मन...
हलक्याश्या फुंकरीने दूर उडणारं
दिशाहीन कुठेही भरकटत जाणारं
स्वप्नाच्या देहात जगणारं
वास्तव्याच्या खडकावर वसणारं !
मन...
तप्त निखार्यातून पेट घेणारं
दूर क्षितीजाला जाऊन भिडणारं
सागराच्या लाटांवर फेसाळणारं
कधी उंच सिंहासनावर बसणारं!
मन...
प्रितीच्या पाझरात चिंब भिजणारं
भावनांच्या प्रवाहात वाहून जाणारं
स्वतःशीच कुजबूजत राहणारं
हलकेच बिनस्पर्शी चुंबणारं !
मन... स्वतःच अस्तित्व नसणारं !