(सुहास यांच्या पहिले प्रेमपत्र.. वरुन साभार)
कॉलेजमध्ये, विनामोबदल्यात, 'क्ष' ने 'वाय'कंपनीला लिहीलेल्या आणि मी चोरुन वाचलेल्या नोकरीच्या अर्जाने प्रेरीत..
"प्रयत्न पहिला माझा हा"
"नकार मजला देऊ नकोस"
"रिझ्यूम पाठवितो तुला"
"तो झिडकारुन देऊ नकोस"
"उठता बसता ध्यास तुझाच मज"
"तो 'आन॑द' हिसकावुन घेऊ नकोस"
"राहीन एकनिष्ठ तुझ्याशी मी"
"हे स्वप्न हिरावुन घेऊ नकोस"
"मनापासुन अर्ज दिला आहे मी तुज"
"पक्त कॉल देऊन जाऊ नकोस"
"प॑चप्राण डोळ्या॑त आणुनी रिप्लाय पहातो"
"अ॑त माझा पाहु नकोस"
"रिझ्यूम देऊनी वाट पहातो"
"कॉल मजला देशील का?
"रिप्लाय त्वरित देऊनी"
"नोकरी,माझी होशील का ?
डिसक्लेमर : माझ्या सद्ध्याच्या नोकरीचा कवितेशी काडीमात्र स॑बध नाही...
प्रतिक्रिया
7 Apr 2009 - 5:21 pm | सूहास (not verified)
सुहास
7 Apr 2009 - 5:23 pm | पाषाणभेद
रागावू नका हं
- पाषाणभेद