अवकाशातले पाहुणे

जिवाणू's picture
जिवाणू in जनातलं, मनातलं
27 Mar 2009 - 2:22 pm

नुकतेच ISRO ने एक प्रयोग हाती घेतला होता ,तो यशस्वी झाला आहे. अवकाशात तीन नविन प्रजातितले जिवाणु आढळले आहेत.त्यान्ची नावे शास्त्रज्ञान्च्या नावावरुन ठेवण्यात आली आहेत, नावे पुढिल प्रमाणे,
Janibacter hoylei,
Bacillus isronensis ,
Bacillus aryabhata
,. बर्याच मिपाकराना या प्रयोगाबद्द्ल माहिती असेल /नसेल , म्हणुन कालच्या दै.सकाळ मधील डॉ. योगेश शोचे ह्यान्च्या ह्या लेखाची हि लिन्क द्याविशी वाटली.
http://beta.esakal.com/2009/03/26114257/editorial-earth-and-environmen.html

विज्ञानबातमी

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

27 Mar 2009 - 3:58 pm | लिखाळ

वा ! ही बातमी वाचली होती पण आपण दुव्यामध्ये दिलेला इ-सकाळचा लेख वाचला नव्हता. लेख फार छान आणि माहितीपूर्ण आहे.
डॉ. शौचे आणि सहकार्‍यांचे अभिनंदन !
लेखाच्या दुव्याबद्दल आभार.
-- लिखाळ.

सुधीर कांदळकर's picture

27 Mar 2009 - 10:39 pm | सुधीर कांदळकर

त्रोटक बातमी लोकसत्तेत वाचली होती. दुव्यावर जास्त तपशील आहेत. खगोल वर्षांतील चांगली घटना.

धन्यवाद.

सुधीर कांदळकर.

मदनबाण's picture

28 Mar 2009 - 1:54 am | मदनबाण

जिवाणूराव आपल्या ३ नविन मित्रांची ओळख करुन दिल्याबद्धल धन्यवाद... ;)

(कुठे बरं गेला माझा सुक्ष्म दर्शक....? )
मदनबाण.....

जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
जालावरुन सभार...

जिवाणू's picture

30 Mar 2009 - 10:40 am | जिवाणू

लिखाळ,सुधीर कांदळकर ,मदनबाण ,प्रणीती आपल्या सर्वान्चे प्रतिक्रियान्बद्द्ल धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Mar 2009 - 2:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही पहा इस्त्रोच्या वेबसाईटवरची बातमी.

Janibacter hoylei हे नाव प्रा. नारळीकरांनी आपले गुरू फ्रेड हॉयल यांच्या सन्मानार्थ दिलं आहे. पुढची दोन नावं, इस्रो आणि आर्यभट्ट यांच्या सन्मानार्थ आहेत.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

धनंजय's picture

31 Mar 2009 - 12:11 am | धनंजय

इस्रो च्या वार्तेवरून काही तपशील कळत नाहीत.

जिवाणूंमधील १६-एस आरएनए च्या विश्लेषणाने असे म्हणतात, की त्यातील अक्षरक्रम पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कुठल्याच ज्ञात जिवाणूसारखे नाही.

पण त्या तीन विषाणूंच्या नावातील प्रथम शब्द (म्हणजे अन्य जिवाणूंशी नाते सांगणारे नाव) इस्रो येथील वैज्ञानिकांनी दिलेले आहे. जॅनिबॅक्टेर (हा एक) आणि बॅसिलस (हे दोन प्रकार). त्यामुळे पृथ्वीवरील जॅनिबॅक्टेर आणि बॅसिलस या प्रकारांशी (अनुक्रमे) काहीतरी नाते सापडले असणार असे वाटते.

याबद्दल शोधनिबंध अजून प्रसिद्ध झालेला नाही (किंवा मला सापडत नाही). तो वाचून नेमके काय ते कळू शकेल.

या महत्त्वाच्या प्रयोगाबद्दल आणि शोधाबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन!