अर्थ

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
24 Mar 2009 - 11:30 am

मला साधे मराठी येते. मी लेखक आहे असा गैरसमज कधीच करुन घेतला नाही. माझी मिपाकरांना नम्र विनंती आहे की मला खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे. दोन दिवसापासुन डोक्याचा फार आणि पार खुळखुळा झालेला आहे. बर्‍याच जणाना विचारला पण नीटसे काय कळाले नाही. लिखाळ, व मुक्तसुनित ह्यानी अर्थ सांगितला. पण माझ्या डोक्यावरुन गेला. बहुधा तो अर्थ समजण्या इतके पुण्य कर्म मी आदल्या दिवशी केलेले नव्हते. दोष माझा.
"आम्ही लेखन शुचीता संभाळतो." ह्या वाक्याचा अर्थ काय?
म्हणजे नेमके काय करतात.
हे वाक्य एका मराठी संस्थळाच्या संपादकाने उच्चारलेले आहे.
वैधानिक इशारा: मला सर्व मराठीसाठी झट्णार्‍या संस्थळाबद्दल आदर आहे. अशी बरीच आहेत. ती नेमकी कुठली आहेत हे जाणुन घेण्यात मला रस नाही.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

प्राध्यापक साहेबांनाच विचारा ना ते सान्गतिलच

अवलिया's picture

24 Mar 2009 - 11:52 am | अवलिया

नको तिथे जायला कुणी सांगितले ?

--अवलिया

चिरोटा's picture

24 Mar 2009 - 11:59 am | चिरोटा

शुचिता(शुध्ध ह्रुदय) म्हणजे शुद्धी ना? मग लेखन शुचिता म्हणजे शुध्ध लेखन.आन्ग्ल भाषेत puritanical का काय म्हणतात तसला प्रकार असावा.

आनंद's picture

24 Mar 2009 - 12:15 pm | आनंद

तुम्ही त्या संस्थाळाला काही लेख पाठवल्यावर ते असे म्हणाले का?

विनायक प्रभू's picture

24 Mar 2009 - 1:01 pm | विनायक प्रभू

मी कशाला पाठवतोय?
आधीच नियमावली सांगताहेत.
असो.

अनंता's picture

24 Mar 2009 - 1:23 pm | अनंता

"आम्ही लेखन शुचीता संभाळतो." ह्या वाक्याचा अर्थ काय?
म्हणजे नेमके काय करतात.
हे वाक्य एका मराठी संस्थळाच्या संपादकाने उच्चारलेले आहे.

उच्चारलेले म्हनजे तोंडाने बोललेय ना ?
तुम्हाला उद्देशूनच ना.

आता खरं खर् सांगुन टाका मास्तर कुठल्या विषयावरचा लेख होता ते.

नितिन थत्ते's picture

24 Mar 2009 - 2:01 pm | नितिन थत्ते

बहुधा फाट्यावर मारतो, बाझवला वगैरे शब्दांना बंदी असावी.

खराटा
(रंग माझा वेगळा)

नाहितर लोक दुरुपयोग करतात साईट्चा.
भेन्डि
(माझा दाखवायचा रंग वेगळा )

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Mar 2009 - 2:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काही प्रश्नः

१. तुम्हाला त्या वेबसाईटवर लिहायचं आहे का?
२. गरज कोणाला आहे, दुसर्‍या शब्दांत, "लेख लिहाल का" असा प्रश्न आला का "लेख लिहू का" असा प्रश्न विचारला?

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

विनायक प्रभू's picture

24 Mar 2009 - 3:37 pm | विनायक प्रभू

१. नाही
२. लेख लिहाल का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Mar 2009 - 3:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

१. जिस रास्ते जानाही नही उसका पता क्यू पूछ रहे हो?
२. त्यातून, त्यांनी विचारलं तर अटी तुम्ही घालायच्या का त्यांनी?

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

आम्ही लेखन शुचीता संभाळतो." ह्या वाक्याचा अर्थ काय?

भेन्डि

विनायक प्रभू's picture

24 Mar 2009 - 6:55 pm | विनायक प्रभू

चला एकदाचा अर्थ मिळाला.
प्रा.डॉ. नी खव मधे मला कळेल असा अर्थ सांगितला. एकंदरीत मला न झेपणारे प्रकरण.
त्या बरोबर 'साधन शुचीता' चा अर्थ पण सांगितला.
प्रा.डॉ.चे धन्यवाद.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Mar 2009 - 7:18 pm | परिकथेतील राजकुमार

आपल्या खव मधील अर्थ वाचला. भावला व पटला.
विशेषतः आपल्या कामातही (माध्यमांचे) पावित्र्य पाहिजे या अर्थाने साधनशुचिता शब्द वापरत असावेत...
हे वाक्य ज्ञानज्योती उजळुन गेले.
आज मला कळाले की लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा बायकोला फुले का वाहतो व बायको नवर्‍याला दुधाचा नैवेद्य का दाखवते ते.
बुद्धाला बोधी वृक्षाखाली साक्षात्कार झाला, मला तुमची खव वाचुन झाला !

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

संदीप चित्रे's picture

24 Mar 2009 - 7:26 pm | संदीप चित्रे

>> आज मला कळाले की लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा बायकोला फुले का वाहतो व बायको नवर्‍याला दुधाचा नैवेद्य का दाखवते ते.
=D> =D>