चित्र-काव्य स्पर्धा
खालील चित्र पाहून तुम्हाला स्फुरलेली कविता येथे टंका.
स्पर्धेचे नियम -
१) सदर स्पर्धा फोटो डकवल्यापासून किमान ७२ तास ते कमाल १२० तासांपर्यंत खुली राहील.
२) स्पर्धेची वेळ संपल्यावरच निकाल जाहीर करण्यात येईल.
३) स्पर्धेतील प्रथम विजेत्याचे नाव आमच्या खरडवहीत ठळक अक्षरात लिहिण्यात येईल!!
(अगदीच आग्रह झाला तर ठाण्याच्या मामलेदारची मिसळ खिलवू देण्याबद्दल विचार करण्यात येईल!!)
४) अन्य विजेत्यांची नावेदेखिल आमच्या खरडवहीत (ठळक नसली तरी) लिहिण्यात येतील!!!
५) परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील आणि त्यावर कोणताही पत्रव्यवहार (व्यनि अथवा खरडीद्वारे) केला जाणार नाही!!
६) परीक्षक आम्ही स्वतः असू!!
तर चला मिपाकर कवींनो, उचला आपली बोटे आणि बडवा आपला कळफलक!!
प्रतिक्रिया
9 Apr 2009 - 10:45 am | पॅपिलॉन
जेव्हा तुझ्या बुटांना
उजळी छचोर छोरा
माझा कसा असू मी?
पाहूनी हा नझारा!
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
9 Apr 2009 - 10:47 am | विसोबा खेचर
छान उपक्रम आहे, सर्व स्पर्धकांना आमच्या शुभेच्छा! :)
तात्या.
9 Apr 2009 - 11:04 am | मराठी_माणूस
कविता स्फुरली नाही पण किशोरकुमार चे खालील गाणे आठवले
जुता पालीश करेगा...
चाहे ये जमाना कहे हमको दीवाना, अजी हम तो मुहब्बत करेगा.
(अवांतरः बाकी चीत्र (पोरगी) छान आहे)
9 Apr 2009 - 12:34 pm | अवलिया
दिसताच ती कमनीय नार
खुललो मनात येई विचार
हसुन पाहुन तिला क्षणभर
डोळ्यास डोळे भिडले चार
समजुन मनीचे ते विचार
बोलली देत वेदना अपार
बघु नकोस निरखुनी फार
सलगीचा तर नको विचार
समजु नकोस नाजुक नार
बसतील चांगले जुते चार
--अवलिया
9 Apr 2009 - 1:06 pm | मूखदूर्बळ
(सुरेश भट , आशा ताई, हॄदयनाथांची क्षमा मागून)
बघता तुझ्या बुटाला कलेजी खलास झाली
मिटला चुकून डोळा (एकच बर) हळूवार शीळ गेली
सांगू तरी कसे मी, बील खुळगे पालीशचे
अडकून श्वास माझा, दडपून बात गेली
कळले मला न केव्हा, सुटली मिठी बुटाची
कळले मला न केव्हा, निसटून नार गेली
उरले उरात काही, आवाज ब्रशांचे
दिवसा तारकांचे, दर्शवून बाय गेली
कळले मला न तेव्हा, पडल्या कश्या (दंत)पंक्ती
मग चमक ती बुटांची, दाखवून लाथ गेली
चु भू द्या घ्या
9 Apr 2009 - 3:03 pm | मनीषा
ओझे किती युगांचे .. साचले या अंतरी
वंचना सात जन्मांची .. मी साहिली तुजसाठी |
पायधूळ ही तुझी .. घेतली होती मस्तकी
जाण तुज नसे जराही .. माझीया अस्तित्वाची |
तोडिली मग बंधने .. झुगारली सारी नाती
पंखात बळ माझ्या .. होतेच घेण्या भरारी |
मनमुक्त मी आकाशी .. पायतळी ही धरती
नजरेत तुझ्या होती .. तीच आदीम आसक्ती |
मज नकोत ते तराणे .. अन् रीतीचे उखाणे
प्रितीची गंधगाणी .. ते उसासे अन् ते रडणे |
न येणे मी परतुनी .. तुजसाठी -- तुजपाशी
राहशील आता तू रे .. माझीया चरणांपाशी |
13 Apr 2009 - 10:49 am | सुनील
एकूण स्पर्धक फक्त चार. मला वाटते, मिपाकर कवी उत्स्फूर्त कविता अथवा विडंबने करण्यात जास्त पटाईत आहेत. त्यांना नेमून दिलेल्या विषयात काव्य करणे फारसे आवडत नसावे (बहुसंख्य मराठी लेखक आपण शालेय जीवनात निबंध फारसे चांगले लिहित नसू असे सांगतात, ते उगीच नव्हे!).
(पैकी ५ गुण)
पॅपिलॉन
संपूर्ण कविता अपेक्षित होती. केवळ चारोळी नव्हे. सबब, प्रवेशिका रद्द.
अवलिया
आशय / विषय - ३
आकृतीबंध - ४
एकूण - ७
रचना उत्तम परंतु कल्पना पारंपरिक
मुखदुर्बळ
आशय / विषय - ३
आकृतीबंध - ३
एकूण - ६
रचना किंचित विस्कळीत आणि कल्पनाही पारंपरिक
मनिषा
आशय / विषय - ४
आकृतीबंध - ४
एकूण - ८
रचना तर उत्तमच पण कल्पना निव्वळ अफाट!
या स्पर्धीची विजेती - मनिषा
सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.