आपलं माणूस

संगीता's picture
संगीता in जे न देखे रवी...
30 Jan 2008 - 10:27 pm

ही कविता माझ्या मैत्रिणीने लिहिली आहे.

आनंदात असताना
सुखात भागीदार
कुणीही चालतं
पण दु:खात रडताना
अश्रू पुसायला
आपलंच माणूस लागतं

घोळक्यात असताना
दंगामस्ती करायला
कुणीही चालतं
पण एकांतात असताना
गुपित सांगायला
आपलंच माणूस लागतं

वरवरच्या जखमांना
फुंकर घालायला
कुणीही चालतं
पण मनात खोलवर
रुतलेल्या जखमांना
आपलंच माणूस लागतं

काळाच्या अंधारात
विरणार्‍या आठवणींसाठी
कुणीही चालतं
पण मनाच्या कप्प्यात
घर करण्यासाठी
आपलंच माणूस लागतं

कायमचंच रुसण्यासाठी
अबोला धरण्यासाठी
कुणीही चालतं
पण आपल्यावर रुसण्यासाठी
रुसवा आपला काढण्यासाठी
आपलंच माणूस लागतं

यशाच्या शिखरावर
बेहोश होण्यासाठी
कुणीही चालतं
पण अपयशाच्या दरीत
तोल सावरण्यासाठी
आपलंच माणूस लागतं

------ प्रगती

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

वरदा's picture

30 Jan 2008 - 10:55 pm | वरदा

फार छान कविता आहे...अतिशय अर्थपूर्ण

विसोबा खेचर's picture

30 Jan 2008 - 11:01 pm | विसोबा खेचर

घोळक्यात असताना
दंगामस्ती करायला
कुणीही चालतं
पण एकांतात असताना
गुपित सांगायला
आपलंच माणूस लागतं

यशाच्या शिखरावर
बेहोश होण्यासाठी
कुणीही चालतं
पण अपयशाच्या दरीत
तोल सावरण्यासाठी
आपलंच माणूस लागतं

वा! वरील दोन कडवी खूप आवडली. सुरेख कविता..

संगीताताई, कृपया आपण प्रगतीजींपाशी मिपा परिवारातर्फे कृतज्ञता व्यक्त करावी..

तात्या.

संगीता's picture

30 Jan 2008 - 11:18 pm | संगीता

ही कविता तिने खूप वर्ष्यांपूर्वी लिहली होती.
सध्या तिचे लिहणे बंद झाले आहे.

आपल्या प्रतिसादामुळे ती पुन्हा लिहायला लागेल अशी आशा वाटते आहे.

प्राजु's picture

30 Jan 2008 - 11:06 pm | प्राजु

यशाच्या शिखरावर
बेहोश होण्यासाठी
कुणीही चालतं
पण अपयशाच्या दरीत
तोल सावरण्यासाठी
आपलंच माणूस लागतं

ही ओळ तर अगदी मनातली आहे ...
प्रगतीला धन्यवाद सांग.
- प्राजु

manojb_007's picture

31 Jan 2008 - 4:55 pm | manojb_007

कायमचंच रुसण्यासाठी
अबोला धरण्यासाठी
कुणीही चालतं
पण आपल्यावर रुसण्यासाठी
रुसवा आपला काढण्यासाठी
आपलंच माणूस लागतं

हे कडव अप्रतिम आहे

स्वाती राजेश's picture

31 Jan 2008 - 5:13 pm | स्वाती राजेश

मस्त कविता लिहिली आहे.
आवडली.

विवेकवि's picture

31 Jan 2008 - 5:58 pm | विवेकवि

मस्त कविता लिहिली आहे.
आवडली.
असो............
मिनु जोशी.