो..

पिवळा डांबिस's picture

3 Feb 2008 - 11:55 pm | पिवळा डांबिस

मंडईत, मंडईच्या बाहेर रस्त्यावर बसलेल्या भाजीवाल्यांपाशी मिळतात. पण ते सिझनल आहेत, वर्षभर कधीही असे मिळत नाहीत. मला वाटतं नवरात्रीनंतर येतात, तरी मंडईतल्या भाजीवाल्यांनाच विचारून खात्री करावी.
(खट्टामीठा) पिवळा डांबिस

स्वाती राजेश's picture

3 Feb 2008 - 4:35 pm | स्वाती राजेश

आमच्या कोल्हापूरच्या राजाभाऊची भेळ खाऊन पहा...
जशी झणझणीत मिसळ प्रसिद्ध तशीच चमचमीत भे़ळ...

चतुरंग's picture

4 Feb 2008 - 7:37 pm | चतुरंग

सरदवाडीला सुकी भेळ (तिथे भेळभत्ता असा शब्द आहे) फार छान मिळते.

नगरला लालटाकी जवळ (हा रस्ता पुढे शिर्डी कडे जातो) "अंबिका" भेळ - केवळ सुंदर! (चुकून "जगदंबा" असे लिहिले होते -आमच्या सौं.नी लगेच दुरुस्त केले!)
त्याच्याकडची पाणी-पुरी सुद्धा हाय हाय..!

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Feb 2008 - 11:08 pm | llपुण्याचे पेशवेll

पूर्वी शुक्रवार पेठेत काळ्या हौकाकडून बुरुड आळी कडे जाताना लागणार्‍या गल्ली मधे एक सोमणी नावाचे वृद्ध गृहस्थ भेळेचे दुकान चालवायचे ती भेळ मला फार आवडायची....
डॉक्टरसाहेब याबद्दल आपल्याला काही माहीती आहे का? बरेच दिवसात त्या बाजूला गेलो नाही.
पुण्याचे पेशवे

डॉ.प्रसाद दाढे's picture

4 Feb 2008 - 8:05 am | डॉ.प्रसाद दाढे

क्षमस्व, मला ते ठिकाण माहित नाही..

शिवाजीनगर स्टेशन : झटका भेळ ....

निगडी : जय महाराष्ट्र भेळ ....

अतिशय फर्मास व कमीत कमी २ प्लेटा हाणल्याशिवाय जिभेची आग शांत होत नाही ....

ता.क.: आम्ही भेळ खल्ल्या नंतर त्यावर "चहा आणि सिगारेट " याला पहिली पसंती देतो .........

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Feb 2008 - 7:10 pm | ब्रिटिश टिंग्या

१ नंबर असते ही भेळ.....पहिलाच घास खाल्ल्यावर जोरदार शॉट बसतो.....
आणि संपुर्ण भेळ खाइस्तोपर्यंत तर नाकातोंडातून वाफा येवू लागतात.......
बाकी नाजूक लोकांनी या वाटेला न गेलेलेच बरे.......त्यांसाठी टिळक रोड वरील 'कल्पना' बरी. (ही भेळ साजूक तुपात बनवतात म्हणे)

तसेच माझ्या लहानपणी अप्पा बळवंत चौकात नुमवि जवळ आणि चितळेबंधूंच्या जवळ मस्त भेळ मिळायची.......त्याचं नाव आता आठवत नाही.....

- छोटी टिंगी

केशवसुमार's picture

4 Feb 2008 - 7:38 pm | केशवसुमार

बाकी नाजूक लोकांनी या वाटेला न गेलेलेच बरे.......त्यांसाठी टिळक रोड वरील 'कल्पना' बरी. (ही भेळ साजूक तुपात बनवतात म्हणे)
ह. ह.पु.वा..
चित्तोपंतांनी आम्हाला स्वारगेट ते फडके हाऊद दरमान कुठेतरी एका गाड्यावर अप्रतिम मटकी भेळ खायला घातली होती. खूपच भन्नाट होती ती भेळ (एक सुचना: हातगाडी आणि बनवणार्‍या माणसाला न बघता ही भेळ खावी लागते..)

