उस्फुर्त प्रेरणा
देवानं तोतया कवींना असं का बनवलं?
ऊठ सुट येता जाता काहीही लिहाव
सगळेच स्वतःला कलाकार समजतात
पण मिपाकरांनीच का ते वाचाव?
प्रतिसादासाठी गळे काढावे, कधी कंपुबाजी म्हणुन नाचावे
प्रत्येक विडंबन म्हणजे पाणचटपणावर फोडणी
दळभद्री मणभर खीर, कुणाला पचलीच नाही
पण तोतया कवींच्या राजालाच का बरं खुमखुमी!
कुणी झोपेत कविता लिहितं
कुणी नाइलाजानं कवी बनतं
कुणी शब्द चोरुन कविता पाडत असते.
अशा कवितांपेक्षा विडंबनांना जास्त चव नसते?
कुणी "लिहू नका' सुचवू पाहतं
क्वचित कुणी थेट हल्ला करतं
कारण खर्या कवी कवियित्रींचे कवीपण
ह्या गर्दीत कुठेतरी हरवु पहातं
सगळीच विडंबने आनंदाने केलेली नसतात
दर दोन मिनिटाला नविन काव्ये होतात
तोतया कवींच्या राजाने रडुबाई बनु नये
उगाच विडंबकांच्या नादी लागतात
ही कविता न समजल्यास किंवा पचल्यास लेखक/ प्रेषक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.