सार काही शिकवत वाढत वय
समाज माणसे प्रसंग राहतात तेच ते
पण आता चटकन सुटतात व्यवहारातील पेच
जराही होऊ देत नाही हयगय
खरच सार काही शिकवत वाढत वय....
घटना,प्रसंग, व्यवहार यांच्या जून्या आठवणी
असते घडल्या चुकांची दिर्घ कहाणी पण
आता कशाचेच उरत नाही भय कारण
सामर्थ्य देते वाढते वय..
शब्दांमूळे बिनसलेली अनेक नाती
कोणी सोबती तर कोणी संगती
आता शब्दांशी स्वरांची जमती आहे अचूक लय
खरच सार काही शिकवत वाढत वय...
प्रतिक्रिया
11 Apr 2009 - 5:46 pm | जागल्या
शब्द जरी चुकले आता
तरी ते असतात अनुभवाचे बोल
नंतर आपणच शो धायची आपली चुक
खरच सार काही शिकवत वाढत वय...
जागल्या
12 Apr 2009 - 2:15 am | शिवापा
प्रथमचं वय वाढतेय यांच वाईट वाटत नाहिये. ऊत्तम काव्य!
13 Apr 2009 - 8:31 pm | क्रान्ति
सामर्थ्य देते वाढते वय! खरंच, वाढत्या वयाचा अभिमान वाटावा, अशी भावना आहे. सुरेख कविता.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
13 Apr 2009 - 9:45 pm | टायबेरीअस
सार काही शिकवत वाढत वय
शर्ट, तुमानी राहतात तेच ते
पण आता चटकन सुटतात उसवण्यातले पेच
जराही होऊ देत नाही हयगय
खरच सार काही शिकवत वाढत वय.... :)
-टायबेरीअस
मै तो अकेले ही चला था जानिबे ए मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"