तू असता तर...!

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
1 Feb 2008 - 1:17 am

एक प्रीतीची मौज राजसा
फेसाळते किनाऱ्यावर..
हात घेऊनी माझा हाती
सजणा, तू असता तर......!

सोनेरी रुपेरी रंगांची ही
नक्षी उमटे रेतीवर
त्या नक्षीमध्ये रंग भरण्या
सजणा, तू असता तर......!

बघ क्षितिजाला भेटे नभ हे
चढली लाली पटलावर
लाली ती मम भाळी भरण्या
सजणा, तू असता तर......!

फिदा लहरी रूपावरी त्या
चंद्रमा झळके अवनीवर
चांद तो मम मुखी पाहण्या
सजणा, तू असता तर......!

खर्जातली ऐक गाज त्याची
खारा वारा अंगावर
कुंतल माझे मुक्त करण्या
सजणा, तू असता तर......!

- प्राजु.

( मनोगत दिवाळी अंकात ही कविता प्रकाशित झाली होती.)

प्रेमकाव्यप्रकटन

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

1 Feb 2008 - 1:25 am | इनोबा म्हणे

वाह! क्या बात है... अजून येऊ द्या....

बघ क्षितिजाला भेटे नभ हे
चढली लाली पटलावर
लाली ती मम भाळी भरण्या
सजणा, तू असता तर......!

फिदा लहरी रूपावरी त्या
चंद्रमा झळके अवनीवर
चांद तो मम मुखी पाहण्या
सजणा, तू असता तर......!
या ओळी विशेष आवडल्या......

आम्हीही कविता केल्या असत्या
ऐसा मेंदू असता तर.....!

असो!तुमची काव्यप्रतिभा अशीच फुलत राहो!

(काव्यप्रेमी) -इनोबा

मुक्तसुनीत's picture

1 Feb 2008 - 1:27 am | मुक्तसुनीत

.....हुकेलेसे वाटते.

धनंजय's picture

1 Feb 2008 - 2:50 am | धनंजय

आवडली. मीटरबद्दल सहमत - मुक्तछंद म्हणावा तर ठेका स्वैरही नाही.

विसोबा खेचर's picture

1 Feb 2008 - 6:55 pm | विसोबा खेचर

छान कविता..!

बघ क्षितिजाला भेटे नभ हे
चढली लाली पटलावर
लाली ती मम भाळी भरण्या
सजणा, तू असता तर......!

या ओळी फार आवडल्या. सुरेख..!

अवांतर - थोरामोठ्यांच्या संस्थळावर प्रकाशित झालेले साहित्य मिपाच्या टपरीवरही प्रकाशित केल्याबदल मिपातर्फे मी आपले आभार मानतो!

आपला,
तात्या,
मिसळपाव डॉट कॉम.

प्राजु's picture

1 Feb 2008 - 8:17 pm | प्राजु

टोमणे कळतात बरं...!
यापेक्षा जोरात हाणाल असे वाटले होते.. हा फारच सौम्य आहे. :)))

- प्राजु