निवेदन- नावातील साधर्म्य

वरदा वैद्य's picture
वरदा वैद्य in जनातलं, मनातलं
1 Feb 2008 - 10:02 pm

नमस्कार,
मी वरदा वैद्य. मनोगत आणि उपक्रमावर वरदा नावाने माझे सदस्यत्व आहे आणि विज्ञान विषयावर काही प्रमाणात लेखन केले आहे. त्यामुळे मिसळपावावरील वरदा ही मीच असेन असा काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनी माझ्याकडे त्याबद्दल विचारणा केली. काहींचा गैरसमज होऊनही त्यांनी विचारणा केली नसेल.
वरदा हे तसे सहज आढळणारे नाव नव्हे. तसेच, मिसळपावावरील वरदाप्रमाणे मीही अमेरिकेत राहत असल्यामुळे कोणाचा गैरसमज होणं साहजिक आहे, जरी माझी लेखनशैली येथील वरदाशी मिळतीजुळती नसली तरी. मिसळपावावर माझे सदस्यत्व आजपर्यंत नव्हते. मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे.
-वरदा वैद्य.

हे ठिकाणमाहिती

प्रतिक्रिया

सुनील's picture

1 Feb 2008 - 10:35 pm | सुनील

मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे.

अहो वरदाताई. आता सदस्यत्व घेतले आहे ते काय फक्त निवेदन देऊन जाण्यासाठीच? इथेही काही लिहा की!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

2 Feb 2008 - 1:11 am | विसोबा खेचर

सुनीलराव,

मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे.

असे वरदाताईंनी स्पष्ट लिहिले असताना आपण,

अहो वरदाताई. आता सदस्यत्व घेतले आहे ते काय फक्त निवेदन देऊन जाण्यासाठीच? इथेही काही लिहा की!!

असा प्रतिसाद लिहिणे हे आम्हाला मिसळपावकरता कमीपणाचे आणि मिसळपावच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवणारे वाटते!

मनोगत आणि उपक्रम यांसरख्या दिग्गज संस्थळांवर वावरणार्‍या वरदाताईं फक्त निवेदन देण्याच्या निमित्ताने का होईना, आपल्या मिसळपाव परिवारात आल्या आहेत हे चांगलेच आहे आणि मिसळपाववर त्यांचे स्वागतच आहे! परंतु त्यांनी इथेच रहायचे किंवा रहायचे नाही, इथे लिहायचे किंवा लिहायचे नाही, हा संपूर्णपणे त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे आम्हाला वाटते!

मिसळपाव परिवारात सर्व मराठी जनांचे स्वागतच आहे, ते देखील अगदी मनापासून! परंतु मिसळपाव कुणाचेही मिंधे नाही इतकेच आम्ही नमूद करू इच्छितो!

वरदाताईंनी,

मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे.

असे स्पष्ट लिहिले असून त्या केवळ निवेदन देण्याकरता इथे आल्या आहेत, नव्हे त्यांना यावे लागले आहे असाच अर्थ ध्वनित होतो! असे असताना त्यावरील आपण केलेले विधान आम्हाला अत्यंत मिंधेपणाचे वाटते आणि म्हणूनच आपले विधान हे पूर्णत: आपले वैयक्तिक विधान असून सदर विधानाशी मिसळपाव डॉट कॉमचा काहीही संबंध नाही असे मिसळपाव डॉट कॉमच्या वतीने आम्ही नमूद करू इच्छितो!

मिसळपाव परिवाराला नव्या सभासदांचे भरभरून स्वागतच आहे आणि नेहमीच राहील, परंतु इथे आज जी मंडळी प्रेमाने आणि आपणहून सामिल झाली आहेत, इथे लेखन करीत आहेत तीच मंडळी मिसळपावचा आधार आहेत असे आम्ही मानतो आणि त्यातच मिसळपाव समाधानी आहे आणि राहील!

फक्त अमक्या कारणाकरताच येथे आलो होतो/आले होते, तमक्या कारणाकरताच येथे आलो होतो/आले होते असे सांगून येथे निवेदन देऊ इच्छिणार्‍यांशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही, असेही आम्ही मिसळपावच्या वतीने आम्ही नमूद करत आहोत...

धन्यवाद...!

तात्या.

