तुझ्या मनात

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
6 Apr 2009 - 12:55 pm

आले होते सहजच तुझ्या मनात
फेरफटका उगाच मारायला
किती खोल आहे तुझ मन
ते आत डोकावायला
गांगरून गेले आत मी
कुठल्यातरी कोड्यात फसले मी
कोड्यात होती खुप घरं
प्रत्येक घराला वेगवेगळे रंग
प्रत्येक घराला वेगवेगळे रस्ते
मध्येच कुठे कुठे बांधही घातलेले
घर होत प्रतिष्ठेचं, कर्माचं
खुप उंच आणि पसार्‍याचं
घर होत आत्पेष्टांचं, मैत्रीचं
जिव्हाळा आणि कर्तव्याने भरलेलं
एक होत तुझ्या छंदाच, स्वप्नांचं
सुबक पण कुंपण घातलेलं
एक होत सामाजीक बांधिलकीचं
गोर गरीबांच्या आश्रिवादाचं
त्यातच एक घर माझही होतं
सुंदर, प्रितीने सजवलेलं
प्रेमाच्या बगिच्याने फुलवलेलं
कोड्याचा रस्ता सुटणारं.

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

सागर's picture

6 Apr 2009 - 1:09 pm | सागर

जागुजी ...
आधीच्या कवितेप्रमाणेच ही पण छान आहे.
पण शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त कराव्यात ही इच्छा
जसे,
घर होत आत्पेष्टांच, मैत्रीच घर होत आप्तेष्टांचं, मैत्रीचं

आणि सगळीकडे च , ल अशा शब्दांवर अनुस्वार दिलात तर अर्थपूर्ण होईन
जसे
आश्रिवादाच - आशिर्वादाचं

सजवलेल -सजवलेलं
फुलवलेल - फुलवलेलं

शुद्धलेखनाच्या चुकांमुळे अर्थ समजायला थोडा वेळ लागतो आहे :)
पण कविता छान आहे....

सागर

सूहास's picture

6 Apr 2009 - 5:55 pm | सूहास (not verified)

त्यातच एक घर माझही होतं
सुंदर, प्रितीने सजवलेलं
प्रेमाच्या बगिच्याने फुलवलेलं
कोड्याचा रस्ता सुटणारं.

छानच॒॑

सुहास

क्रान्ति's picture

6 Apr 2009 - 7:18 pm | क्रान्ति

फेरफटका खरच छान आहे. खूप आवडली कविता.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

शितल's picture

6 Apr 2009 - 7:44 pm | शितल

कविता आवडली. :)

प्राजु's picture

6 Apr 2009 - 8:31 pm | प्राजु

आवडली कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जागु's picture

7 Apr 2009 - 10:57 am | जागु

सागर, सुहास, क्रांती, शितल, प्राजू धन्यवाद.