*जालिंदर जलालाबादी :- आरती महास्पर्धा*

बाकरवडी's picture
बाकरवडी in जे न देखे रवी...
11 Apr 2009 - 8:06 pm

*जालिंदर जलालाबादी :- आरती महास्पर्धा*

आजकाल जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, अंतर्जाली, मनोमनी (आणि मिसळपाव वर)सगळीकडे जालिंदर बाबा यांची चर्चा चालू आहे.

याकाळात लोकांना आलेले अनुभव आणि वाढत जाणारी भक्तसंख्या आपण सर्व जाणताच !

त्यामुळे आम्ही जालिंदर जलालाबादी बाबा यांची आरती लिहीण्याची स्पर्धा जाहीर करत आहे.

तरी सर्व कवींनी , विडंबनकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. ही स्पर्धा १५ एप्रिल २००९, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहील, तरी इच्छुकांनी आपली आरती (जालिंदर जलालाबादी यांची) येथे मुदतीपूर्वी प्रकाशित करावी

लगेचच म्हण्जे १६ एप्रिलला निकाल जाहीर करण्यात येईल व ३ उत्तम अशा आरत्यांना विजयी घोषित करण्यात येइल.

प्रथम क्रमांक : जालिंदर जलालाबादी बाबा यांचा फोटो असलेली फोटोफ्रेम.

द्वितीय क्रमांक :बाबांचा फोटो असलेले लॉकेट.

तृतीय क्रमांक :जालिंदर जलालाबादी बाबांचा फोटो असलेले पेन.

आणि विजेत्यांना आमच्या खव मधे आठवडाभर (जालिंदर जलालाबादी बाबा सप्ताह), त्यांनी लिहीलेल्या आरती सकट स्थान देण्यात येईल.

तसेच, सर्व सहभागींना 'अंगारा' व 'तीर्थ' !

चला तर मग सर्व भक्तगणांनो लिहीण्यास सुरुवात करा.
जालिंदर बाबा की जय ! जालिंदर बाबांचा विजय असो !

( अवांतर पण महत्वाचे :- स्पर्धेला नियम व अटी लागू. परीक्षकांचा (माझा) निर्णय अंतिम राहील.
सर्व पारीतोषिकांचे प्रायोजक आपले सुप्रसिद्ध मिपाकर आणि जलालाबादी बाबांचे परम भक्त 'खराटा' हे
आहेत.खराटा यांच्या पूजनीय 'साहित्य भांडार' मधून बक्षिसे देण्यात येतील. http://misalpav.com/node/7190 )

मौजमजाप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

11 Apr 2009 - 8:44 pm | नितिन थत्ते

मी प्रायोजक आहे म्हटल्यावर मला स्पर्धेत भाग घेता येणार नाही. एका चांगल्या आरतीला मिपाकर मुकणार.

खराटा
(रंग माझा वेगळा)

बाकरवडी's picture

12 Apr 2009 - 7:41 am | बाकरवडी

ओ तुम्ही आरती लिहू शकता .
नि:स्वार्थी मनाने काम करा , फळाची अपेक्षा करु नका.

आणि हो स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यावर विजेत्यांना मी तुमच्या भांडाराचा पत्ता देइनच !
बाकी ते व्यवहाराचे आपण नंतर बघूच !
(खराटा यांच्याशिवाय कोणीही वाचु नये:- नाहीतरी तुम्ही आरती लिहीणार आहात्च तर तुम्हाला नंबर देउन टाकू काय? ;) )

नितिन थत्ते's picture

12 Apr 2009 - 10:56 am | नितिन थत्ते

जालिंदरजींचा महिमा असा की आरती स्पर्धा जाहीर होताच जे न देखे रवी सदरातील लिखाण एकदम आटले.

खराटा
(रंग माझा वेगळा)

अनंता's picture

28 Apr 2009 - 2:55 pm | अनंता

निकाल केव्हा?
अवांतर : आऊटगोइंग कॉल्स बंद आहेत.
anant.sarnekar@gmail.com

घाशीराम कोतवाल १.२'s picture

28 Apr 2009 - 3:57 pm | घाशीराम कोतवाल १.२

मग बिले वेळच्या वेळी भरावीत माणसाने मग आऊटगोइंग कॉल्स बंद होत नाहित
नाय तर हा एक रुपाया घ्या माझ्या कडुन आनी पी सी ओ वरुन फोन करा

**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

अनंता's picture

28 Apr 2009 - 4:06 pm | अनंता

आऊटगोइंग कॉल्स हे क्रिप्टीक आहे.
आपला : (लबाड लांडगा) अनंता.

हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

घाशीराम कोतवाल १.२'s picture

28 Apr 2009 - 4:28 pm | घाशीराम कोतवाल १.२

पी सी ओ हे पण क्रिप्टीक आहे.
ते तुमाला नाय कळणार तात्याना अवलियांना प्रभुना कळल असेल

(पालथ्या धंद्यातला एक्सपर्ट ) कोतवाल

**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

अनंता's picture

28 Apr 2009 - 4:42 pm | अनंता

अवांतर : आमचं आपलं व्हेज क्रिप्टीक.
पालथ्या धंद्यातील महामहोपाध्यायांना शुभेच्छा!