पहावं ते नवलंच..

अनामिक's picture
अनामिक in जनातलं, मनातलं
3 Apr 2009 - 4:59 am

मी एका कंस्ट्रक्शन कंपनीत काम करतो, आणि थोडक्यात सांगायचे तर सध्या माझे कामाचे स्वरूप नवीन प्रोजेक्ट्स मिळवण्याकरता त्यांचे एस्टीमेट आणि प्रपोजल तयार करणे असे आहे. तर, असाच एक संभाव्य प्रोजेक्ट म्हणजे ऍटलांटा एरियात होणाऱ्या एका प्राथमिक शाळेचे रिनोवेशन. इमारतीची सद्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी सोमवारी या शाळेत गेलो होतो. शाळेभोवती चक्कर मारत असताना शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असणारा, आणि बाहेरच्या दिशेने उघडणारा, एक दरवाजा दिसला (खालचा फोटो बघा) आणि हसतच सुटलो .... फोटो बघा तुम्हीसुद्धा हसत सुटाल... दरवाज्या बाहेर खाली उतरण्यासाठी ना जीना ना अजून काही व्यवस्था... म्हणजे आतून दरवाजा उघडला आणि बाहेर पाऊल टाकले की थेट पहिल्या मजल्यावर... आहे की नाही गंमत? हा अनोखा दरवाजा तुमच्या बरोबर शेअर करावा वाटला म्हणून इथे देत आहे... बघा आणि घ्या हसून..!!!

ह्म्म्म्म, आणि आता हसून झाले असेल तर वस्तुस्थिती सांगतो... हा दरवाजा शाळेच्या मेकॅनिकल रूमचा म्हणजे जिथे बॉयलर किंवा इतर एच. वि. ए. सी इक्विपमेंट्स इंस्टॉल केलेत त्या रूमचा आहे. अर्थात या रुमला आतूनही प्रवेश आहे, पण जर का या इक्विपमेंट्स मध्ये काही बिघाड झाला आणि बदलायची वेळ आली तर नवे इक्विपमेंट या खोलीत सहज, म्हणजे जास्त कष्ट न घेता, हालवता आले पाहिजे म्हणून ही व्यवस्था. असे असले तरी प्रथम दर्शनी हा दरवाज्याने पाहणार्‍याला अचंबित न केले तर नवल!

-अनामिक

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

3 Apr 2009 - 5:16 am | प्राजु

असं टायटल द्यायचंस..
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

3 Apr 2009 - 5:20 am | अनामिक

धन्यु! बदल केला आहे...

-अनामिक

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Apr 2009 - 9:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त निरीक्षण! पुढच्या स्पष्टीकरणातून आणखी एक गोष्ट जाणवली, सोयीचा विचारही पुरेपूर केला आहे.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

आनंद घारे's picture

3 Apr 2009 - 4:54 pm | आनंद घारे

कोणतीही अवजड यंत्रसामुग्री तिच्या नियोजित जागी नेऊन ठेवण्यासाठी सोय करावीच लागते. आधी ती आपल्या जागी नेऊन ठेवली आणि नंतर आजूबाजूच्या भिंती बांधल्या असे अगदी क्वचित ठिकाणी होते. त्या जागी सुद्धा लेखकाने लिहिल्याप्रमाणे "पण जर का या इक्विपमेंट्स मध्ये काही बिघाड झाला आणि बदलायची वेळ आली तर नवे इक्विपमेंट या खोलीत सहज, म्हणजे जास्त कष्ट न घेता, हालवता आले पाहिजे म्हणून ही व्यवस्था" केली जाते. शक्य तोवर अशी यंत्रसामुग्री तळमजल्यावर आणि इमारतीच्या मागच्या बाजूला ठेवली जात असल्यामुळे त्याचे द्वार डोळ्यात भरत नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/