सुनील's picture

2 Feb 2008 - 3:19 am | सुनील

वरदाताईंना "येथेही लिहा" हे सांगणे केवळ सदीच्छेपोटीच होते. यात मिपाला कमीपणा आणणे किंवा मिपाच्या स्वाभिमानाला धक्का पोचवणे हा हेतू कदापिही नव्हता.

तेव्हा गैरसमज नसावा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

2 Feb 2008 - 9:28 am | विसोबा खेचर

वरदाताईंना "येथेही लिहा" हे सांगणे केवळ सदीच्छेपोटीच होते.

सुनीलराव, हे आम्हीही जाणतो. आपली,

अहो वरदाताई. आता सदस्यत्व घेतले आहे ते काय फक्त निवेदन देऊन जाण्यासाठीच? इथेही काही लिहा की!!

या वाक्यातली निरागसता, सहजता आम्हालाही कळली होती. परंतु समोरच्या व्यक्तिने केवळ अमूक अमूक कामाकरता मिपाचे सदस्यत्व घेतले आहे असे मुद्दामून लिहिणे यातला धूर्त नमोगती कावेबाजपणा आपल्या लक्षात न येता आपण चांगुलपणा दाखवायला गेलात म्हणून अंमळ रुक्ष शब्दात आम्ही आपल्याला प्रतिसाद लिहिला इतकेच! खरे तर या करता आम्हीच आपली क्षमा मागतो..! आम्ही नमोगत कोळून प्यायलो असल्यामुळे नमोगती हलकटपणा चटकन आमच्या लक्षात येतो!

यात मिपाला कमीपणा आणणे किंवा मिपाच्या स्वाभिमानाला धक्का पोचवणे हा हेतू कदापिही नव्हता.

याचीही आम्हाला कल्पना असून आपल्या सदहेतूबद्दल आमच्या मनात जराही शंका नाही. परंतु वरदाताईंनी,

मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे.

असे लिहिल्यामुळे त्यातून केवळ,

"वरदा या नांवाबद्दल काय तो खुलासा करण्याकरता म्हणूनच येथे मला यावे लागले आले आहे हो! एरवी मला मिपाचे सदस्यत्व घ्यायची आजिबात इच्छाही नव्हती!"

असाच अर्थ ध्वनित होतो आणि मिपाबदलची घृणा आणि मिपाबद्दलचा तिरस्कार स्पष्ट जाणवतो!

लोकांच्या मनात वरदा या नावाबदल काय समज, गैरसमज असतील, त्याबद्दल वरदाताईंनी जे काही निवेदन दिले आहे त्यात आम्हाला काहीच वावगे वाटत नाही. अश्या प्रकारचा खुलासा त्या निश्चितच करू शकतात, परंतु जाता जाता,

केवळ याच कारणाकरता येथील सभासदत्व घेतले आहे,

असे मुद्दामून लिहिणे म्हणजे थोड्या वेगळ्या शब्दात, अप्रत्यक्षरित्या मिपाच्या व्यासपीठावर खुद्द मिपाचाच अपमान करणे, सुनीलराव आपल्या भाबड्या स्वभावाला कळले नाही म्हणून अंमळ रुक्ष प्रतिसाद दिला. आपल्या हेतूबद्दल आमच्या मनात जराही शंका नव्हती, हे पुन्हा एकदा नमूद करतो!

अहो सुनीलराव, जरा माणसं ओळखायला शिका! :)

आम्ही अशीही माणसं पाहिली आहेत की जी नमोगतावर असताना भांड भांड भांडली आहेत, यथेच्छ उखाळ्यापाखाळ्या केल्या आहेत, परंतु मिसळपाव सुरू होऊन अवघे आठ दिवस झाले होते नव्हते, तेव्हा इथली वादावादी पाहून यांचं लगेच मन उडालं म्हणे! अहो जिथे 'आपापसात' हा विभाग सुरू करावा लागला तिथे हे गुण्यागिविंदाने नांदत होते परंतु आपल्या मिसळपाववर त्यांचे आठच दिवसात मन उडाले/उडावे याला मिपाबद्दलचा व्यक्तिगत तिरस्कार नाही म्हणायचं तर काय प्रेम म्हणायचं? :)

असो, हा तात्या त्या सर्वांना पोचवून त्यांचा तेरावा जेवेल, हा भाग वेगळा! :))

आपला,
(सगळी आंतरजालीय दुनीयादारी करून मिपा काढलेला!) तात्या.

