आज प्रो.देसायांच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस उजाडला. महिन्याला शेकडो डॉलर देऊन दोघांसाठी खाजगी विम्याचा हाप्ता द्दायला पैसा खूपच खर्च व्हायचा.आज पासून सरकारने त्यांना मोफत विमा द्दायचा निर्णय कळवला. हेल्थ स्कीममधून सिनियर सिटीझननां ही सवलत होती.
भाऊसाहेब मला फोन करून म्हणाले,
" जुने दिवस आता भुलायला पाहिजेत. काळजी वाचून जगायला पाहिजे.
उद्दा जेव्हा तळ्यावर भेटू तेव्हा एक कविता लिहून आणा जी ह्या घटनेशी समर्पक असेल.
मला त्यांचे,
"दिवस भुलायचे,काळजीवाचून जगायचे"
हे शब्द सारखे मनात घोळू लागले.आणि पाडगांवकरांच्या त्या गाण्याची याद आली.
(दिवस तुझे फुलायचे
झोपाळ्यावांचून झुलायचे)
आणि मग अशी कविता सुचली.ती ऐकून दुसर्या दिवशी प्रो.देसाई फारच खूष झाले.
दिवस जूने भुलायचे
काळजी वाचून जगायचे
स्वपनात मश्गूल होणें
सुखाची अपेक्षा करणे
सुखात दिवस काढायचे
काळजी वाचून जगायचे
झोपण्या सुंदर खोली
उबदार अंगावर शाली
श्वासात जीवन वेचायचे
काळजी वाचून जगायचे
थरारे मानेचा भार
सोसेना वेदना फार
मुलांनी जवळ रहायचे
काळजी वाचून जगायचे
माझ्या ह्या खूर्ची पाशी
थांब तूं जराशी
पापण्या मिटून हंसायचे
काळजी वाचून जगायचे
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
25 Mar 2009 - 6:01 pm | क्रान्ति
मस्त. अगदी समर्पक कविता!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
28 Mar 2009 - 10:34 pm | सुशील
सुंदर कविता. पार्श्वभुमी देखिल आवडली.
29 Mar 2009 - 8:06 am | प्राजु
त्या पार्श्वभूमीवर वाचल्यामुळे एकदमच आवडले. :)
पापण्या मिटून हसायचे... हे मस्त!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Mar 2009 - 9:15 am | श्रीकृष्ण सामंत
आपणा सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून बरं वाटलं
आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com