आयुष्यातील काही पहिले क्षण
सुखद अनुभवाचे सारे धन
बाळाचं पहिल पाऊल
मोठेपणाची लागलेली चाहूल
आयुष्यातील पहिला पाऊस
कागदी होडीची केलेली हौस
कडाडलेली पहिली विज
आईच्या मिठीला बिलगलेले काळीज
पहिला दिवस शाळेचा
गंध दरवळणार्या कोर्या पुस्तकांचा
घडलेली पहीली मैत्री
घरापलीकडील ती दृढ नाती
झालेल पहिल दु:ख
रडून रडून मिळालेल सुख
प्रेम पहिल जुळलेल
मन कुठेतरी हरवलेल
प्रेमाचा पहिला स्पर्श
भावनांशी भिडलेला संघर्ष
सारे काही सुखद पहिले
फक्त आठवणीत राहणारे
पुन्हा परत न येणारे.
प्रतिक्रिया
8 Apr 2009 - 9:08 pm | क्रान्ति
कडाडलेली पहिली वीज
आईच्या मिठीला बिलगलेले काळीज
खूप खूप खास!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com