वरदा's picture

2 Feb 2008 - 1:24 am | वरदा

नमस्कार मी वरदा आणि मी कुठेही लिखाण केलेलं नाही त्यामुळे मला वाट्टं तुम्ही गैरसमजाची काळजी नका करु. मी इथे अगदी सहज गप्पाटप्पा करायला येत असते. तेव्हा निश्चिंत असा. विज्ञानात बराच अभ्यास असला तरी लिखाण करणं हा माझा छंद नाही. तेव्हा इथे लिहिलंत तर वाचायला आवडेल पण मुख्य मुद्दा हा की Your identity is safe.

विसोबा खेचर's picture

3 Feb 2008 - 1:54 pm | विसोबा खेचर

नमस्कार मी वरदा आणि मी कुठेही लिखाण केलेलं नाही त्यामुळे मला वाट्टं तुम्ही गैरसमजाची काळजी नका करु. मी इथे अगदी सहज गप्पाटप्पा करायला येत असते.

हम्म! खरं आहे तुझं वरदा. तू गप्पाटप्पा करायला अशीच नेहमी इथे येत रहा, एवढीच तुला कळकळीची विनंती!

'वरदा' या नांवाचं पेटंट किंवा कॉपीराईट घेतल्याच्या आविर्भावात वरदा वैद्य यांनी इथे येऊन जो निवेदनवजा शहाजोगपणा केला आहे त्याबद्दल तुलाही फुक्कटचा मनस्ताप झाला असेल याची मला जाणीव आहे आणि म्हणूनच मी तुझी व्यक्तिश: जाहीत क्षमा मागत आहे!

काही काही माणसं इतक्या कोत्या आणि कूपमंडूक मनोवृत्तीची असू शकतात याचं खरंच नवल वाटतं!

आपला,
(मिपावरील वरदाचा मायबोलीकर मित्र!) तात्या. :)

प्राजु's picture

2 Feb 2008 - 1:26 am | प्राजु

मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे.

खरंय...
तात्यांशी सहमत आहे मी.

- प्राजु

इनोबा म्हणे's picture

2 Feb 2008 - 1:34 am | इनोबा म्हणे

मिसळपावावर माझे सदस्यत्व आजपर्यंत नव्हते. मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे.
इथे आलच आहात तर आपले स्वागतच आहे.

तसे निवेदन तुम्हाला मनोगत आणि उपक्रम वरही करता आले असते, खास(फक्त...) त्यासाठी आपणाला जातीने इथे यावे लागले... अरेरे!

(पक्का पुणेरी) -इनोबा

पिवळा डांबिस's picture

2 Feb 2008 - 4:50 am | पिवळा डांबिस

आम्हाला तरी आजतागायत वरदा वैद्य हे नांव (या लेखिका आहेत, कवयत्री, समिक्षिका की आणखी कोणी, देवच जाणे!) ठाऊक नव्हते. आम्हाला आमच्या नेहमी येणारया वरदाताई ठाऊक आणि आवडत्या!!

फक्त अमक्या कारणाकरताच येथे आलो होतो/आले होते, तमक्या कारणाकरताच येथे आलो होतो/आले होते असे सांगून येथे निवेदन देऊ इच्छिणार्‍यांशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही, असेही आम्ही मिसळपावच्या वतीने आम्ही नमूद करत आहोत...

तात्या सरपंचानी दाखवलेल्या स्वाभिमानाबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन! आम्हाला त्यांचे विलक्षण कौतुक वाटले.
मऊ मेणाहुनी, आम्ही विष्णुदास,
कठिण वज्रास, भेदू ऐसे!! :)

तसे निवेदन तुम्हाला मनोगत आणि उपक्रम वरही करता आले असते, खास(फक्त...) त्यासाठी आपणाला जातीने इथे यावे लागले...

नव्हे, तसे ते मनोगतावर किंवा उपक्रम वर करणेच योग्य होते. आपण कोणी आहोत किंवा नाहीत हे आपली उठबस असणारया ठिकाणीच जाहीर करण्यात औचित्य असते. परक्या, अनोळखी माणसांपुढे हे सांगण्यात काय मतलब आहे? त्यांना तुम्ही कोण आहांत हे नाहीतरी माहिती नाहीच!
की,
"येनकेन प्रकारेण प्रसिद्धी पुरुषा (इथे वनिता) भवेत" असा काही प्रकार आहे?

