सख्या, का ते फुलपाखरू गालातच लाजले रे?
का पंखाच्या फडफडीतूनी चित्त त्याचे हासले रे?
कोण फुलापाई, पंखी रंग त्याने नक्षीले रे?
कोण फांदीवरी फुल त्याचे सुखावीले रे?
बघ कसा वारा चिष्टविती ह्यास, देत झुळूक रे !
का धरला त्याने अबोला, भरल्या कळीस रे ?
कुठुनी येतसे हा गंध, घालीत त्यास साद रे ?
होईल सांज आता, मनी दाटली हुरहुर रे !
कुण्या जन्माची ही, अवखळ, सच्ची प्रित रे !
जन्मापासुनच नाव, त्याने स्वतःशी गुंतले रे !
*फुल्-पाखरू*