सेल्फ-फुलफिलिंग प्रॉफेसी

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
4 Apr 2009 - 5:23 pm

बरेच व्यवस्थापक ( हा शब्द आवडत नसल्यास तो असा वाचा- मॅनेजर, बॉस, पी. एम.) आपल्या कर्मचारींबद्दल काही खूणगाठी (मराठी- अझम्पशन) मनात ठेवतात. त्यांच्या ह्या त्या खूणगाठी काहींच्याबद्दल चांगल्या असतात तर काहिंच्याबद्दल चांगल्या नसतात.

आपण चांगल्या नसलेल्या खूणगाठी व्यवस्थापकच्या मनात का निर्माण होऊ शकतात त्या एका शक्यतेबद्दल बघू.

व्यवस्थापक (मनातला विचार): विनय हा एक फार आळशी माणूस आहे आणि त्याच्याकडून काम घ्यायचे असेल तर लक्ष द्यावे लागते

व्यवस्थापकाची प्रतिक्रिया (मराठीत- बिहेवियर): मी विनयला मला जे हवे आहे ते नेमकेपणे सांगतो व तो ते करतो की नाही हे पाहतो

विनयचा दृष्टीकोन: माझा बॉस माझ्यावर एखाद्या पोलिसासारखे लक्ष देतो

विनय (मनातला विचार): माझा बॉस मला माझ्या मनाप्रमाणे कधीही काम करु देत नाही

विनयची प्रतिक्रिया: मी बॉसला टाळतो आणि जर समोर आलाच तर तो सांगेपर्यंत काहीच स्वतःहून करत नाही

व्यवस्थापकाची प्रतिक्रिया: पहा! माझे बरोबर आहे की नाही?

आणि मग हे दुष्टचक्र (सेल्फ-फुलफिलिंग प्रॉफेसी) चालूच राहते.

तात्पर्य?

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

संजय अभ्यंकर's picture

4 Apr 2009 - 9:14 pm | संजय अभ्यंकर

भागवत साहेब,
आपण वर्णिलेला आणी अशाप्रकारचे अनेक तिढे आपल्याला व्यवहारी जगात अनुभवास येतात.
यातुनच परस्पर संबंधातले दुष्ट-चक्र चालू होते.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मनीषा's picture

4 Apr 2009 - 9:29 pm | मनीषा

हे "दुष्ट - चक्र" रोजच्या व्यवहारातही अनुभवास येते ...
त्याला उपाय (सोल्युशन) म्हणजे कोणी एकाने पडते घेणे अथवा आपले वागणे बदलणे (म्हणजे त्या व्यक्तिच्या बोलण्यास अथवा वर्तनास असणारा आपला प्रतिसाद (प्रतिक्रिया) बदलणे )....
पण ते खूप अवघड आहे --- आणि यात सुद्धा पहिल्यांदा कोणी बदलायचे हा प्रश्न येउ शकतोच ...

अजय भागवत's picture

4 Apr 2009 - 9:47 pm | अजय भागवत

त्याला उपाय (सोल्युशन) म्हणजे कोणी एकाने पडते घेणे
आणि यात सुद्धा पहिल्यांदा कोणी बदलायचे हा प्रश्न येउ शकतोच ...

संकेत असा आहे की, वरील उदाहरणात बॉसने ह्याचा विचार करावा व ह्याच सेल्फ-फुलफिलिंग प्रॉफेसीचा उलटा वापर करुन धन परिणाम मिळवावे.
घरामधे जरा खुल्या वातावरणात चर्चा होणे आवश्यक आहे व दोघांनी एकमेकांना प्रश्नोतराच्या माध्यमातुन सावरावे.
इतर सेट-अप मधे खरच अवघड आहे व अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. - जे तुम्ही म्ह्णणालात.

धनंजय's picture

5 Apr 2009 - 5:00 pm | धनंजय

अशा रीतीने एक सामान्य समस्या मांडली आहे.

व्यवस्थापनातच नव्हे, तर सर्वच मानव्य संबंधांमध्ये असा प्रकार दिसत असावा. प्रेमीजन मुद्दामून एकमेकांना आवडेल असे वागतात. उलट शंकेखोर नवर्‍याची बायको त्याला "ऑफिस-मैत्रिणीबरोबर बाहेर गेले" हे सुद्धा सांगणार नाही - तो "मित्राबरोबर" असा संशय घेईल म्हणून. आणि नवरा मात्र "काहीच सांगितले नाही" म्हणून संशय वाढवेल. पुन्हा सेल्फ फुल्फिलिंग प्रॉफेसी. (मराठीत - स्वतःला साधणारे भाकित?)

अजय भागवत's picture

5 Apr 2009 - 5:59 pm | अजय भागवत

मानवी भाव-भावना व त्यातुन होणारे प्रश्न ह्याचा व्यवस्थापनात खूप बारकाईने विचार करावा लागतो तरच त्यात यश मिळते. आपण जसे म्हणालात त्याप्रमाणे निश्चितच त्याचा वापर इतर वेळीही होऊ शकतो.

पण गम्मत अशी आहे की, ज्याठिकाणी तो प्रामुख्याने व्हावा असे आपल्याला वाटते तेथे ह्याचा वापर होत नाही असे बऱ्याचदा दिसते.

मला कधी-कधी असेही दिसले आहे की, बॉसला हे सगळे माहित आहे पण तरीही त्याचा वापर होत नाही. तर काही ठिकाणी वापर केल्यानंतरही फायदा झालेला दिसला नाही. शेवटच्या प्रसंगात जेव्हा कर्मचाऱ्यांनाही व्यवस्थापनाचे शिक्षण दिले तेव्हा त्यांना व्यवस्थापक का, केव्हा, व कसा विचार करतो हे त्यांना समजायला मदत झाली व तणाव निवळला.