रम्या's picture

4 Feb 2008 - 3:01 pm | रम्या

'झणझणीत' या शब्दाचा अर्थ कळाला तो जळगाव स्टेशन बाहेरच्या हॉटेलात मिसळ खाताना. मी कोल्हापूरचा असूनही मिसळ खाताना तोंडाला घाम फुटला.
पण खाताना खूप मजा आली.
(तिखट प्रेमी)

सख्याहरि's picture

4 Feb 2008 - 8:18 pm | सख्याहरि

संभा ची भेळ खावा ...सांगली मधे...
आम्रुतातेहि पैजा जिंके...
स्वर्गीय अनुभव...

इथल्या जर्मन लोकन्ची कीव येते... त्यंना चव कशाशी खातात तेच माहित नहि. आपन किति नशीबवान आहोत.. आपल्या कडे खाण्याचा केवढा मोठा वारसा आहे!!!
मराठी,पंजाबी , गुजराती, दक्षिणात्य... कित्ती खाऊ काय खाऊ...

-सख्याहरि
भेळ पुराण ऐकुन.. भुकेने व्याकूळ....परदेशस्थ भारतीय

भाग्यश्री's picture

6 Feb 2008 - 5:44 am | भाग्यश्री

पुष्करीणी भेळ , लक्ष्मी रोड...
गणेश भेळ !! - कर्नाटक हायस्कुल वरून अलंकार पोलीस चौकीच्या दिशेनी गेले की लागते.. अफलातून भेळ, पाणीपुरी!!
यांच्या शाखा पण आहेत, अर्थात पुण्यात "गणेश भेळ" चिक्कार असल्याने ट्रेडमार्क पाहूनच जावे.. :)

डॉ.प्रसाद दाढे's picture

6 Feb 2008 - 8:55 am | डॉ.प्रसाद दाढे

ब॑डगार्डन जवळ एक मस्त भेळ मिळते, तीच ही गणेश भेळ आहे काय?

पिस्तुल्या's picture

17 Apr 2008 - 11:26 pm | पिस्तुल्या

आमच्या बाणेरमधली भेळ खाऊन बघा तो॑डाला पाणी सुटेल नाही सुटले तर नका खाऊ.

रास्तापेठेतली अपोलो जवळची इन्टरव्हल भेळ. यात चना जोर गरम वर जोर असतो.

शितल's picture

18 Apr 2008 - 7:09 pm | शितल

>>>कल्याण भेळ, बिबवेवाडी-को॑ढवा रोड (पुणे) येथे अतिशय सुरेख भेळ मिळते, ती खाल्ल्यावर तिथलेच 'पान्-पट्टी' आईसक्रीमसुद्धा खावे, म्हणजे जिवास बरे वाटते.

अहो पुण्यातील आमच्या घराला लागुन म्हणजे एका मिनिटावर कल्याण भेळ आहे, आ.हा.. हा... सर्वा॑नी ती खाऊनच पाहिली पाहिजे. (मला जाहिरातीसाठी काही कल्याण भेळवाला भेळ खाऊ घालणार नाही आहे )
कोल्हापुरच्या राजा भाऊची ही छान , पण कल्याण भेळ ही अप्रतिमच !

मदनबाण's picture

19 Apr 2008 - 7:06 pm | मदनबाण

कोल्हापुरी भेळ (भडंग घातलेली )तर एकदम जबरदस्त लागते,,,,,(त्यात कैर्‍यांचे छोटे छोटे तुकडे झकास लागतात)
रंकाळ्यावर मिळणारी ही भेळ मस्तच.....
आणि आत्ताच चोरगे,,,,,मोहन्,,,,,आणि फडतरें ची मिसळी ला चापुन आलो आहे....

(भेळ व मिसळप्रेमी)