द हॅपनिंग...

भाग्यश्री's picture
भाग्यश्री in जनातलं, मनातलं
24 Mar 2009 - 1:28 am

मध्यंतरी जास्वंदीचे फळ ही कथा वाचनात आली.. त्या कथेची एकंदरीत कन्सेप्ट, व तिथले प्रतिसादांवरून कळले की द हॅपनिंग मधे असंच काहीसं आहे.. तेव्हापासून तो पाहायचाच होता..

परवा रात्री पाहीला..
काहीतरी होतं, सगळे नाहीसे होतात.. म्हणजे स्वत:ला मारून घेतात.. असं काहीतरी होतं या पिक्चरमधे आणि तो नाईट श्यामलनचा पिक्चर आहे, याव्यतिरिक्त काहीएक माहीत नसताना लावला....
SPOILER : (ज्यांनी पाहीला नाहीये हा मुव्ही, त्यांनी रहस्यभेद न होण्यासाठी पुढे नाही वाचलं तर खरं म्हणजे बरं पडेल.. काहीएक माहीत नसताना हा पिक्चर बघण्यात कदाचित जास्त मजा(भिती?) आहे !)


सुरवात सेंट्रल पार्क न्युयॉर्क.. रोजचीच सकाळ, लोकांचे नेहेमीचे रूटीन.. कोणी फिरायला आलेय, कोणी वाचत बसलेय.. पण अचानक लोकं डिसओरिएंटेड होतात.. पहील्यांदा असंबद्ध बडबड, कुठेतरी हरवलेली नजर.. मग पूर्णपणे सगळं जनजीवन ठप्प होऊन थांबते.. सगळे स्तब्ध..
आणि मग सिरिज ऑफ सुसायडल इव्हेंट्स.. सगळी लोकं, त्यांना जो जवळचा मरायचा मार्ग असेल तो स्विकारून मरतात...

म्हणजे... पिक्चरमधे दाखवलेली क्लेअर.. केसांची पीन मानेत खुपसते.. कुठल्याश्या बांधकामावरची लोकं, सटासट बिल्डींगवरून खाली कोसळतात.. ( हे सगळ्यात भयानक दृश्य! ) :|
हळूहळू समजते की हा एकप्रकारचा ऍटॅक आहे.. आधी तो टेररिस्ट ऍटॅक वाटतो.. काहीतरी बायोलॉजिकली केलेला... मूळात सगळीकडे गोंधळ सुरू होतो.. न्युयॉर्क सिटी खाली करण्याचा निर्णय होतो.. सगळे सामान घेऊन निघतात प्रवासाला.. जसाजसा प्रवास चालू होतो.. तशा न्युज येतात.. कुठला एरिआ अफेक्टेड झाला.. कोणी कसं मारले स्वत:ला !! (यात एका प्राणीसंग्रहालयातले दृश्य आहे.. तो माणुस स्वत:ला वाघ-सिंहाच्या हवाली करतो.. )

चित्रपटाचा नायक, त्याच्या बायको वर मित्राबरोबर निघालेला.. त्याचा मित्र (त्याच्या) बायकोला शोधायला जातो दुसर्‍या गावी.. तिथे तोही अफेक्टेड एरिआ.. मरायचे मार्ग शोधून मरतात सगळे...
इकडे नायक.. एका बॉटनिस्टच्या गाडीत बसून निघतो.. त्या बॉटनिस्टच्या मते, हे सगळं झाडं घडवून आणत आहेत.. ते कम्युनिकेट करत आहेत वार्‍याच्या मदतीने.. आणि काही विषारी केमिकल्स सोडून माणसांना मरायला भाग पाडत आहेत... नायक-नायिका त्याला सायकीक समजून त्याचे बोलणे हसण्यावारी सोडून देतात ..

पुढे बर्‍याच गोष्टी घडतात.. नायक सांईटीस्ट असल्याने जरा विचार करतो.. बॉटनिस्टचे म्हणणे कदाचित खरे असावे अशा मुद्द्याला येऊन थांबतो... त्यावरून असा निष्कर्ष काढतो, की जेव्हढी कमी लोकसंख्येची जागा, जितकी कमी लोकं तितका धोका कमी आहे.. म्हणून ग्रुप्स स्प्लिट करून फिरत राहतात... एका घरी पोचतात... तिथली जगाशी काहीही कॉन्टॅक्ट नसलेली बाई त्यांना थारा देते... जेवायला आणि रात्री राहायला जागा देते... पण व्हीमझिकल स्वभावाची चुणुक दाखवून देते... हे सगळे तिच्या घरी काहीतरी चोरी करायला आलेत ही तिची भावना...
शेवटी तीही खिडक्यांवर डोकं आपटून मरून घेते.... म्हणजे एकट्यालाही धोका आहेच... याचाच अर्थ नायक-नायिकाही धोक्यात आहेत... .....

असो...
शेवट सांगण्यात काही हशील नाही...

