अशक्य केवळ

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
25 Mar 2009 - 4:20 pm

तुझाच वावर मनात केवळ
निभाव आता अशक्य केवळ

नको अता ही उगाच जवळिक
पुन्हा मनाचे दुभंग केवळ

तुझ्यामुळे ही फितूर गात्रे
अता गुलामी तुझीच केवळ

तुझी जराशी झुळूक यावी
कसे जगावे उन्हात केवळ

नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ

जयश्री अंबासकर

गझलप्रकटन

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

25 Mar 2009 - 4:26 pm | दत्ता काळे

तुझ्यामुळे ही फितूर गात्रे
अता गुलामी तुझीच केवळ

- हे तर केवळ छानच !

क्रान्ति's picture

25 Mar 2009 - 5:52 pm | क्रान्ति

अप्रतिम गझल! सगळे शेर अगदी काबिल्-ए-तारीफ! खासच!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

अनिल हटेला's picture

26 Mar 2009 - 12:12 pm | अनिल हटेला

सुंदर गझल !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

तिमा's picture

25 Mar 2009 - 7:45 pm | तिमा

गझल का कविता आपल्याला काय कलत नाय, पन जे काई आलंय त्ये अगदी आतून आल्यासारखं वाटताय!

संदीप चित्रे's picture

25 Mar 2009 - 7:50 pm | संदीप चित्रे

>> नको अता ही उगाच जवळिक
>> पुन्हा मनाचे दुभंग केवळ

हे तर खूपच आवडलं जयश्री
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

शितल's picture

25 Mar 2009 - 8:11 pm | शितल

सहमत. :)
जयवीताई,
मस्त गझल. :)

प्राजु's picture

25 Mar 2009 - 7:50 pm | प्राजु

खत्तरनाक !! काय जबरदस्त लिहिलं आहेस जयूताई!!!
एकदम फन्डू!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

25 Mar 2009 - 8:34 pm | मदनबाण

व्वा...अप्रतिम !!! :)

तुझी जराशी झुळूक यावी
कसे जगावे उन्हात केवळ

नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ
सॉलिल्ल्ल्ल्ल्ड...

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

टिउ's picture

25 Mar 2009 - 10:46 pm | टिउ

नको अता ही उगाच जवळिक
पुन्हा मनाचे दुभंग केवळ

मार डाला!!!

सहज's picture

26 Mar 2009 - 10:17 am | सहज

कविता आवडली.

हेरंब's picture

26 Mar 2009 - 11:59 am | हेरंब

कविता लाखांत एक आहे. कवितेवरुन 'त्याचे' व्यक्तिचित्र असे वाटते,
अशी कशी तू
भोळीबावळ
स्वार्थच होता
हेतू केवळ
भ्रमरवृत्ती मी
चंचल केवळ
ऊरात नसता
नाटक केवळ
किती मोजु मी
संख्या केवळ
हिशोब कसले
निरोप केवळ!

जागु's picture

26 Mar 2009 - 1:38 pm | जागु

सुंदर कविता.

जयवी's picture

26 Mar 2009 - 2:04 pm | जयवी

खुश कर दिया यारो.......!!

तहे दिल से शुक्रिया :)

विसोबा खेचर's picture

26 Mar 2009 - 5:15 pm | विसोबा खेचर

जयू,

नेहमीप्रमाणेच सुरेख गझल..

तुझाच वावर मनात केवळ
निभाव आता अशक्य केवळ

या पहिल्याच ओळी अप्रतीम! जियो...

आपला,
(जयूचा फ्यॅन) तात्या.

सुधीर कांदळकर's picture

26 Mar 2009 - 5:54 pm | सुधीर कांदळकर

उधारी हे शेर आवडले.

छान.
सुधीर कांदळकर.

चन्द्रशेखर गोखले's picture

29 Mar 2009 - 7:19 pm | चन्द्रशेखर गोखले

केवळ अप्रतिम !!!

चंद्रशेखर महामुनी's picture

29 Mar 2009 - 11:31 pm | चंद्रशेखर महामुनी

सर्वांनी सगळेच सांगितले.... आता मी वेगळे काय सांगु....?
झकास !

उत्खनक's picture

19 Jun 2015 - 3:06 pm | उत्खनक

जबराट लिहिलेले आहे..
खूप आवडले. :)

अप्रतिम .. तेंव्हा ही वाचुन छान वाटले होते .. आजही छान वाटलेच