प्रतिक्षा.....!
प्रतिक्षेत सखे तुझ्या.. कसे मन.. सैरभैर झाले....
ओठांवर मग.. तव विरहाचे.. आर्त गीत उमटले...
नकळत होई भास पुन्हा ग... तव स्पर्शाचा क्षणोक्षणी....
मंद चंदनी गंध तुझा मज... लावी पिसे ग.. मनोमनी..
आतुर तव भेटीला नभ.. मृग थेंब बनुनी बिलगले..
ओठांवर मग ....... [१]
वाटे मजला सौधामध्ये... असशील बहुधा तु अजुनी...
वळूनी बघता होई हसे.. मज चंद्र खुणावे..तो गगनी...
त्या बिंबातुन तव प्रतिमेचे... रुप निशी प्रकटले...
ओठांवर मग .......[२]
रेशीमस्पर्शी मीठीत तुझीया...वाटे मज मी.. स्वर्गी असे..
तुझ्या नि माझ्या प्रीतिचे गे... सुंदर घरकुल मनी वसे..
परि ना कळले.. धुंद उधळले.. क्षण कधी ते.. निसटले..
ओठांवर मग .......[३]
- चंद्रशेखर