(आमच्या) वरदाताई, आता नांवाचंही पेटंट काढून ठेवा!!

फक्त मिसळपावाचाच,
पिवळा डांबिस
(आमची इतरत्र कोठेही डिलिव्हरी नाही!)

प्रमोद देव's picture

2 Feb 2008 - 10:19 am | प्रमोद देव

वरदाताई(वैद्य) केवळ आपण त्या 'वरदा' नव्हेत म्हणून खुलासा करण्यासाठीच आपण इथले तात्पुरते सभासदत्व घेतलेत हे वाचून आश्चर्य वाटले. आपल्याच नामसाधर्म्य असणार्‍या व्यक्तीने असे काय केले की ज्यामुळे आपली प्रतिमा डागाळली गेली अथवा आपले कोणते श्रेय लाटले? हे निदान मला तरी कळले नाही. त्यामुळे अशा तर्‍हेचे वक्तव्य करून आपण त्या 'वरदां 'चा देखिल नकळत अपमान केलेला आहे. तसेच निव्वळ खुलासा करण्यासाठीच सदस्यत्व घेतले आहे असे लिहून मिसळपावचा देखिल अपमान केलेला आहे.(ह्यातला ध्वन्यार्थः एरवी अशा संकेतस्थळाकडे आम्ही ढुंकुनही पाहत नाही असा होतो. कदाचित तुम्हाला असे म्हणायचे देखिल नसेल पण निदान त्यातून असा गैरसमज नक्कीच निर्माण होतो.)
निदान आपल्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती.

विसोबा खेचर's picture

2 Feb 2008 - 10:37 am | विसोबा खेचर

नेमक्या शब्दांतील प्रतिसादाबद्दल धन्यवाद प्रमोदकाका! आपल्या सारख्या वरिष्ठ सभासदाने यात हस्तक्षेप केला आणि मिपाची प्रतिष्ठा जपली याचे खूप बरे वाटले..!

आपल्याच नामसाधर्म्य असणार्‍या व्यक्तीने असे काय केले की ज्यामुळे आपली प्रतिमा डागाळली गेली अथवा आपले कोणते श्रेय लाटले? हे निदान मला तरी कळले नाही.

अगदी खरे आहे! मलाही कळले नाही...

त्यामुळे अशा तर्‍हेचे वक्तव्य करून आपण त्या 'वरदां 'चा देखिल नकळत अपमान केलेला आहे.

सहमत आहे प्रमोदकाका. आणि त्याकरता मी, मिपावरील वरदापाशी माझी व्यक्तिश: दिलगिरी व्यक्त करतो..

आपला,
(प्रमोदकाकांचा आभारी आणि मिपावरील वरदाचा दिलगिर!) तात्या.

केशवराव's picture

2 Feb 2008 - 11:46 am | केशवराव

वरदा [वैद्य ] ताईस ,
मि. पा. वर कुणी 'वरदा' नांवाने लिहीत्ये [ मि.पा.वरील वरदा, एकेरी उल्लेख आवडेल ना?] , आणि त्याचा अपल्याला काही उपद्रव / त्रास होतो, असे भासवून किंवा दाखवून आपण काय साधलेत? मिपा वरील वरदाला मानसिक त्रास झालाच नसेल का?
नाम साधर्म्य असलेल्या कितीतरी व्यक्तीं अस्तीत्वात असतात. माझ्या एका मित्राचे नाव 'बाळाजी विश्वनाथ देशपांडे' आहे. आता काय करायचे ?
आमच्या वरदाचे मन दूखावलेत आणि मि.पा. ला पण दुखावलेत.
आमचा मि.पा. खेळकर आणि ईनोसंट लोकांचा आहे.
[सकाळ , दुपार मिसळ खाणार] केशवराव.

टिउ's picture

2 Feb 2008 - 11:56 pm | टिउ

मला वाटतं निवेदन देउन झालं असेल तर त्यांचं सभासदत्व उडवण्यात यावं...
काही लोकांना उगीच वाटत असतं कि आपण लई भारी लिहितो...मी तर उपक्रमावरच्या चर्चा/लेख वाचत असतो...वरदा वैद्य नाव कधी वाचल्याचं आठवत नाही!

