कसे सांगू मानत माझ्या आठवणी किती?
सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी.
हातात हात गुंफून तू संगितलेले बोल,
कसे सांगू त्या शब्दांचे आहे किती मोल?
शब्दांना तोलाण्याची प्रेमात नसते नीति.
सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी.
माझ्या खांद्यावरचे तुझे डोके,
वेगात घेतलेले उंच झोके,
जगू शकेन का न मिळल्यास ही प्रीति?
सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी.
मोतीमाळ तुझ्या गळी ,
गालावर पडते नाजुक खळी ,
वसंत फुलवणारे हास्य तुझ्या ओठी.
सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी.
प्रेमात गाईलेले गोड गाने,
तुझा निरोप आणणारी पाने,
तळहाताच्या फोडा प्रमाणे जपणारी नाती,
सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी.
निरोप घेतांना भावनाधीन होणे,
डोळ्याच्या कडेने पानी येणे,
या वियोगाची नेहमीच असलेली भीती,
सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी.