पहिली भेट

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
1 Apr 2009 - 2:56 pm

आठवते तुला भेट आपली पहिली
पहिल्या भेटीतली गुपिते पहिली
हवे तर विचार त्या लाटांना
रोजच येतात त्या किनार्‍याच्या भेटीला
सुर्यही तुझी वाट पाहत रेंगाळला होता
तू आलेला पाहुन निर्धास्त मावळला होता
यायला तुला खुप उशिरच झाला होता
पण तुझ्या आगमनात अपराधी भावच नव्हता
माझा रागही मी तेंव्हा व्यक्त केला नव्हता
जवळून तुला न्याहाळण्याचा धिरही होत नव्हता
बसलो होतो आपण ज्या दगडावर, विचार त्याला
माझा थरथरता देह त्यानेच सावरला होता
विचार त्या घोंघावत्या वार्‍याला
तो ही सांगेल माझी ती ओशाळली स्थिती
जेंव्हा तू हात माझा धरलास बांगडी पाहण्यासाठी
दुरावा दुर करण्याचे तुझेही ते होते निमित्त
पण तुझ्यात हरवले होते तेंव्हा एकचित्त
ज्या अंधाराने आपली मने जुळवली
आजही हसतो तो माझ्याशी
तो रोजच आठवण करुन देतो
आपल्या पहिल्या भेटीची

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

1 Apr 2009 - 6:59 pm | क्रान्ति

सुन्दर! पहिल्या भेटीच्या आठवणी तशाही मोहकच असतात.
:)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

पक्या's picture

5 Apr 2009 - 3:40 am | पक्या

छान.

मदनबाण's picture

5 Apr 2009 - 3:58 am | मदनबाण

पहिल्या भेटीच वर्णन छान आहे. :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

शितल's picture

5 Apr 2009 - 6:51 am | शितल

पहिली भेट मस्त. :)
कविता आवडली.

सुधीर कांदळकर's picture

5 Apr 2009 - 3:11 pm | सुधीर कांदळकर

उशीर झाल्यानंतर निर्धास्त मावळ्णें, दगडाचें थरथरता देह सांभाळणें, अंधाराचें हसणें, छानच.

सुधीर कांदळकर.

जागु जी...

खूपच सुंदर... पहिली भेट काही खासच असते :)
मुक्तछंदात प्रेमकविता अधीक खुलतात असे माझे वैयक्तीक मत आहे, अफाट प्रेमाला कोणत्याही छंदात बांधता येत नाही...
प्रेम हे जसे अनिर्बंध असते तसेच प्रेमाच्या कविताही अनिर्बंध असाव्यात...

माझ्याही पहिल्या भेटीच्या आठवणी जाग्या झाल्या.. ;)
मनापासून धन्यवाद ...

सागर

जागु's picture

6 Apr 2009 - 1:06 pm | जागु

क्रांती, पक्या, मदनबाण, शितल, सुधिर, सागर तुम्हा सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.