शंभरातल्या एखाद्याचा गैरसमज झाला असेल कदाचीत...पण त्यासाठी तुम्हाला खास मिपाचं सभासदत्व घेउन निवेदन करावसं वाटलं याचा अर्थ तुमचा स्वतःबद्दलच काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय...

इनोबा म्हणे's picture

3 Feb 2008 - 12:32 am | इनोबा म्हणे

मला वाटतं निवेदन देउन झालं असेल तर त्यांचं सभासदत्व उडवण्यात यावं...
अगदी सहमत

मी तर उपक्रमावरच्या चर्चा/लेख वाचत असतो...वरदा वैद्य नाव कधी वाचल्याचं आठवत नाही!
मलाही नाही आठवत.

तुमचा स्वतःबद्दलच काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय...
हे अगदी खरं बोललात.

ज्यांना मिपामधे रस नाही,त्यांनी येथे येण्याची गरजच काय? आणि मिपालाही अशा मिजासखोर लोकांमधे रस नाही. आमच्याकडे प्रतिभावान लेखकांची कमी नाही.
राहता राहिले वरदा या नावाचे तर आमच्या 'वरदाताई' तुमच्यापेक्षा कमी नाहीत.

(आख्ख्या दूनियेची मिसळ चापलेला) -इनोबा

वरदाताई वैद्य, आपण दिलेल्या निवेदनात मला अहंमन्यता पुरेपूर जाणवली आहे. मी स्पष्ट बोलतो आहे कारण तुम्ही काही कारण नसताना मि.पा. करांचा आणि आमच्या वरदाचा अपमान केला आहे.

तसेच निव्वळ खुलासा करण्यासाठीच सदस्यत्व घेतले आहे असे लिहून मिसळपावचा देखिल अपमान केलेला आहे.(ह्यातला ध्वन्यार्थः एरवी अशा संकेतस्थळाकडे आम्ही ढुंकुनही पाहत नाही असा होतो. कदाचित तुम्हाला असे म्हणायचे देखिल नसेल पण निदान त्यातून असा गैरसमज नक्कीच निर्माण होतो.)

असे आमच्या प्रमोदकाकांनी मोठ्या मनाने म्हटले आहे.
पण मी असे अजिबात म्हणणार नाही. जी व्यक्ती आंतरजालावर इतर ठिकाणी लिखाण करते तिला कोणत्या लिखाणाचा कसा अर्थ होतो ह्याची जाणीव नसावी हे पटण्यासारखे नाही.

वरदा हे तसे सहज आढळणारे नाव नव्हे.
अशांसारखी वाक्ये तर आत्मस्तुती आणि अहंमन्यतेने भरलेलीच वाटतात कारण त्यांचा इथे काही संबंध लागत नाही!

असो. माझ्यामते त्यांचे सदस्यत्व रद्द करु नये. मि.पा. सडेतोड आहे पण कोत्या मनाचे नाही असे मला वाटते.
त्यांना इथे लिखाण करायचे असल्यास इतर मि.पा.करांच्या बरोबरीने येऊदेत, त्यांचे स्वागत आहे.
कारण मि.पा.त कोणासाठीही मानाच्या जागा नाहीत "इथे सगळे आपले लोक आहेत" असे मला वाटते.

चतुरंग

विकेड बनी's picture

3 Feb 2008 - 4:29 am | विकेड बनी

वरदा हे तसे सहज आढळणारे नाव नव्हे.

हे मात्र काहीतरीच!!!

आम्हाला वरदाराजन जन्मापासून माहित आहे. -- ह. घ्या.

विसोबा खेचर's picture

3 Feb 2008 - 8:49 am | विसोबा खेचर

मि.पा. सडेतोड आहे पण कोत्या मनाचे नाही असे मला वाटते.
कारण मि.पा.त कोणासाठीही मानाच्या जागा नाहीत "इथे सगळे आपले लोक आहेत" असे मला वाटते.

रंगरावांशी सहमत आहे...

