रंगांची गोष्ट!

उमेश कोठीकर's picture
उमेश कोठीकर in जे न देखे रवी...
7 Apr 2009 - 12:13 am

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट.....
सगळे रंग..कॅनव्हासवर
सुखाने रहात होते..
हिरवा,निळा,भगवा वगैरे..!
आपापल्या जागी सुखी होते...
कॅनव्हास पण समाधानी....
पांढरी रंगाई पण सुखाने नांदत होती...
हिरवा हळूहळू पसरत होता...उगीचच
निळा.. तसा नविन.. हसत होता...
भगवा..एकटाच! तळपत होता..
सगळे आपापल्या जागी ...मजेत
पण....कली आला..!
गर्जला...
"सगळे सुखी? चांगले..? पांढरा पण..?
दाखवलेच पाहिजे..कॅनव्हासला!"
हळूच म्हणाला रंगांना,"हिरवे मियाँ; पसरा खूप अजून,
देतील नाहीतर हाकलून..!"
"अहो निळेबाबा, तुम्ही नविन ना?
घ्या ना जागा हक्काची! राखीव.!.मागेच रहाल"
"काय भगवे राजे? कसले हो?
मोठे व्हा! तो बघा हिरवा..वाढतोय!"
झाले.......रंग नासले..
सगळे असुरक्षित..आक्रमक झाले
वेगाने कॅनव्हासवर पुढे सरकू लागले.....!
कोणीच माघार घेईना
आणि...भिडले एकमेकांना...तुंबळ!
"मारो काटो...." हिरवा..
"हरहर.." भगवा..
"संघर्ष करा..विजय असो.." निळा..
"नका रे बाळांनो;मी नष्ट होईल..!" पांढरा..
कॅनव्हास थरारून गेला.....
पांढरा तर काळाठिक्कर पडला!
कली हसतोय्.."माझे काम झाले..मूर्ख!"
आणि...रंगांच्या या भांडणातून...
भयानक्..हिडीस! जीवघेणा.....
नविन रंग...
लाल.......
जन्माला आला....!!

कविताविचार

प्रतिक्रिया

मीनल's picture

7 Apr 2009 - 1:01 am | मीनल

प्रतिकात्मक उत्तम कविता.

एक विचारायच आहे की ---
फार फार वर्षांपूर्वी हिरवा,निळा,भगवा हे होते का? पार्टी/धर्म प्रकरण तेव्हापासूनच आहे की काय?

असो वा नसो ..
भयानक,हिडीस, जीवघेण्या नविन लाल रंगाची गोष्ट सांगणारे मुक्तक लेखन भावनापूर्ण आहे. मेसेज देऊन जागे करणारे आहे.
खूप खूप आवडले.
मीनल.

प्राजु's picture

7 Apr 2009 - 6:40 am | प्राजु

प्रतिकात्मक कविता उत्तम.
भयानक,हिडीस, जीवघेण्या नविन लाल रंगाची गोष्ट सांगणारे मुक्तक लेखन भावनापूर्ण आहे.
सहमत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

7 Apr 2009 - 2:21 am | धनंजय

कल्पक आहे. छान!

(पण "फार फार वर्षांपूर्वी... सगळे... सुखाने रहात होते... सगळे आपापल्या जागी ...मजेत..." ही रम्य कल्पना इतिहासाच्या विपरित आहे. काव्यासाठी ठीक असला, तरी कृतीशीलतेसाठी हा कल्पनाविलास ठीक नाही. अशी कुठली पूर्वीची स्थिती कल्पिली, तर आपण आजच्या समस्यांसाठी भूतकाळातल्या समाजाकडे आदर्श म्हणून बघू. काही वेगळीच समाजव्यवस्था होऊ घातली, तर ती त्या रम्य भूतकाळाच्या मृगजळापासून दूर जाईल. आपण त्या नव्या व्यवस्थेचा विरोध करू. काव्य म्हणून रूपक आवडले आहेच. तरी विश्लेषण किंवा प्रबोधन, दोन्ही हेतूंसाठी हे रूपक मला प्रभावी वाटत नाही.)

बेसनलाडू's picture

7 Apr 2009 - 2:57 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

क्रान्ति's picture

7 Apr 2009 - 7:57 am | क्रान्ति

विषय चांगला मांडला आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

सुनील's picture

7 Apr 2009 - 10:22 am | सुनील

कल्पना उत्तम. बाकी पहिल्या दोन ओळींविषयी, वर धनंजय यांनी दिलेल्या प्रतिक्रियेशी सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.