देवाने माश्यांना अस का बनवल?
की बघताच मन पत्येकीवर चिडायच
सगळ्याच मेल्या नकोनकोश्या वाटायच्या
मग कोणा एकाच्याच ताटात का पडायच?
कोणाचे पाय, तर कोणाचे पंख
प्रत्येकीची काहीतरी वेगळीच गुणगुण
दरीद्री मेली एका जागेवर बसत नाही
पाहताच वाजु लागते आजाराची धुन
कोणी गुणगुणून नकोस करत
कोणी लाजुन पांघरूणात शिरत
प्रत्येकीची खुबी निराळीच असते
मग आपली निद्रा कुठे आपल्याजवळ उरते
कोणी गूणगुणून गार करत
कोणी भुण्भूणून वार करत
किती अदा त्रासवण्याच्या असतात
मन हे वेडे प्रत्येक नखर्यात फसत
कचर्यातल्याही माशा कमाल करतात
नकोनको म्हणताना तोंडावर येऊन बसतात
कोणाकोणाला नजर द्यावी
एकसाथ सर्वच नाका तोंडाला घेरतात
----------------------------------------------------------------------------------------------
माश्यांमुळे त्रस्त एक मुंबईकर :)
प्रतिक्रिया
28 Mar 2009 - 1:47 pm | अनंता
गुणगुण आवडली ;-)
बाकी ह.घ्या. ही. न. वि.