आपणच आपल्याला लिहलेली
पत्रं वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावित वा~यावर पानं....
थोडसं हसून आपणच आपल्याला
सांगावी कधीतरी एखादी गोष्ट
आपणच गावं आपल्यासाठी
रिमझिमत्या स्वरांच एखादं गाणं.......
आपणच जपावेत मनात;
वा~यावर झुलणारे गवताचे तुरे
एखादी धावणारी पायवाट, अन्
जपावेत काही नसलेले भास्......
जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील
अशी जागा सगळ्यानाच सापडत नाही
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना
आपणच द्यावेत थोडेसे श्वास........
प्रतिक्रिया
3 Apr 2009 - 9:04 pm | प्राजु
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना
आपणच द्यावेत थोडेसे श्वास........
ही ओळ जास्ती आवडली. कल्पना छान आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Apr 2009 - 9:16 pm | शितल
कविता छान आहे. :)
4 Apr 2009 - 5:34 pm | क्रान्ति
सुरेख कविता. "जपावेत काही नसलेले भास" अप्रतिम!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
4 Apr 2009 - 10:49 pm | लवंगी
विषय आवडला.
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना
आपणच द्यावेत थोडेसे श्वास........
अतिशय सुरेख..
5 Apr 2009 - 4:09 pm | सुधीर कांदळकर
मात्र माझ्यासाठीं मस्त फूल उमललें आहे. छान कविता.
सुधीर कांदळकर.