मिपा ही नुसतीच छान आणि चवदार असते असे नाही तर तेवढीच झणझणीतही असते हे या निमित्ताने वरदाताईंना समजले असेल अशी आशा करतो..! :)

छान छान, गोड गोड, गुडी गुडी, तुम्ही छान, आम्ही छान, तुम्ही सभ्यसुसंस्कृत, आम्ही सभ्य सुसंस्कृत अशा वातावरणात वाढलेल्यांना मिसळीचा झणझणीतपणा पचनी पडायला जरा कठीणच जाते! :)

आपला,
(मिपाकर) तात्या.

राजे's picture

3 Feb 2008 - 11:53 am | राजे (not verified)

"छान छान, गोड गोड, गुडी गुडी, तुम्ही छान, आम्ही छान, तुम्ही सभ्यसुसंस्कृत, आम्ही सभ्य सुसंस्कृत अशा वातावरणात वाढलेल्यांना मिसळीचा झणझणीतपणा पचनी पडायला जरा कठीणच जाते! :) "

सहमत.

हे प्रकरण काही आवडले नाही आम्हाला...
मी राज, आता ह्या भारत देशामध्ये (तसेच विदेशामध्ये देखील राज नाव आहे असे वाचून आहे) राज नावचे लाखोंने आहेत,
एक उदाहरण जर गुगल मध्ये राज जैन शोध घेतला तर सर्वत्र राज जैन हे नाव येते हे साहेब कोणीतरी अमेरिकेतील आहेत व तेथील शक्यतो लोक प्रिय. व काही राज जैन वेगवेगळ्या संस्थे मध्ये मोठे अधिकारी आहेत तर त्यांनी जेथे जेथे लेखन केले आहे तेथे जाऊन मी त्यांना असे म्हणू शकत नाही की हे राज जैन म्हणजे मी नाही आहे ही कोणी तरी वेगळीच व्यक्ती आहे.. अहो लोक माझ्या तोंडावर शेण फासतील.... हा हा...

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

डॉ.प्रसाद दाढे's picture

3 Feb 2008 - 1:41 pm | डॉ.प्रसाद दाढे

आम्हाला वरदराजन जन्मापासून माहित आहे
हे मात्र एकदम खरे आहे..त्या प्रेमापोटी (!) आम्ही कमल हसनचा 'नायकन' सुद्धा पाहिलाय..:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Feb 2008 - 5:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जरा आम्ही सुटीवर गेलो तर झाला का दंगा सुरु :)
निवांत वाचतो आणि निवांत प्रतिसाद लिहितो !!!!!
तो पर्यंत चालू द्या !!! मिसळपावचा रंगमंच हलता असलेला आम्हाला नेहमी आवडतो :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकेड बनी's picture

3 Feb 2008 - 7:34 pm | विकेड बनी

>>मिसळपावावरील वरदा ही मीच असेन असा काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनी माझ्याकडे त्याबद्दल विचारणा केली.

ते काही लोक कोण ते समजेल का? कारण आम्हाला तुमचे नाव कोणी वापरते आहे अशी शंकाही आली नाही. त्या काही लोकांना आली, त्यांचा तुम्हाला तोंडघशी पाडण्याचा कावा तर नव्हता. तसा त्यांचा कावा नसला तरी तुम्ही मस्त तोंडावर आपटल्या आहात.

टिउ's picture

4 Feb 2008 - 1:50 am | टिउ

वरदा हे तसे सहज आढळणारे नाव नव्हे.

वरदा या नावाने ऑर्कुटवर शोधल्यावर ८०७ लोक सापडले! :-)

विजय आचरेकर's picture

4 Feb 2008 - 1:18 pm | विजय आचरेकर

वरदाताई(वैद्य) यांची क्षमा मागुन........

विज्ञानात बराच अभ्यास असला तरी लिखाण करणं हा माझा छंद नाही......................

अहंतागुणे सर्वही दु:ख होते
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते
सुखि राहता सर्वहि सुख आहे
अहंता तुझि तुच शोधुन पाहे

जय जय रघुवीर समर्थ.

विजय आचरेकर

प्रशांतकवळे's picture

4 Feb 2008 - 3:36 pm | प्रशांतकवळे

माझ्यामते, वरदा वैद्य ह्यांनी ( माफ करा, एकेरीत लिहीण्याचे धाडस होत नाहीय.) एखाद्या वॄत्तपत्रात जाहिरात देणे आवश्यक होते, आणि त्यांचा व मिपा वरील वरदा ताई चा (थोडक्यात मिपाचा) काहीएक संबंध नाहीय हे लिहायला हवे होते.

इथे येऊन लिहिण्यात त्यांना काय साध्य करायचे होते?

प्रशांत

वरदा वैद्य's picture

4 Feb 2008 - 7:46 pm | वरदा वैद्य

मिसळपाववरील वरदाला मनस्ताप देण्याच्या उद्देशाने हे लिहिले नव्हते. सध्या वैयक्तिक कारणांमुळे मला जालावर लिहिण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे गेले अनेक दिवस कुठेच मी ऑनलाईन नव्हते. विरोपांना उत्तर देण्यासाठीही वेळ नाही अशी सध्या परिस्थिती आहे. मात्र इथे वरदा नाव दिसल्यामुळे काहींचा गैरसमज झाला व काही ओळखीच्या व्यक्ती माझ्यावर त्यांना लिहायला वेळ नसतो म्हणून रागावल्या, म्हणून हे निवेदन दिले. गैरसमज नसावा. गैरसमज ज्या वाक्यामुळे झाला त्याबद्दल दिलगीर आहे, व ते वाक्य कसे बदलावे हे कृपया कळवावे.

विसोबा खेचर's picture

4 Feb 2008 - 10:16 pm | विसोबा खेचर

गैरसमज ज्या वाक्यामुळे झाला त्याबद्दल दिलगीर आहे,

ठीक आहे, विषय संपला..!

व ते वाक्य कसे बदलावे हे कृपया कळवावे.

आपण दिलगिरी व्यक्त केली आहे तेव्हा आता त्याची गरज नाही! मिपा परिवारातर्फे हा विषय संपला! आमचा मिपा परिवार हा जिन्दादील लोकांचा समूह आहे. आमचं मन साफ आहे. तुमचंही करा आणि आमच्या परिवारात सामील व्हा, ही विनंती..

आपण लिहिलेले ते वाक्य निश्चितच आक्षेपार्ह होते व आहे. परंतु त्याकरता आता आपण दिलगिरी व्यक्त केली आहे. तेव्हा हा विषय मिटला! अहो चुका सगळ्यांकडूनच होतात. चुकतो तोच माणूस!

झालं गेलं गंगेला मिळालं (किंवा मिसळीच्या रश्श्यात मिळालं! :) ..

शास्त्रसंबंधी लेखनात आपले विशेषत्व आहे, तेव्हा आता मिपावर एखादा छानसा शास्त्रीय विषयावरील लेख लिहा ही विनंती..!

मिपा तेवढ्याच जिन्दादिलीने आपलं स्वागत करेल याची खात्री बाळगा!

आपला,
(मिपाकर) तात्या.

प्रमोद देव's picture

4 Feb 2008 - 10:28 pm | प्रमोद देव

आपण लिहिलेले ते वाक्य निश्चितच आक्षेपार्ह होते व आहे. परंतु त्याकरता आता आपण दिलगिरी व्यक्त केली आहे. तेव्हा हा विषय मिटला!

वरदाताई(वैद्य) ह्यांनी केलेला खुलासा पटण्यासारखा आहे. तेव्हा तात्या म्हणतो त्याप्रमाणे हा विषय इथेच संपवणे योग्य आहे.

शास्त्रसंबंधी लेखनात आपले विशेषत्व आहे, तेव्हा आता मिपावर एखादा छानसा शास्त्रीय विषयावरील लेख लिहा ही विनंती..!

सहमत आहे.

अवलिया's picture

4 Feb 2008 - 8:34 pm | अवलिया

>>>.गैरसमज ज्या वाक्यामुळे झाला त्याबद्दल दिलगीर आहे, व ते वाक्य कसे बदलावे हे कृपया कळवावे

याला म्हणतात सो चुहे खाके.....

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Feb 2008 - 10:02 pm | ब्रिटिश टिंग्या

वरदाताईंनी दिलगीरी व्यक्त केलेली आहे, तेव्हा हा विषय जास्त न ताणता झाले गेले ते विसरून गेलेले बरे.

आपला,
('गांधी'भक्त) छोटी टिंगी