नाईट श्यामलनचे डोके काहीतरी भन्नाट चालते हे नक्की .. परंतू सिनेमा अर्धवट संपल्यासारखा वाटतो... हे का होते.. असे का झाले असावे याचा विचार आपणच करायचा.. माझं डोकं सतत विचार करत होते.. सतत तर्क.. की कदाचित आपण झाडांवर अन्याय केला त्याचा बदला... किंवा विज्ञानाने इतके बदल घडवून आणले की नेचरचा इम्बॅलन्स झाला... म्हणून झाडांमार्फत हा निसर्ग विज्ञानाच्या जनकाला मारून टाकतोय.. इत्यादी ! पण हे काहीही न सांगता पिक्चर संपतो.. इतकंच कळते की ही वॉर्निंग आहे... कशाची, कशाबद्दल माहीत नाही...
सिनेमा संपता संपता पॅरिस मधेही हे इव्हेंट्स सुरू झाल्याचे दाखवले आहे...

शेवट थरारता करण्यात यशस्वी झालाय श्यामलन... पण तर्क, अनुमान आपणच काढायचे ! त्यामुळे जरा अपूर्णता आहे या पिक्चरमधे...

तरीही मला आवडला... क्षणभरही मी हलू शकले नाही टीव्हीपासून.. इतके मृत्यूचे थैमान असून काही १-२ अपवाद सोडले तर किळसवाणा काही प्रकार नाही... भितीदायक आहे, पण विचार करायला लावणारा जास्त आहे... पिक्चरमधे जे दाखवले आहे त्याच्या भितीने झोप उडण्यापेक्षा, असे खरंच झालं तर या विचाराने झोप उडते... आपले खरेच कहीतरी चुकते आहे आणि आपण उद्यापासून शक्य तितक्या निसर्गाच्या कलाने राहीले पाहीजे वगैरे विचार येतात ! जे मला आवडलं! पिक्चरचे सीन्स लक्षात न राहता कन्सेप्ट लक्षात जास्त राहीली आहे...
चित्रीकरण अप्रतिम ! मी श्यामलनचा चित्रपट पहील्यांदा पूर्ण पाहीला... सिक्स्थ सेन्स, साईन्स मी नीट बसून नाही पाहीले कधी... पण हे जे काही पाहीले.. त्यावरून श्यामलनची डोकॅलिटीचा अंदाज आला...

मी सर्वांना रेकमंड करीन हा मुव्ही.. नक्की पाहा! माझ्याकडून १० पैकी ९...
१ मार्क कमी कारण आपल्याला फार विचारात पाडतो.. आणि अर्धवट संपल्यासारखे वाटते म्हणून !!

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

समिधा's picture

24 Mar 2009 - 2:14 am | समिधा

बघायला हवा.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

शितल's picture

24 Mar 2009 - 2:43 am | शितल

भाग्यश्री,
परिक्षण छान लिहिले आहेस. :)

जृंभणश्वान's picture

24 Mar 2009 - 4:03 am | जृंभणश्वान

फुल डोक्यावरुन गेला होता हा पिक्चर, आता परत एकदा बघायला हरकत नाही

दशानन's picture

24 Mar 2009 - 8:57 am | दशानन

माझ्या बी लै उंचावरुन विमान गेलं हुतं.. आता परत बघतो !

लैरी परिक्षण भाग्यश्री आवडलं बॉ !

सँडी's picture

24 Mar 2009 - 9:13 am | सँडी

"The Village" नंतर नाईट श्यामलन् चा चित्रपट पहाण्यात नाही, आठ्वण करुन दिल्याबद्दल धन्यवाद!

विसोबा खेचर's picture

24 Mar 2009 - 9:28 am | विसोबा खेचर

मी सर्वांना रेकमंड करीन हा मुव्ही.. नक्की पाहा! माझ्याकडून १० पैकी ९...

नक्की पाहणार!

भाग्यश्री, सुंदर परिक्षण केले आहेस..

जियो..!

तात्या.

आनंदयात्री's picture

24 Mar 2009 - 10:22 am | आनंदयात्री

अरे वा पहायलाच पाहिजे. तशी आम्हाला फारशी चित्रपटांची चॉईस वैगेरे नाही म्हणुन लोकांनी रिकमेंड केलेले चित्रपट आम्ही पहातो.
परिक्षण छान.

>>पुढे बर्‍याच गोष्टी घडतात.. नायक सांईटीस्ट असल्याने जरा विचार करतो..

हे वाक्य भारी .. :D

छोटा डॉन's picture

25 Mar 2009 - 7:25 am | छोटा डॉन

यात्रीशी सहमत ...
नाईट श्यामलनचा "साईन्स" हा चित्रपट पाहिल्यानंतर आम्हाला आपल्या काहीच कळत नाही न्युनगंडांने पछाडलेले होते त्यामुळे आम्ही नंतर अशा लोकांचे चित्रपट पहाणे कमी केले.
परिक्षण वाचुन एकदा जरुर पहावा असे वाटते.
उत्तम परिक्षण, आवडले ...

बाकी हा धागा जरा दुर्लक्षीतच झाला, मी आत्ता पहातो आहे, कशामुळे कुणास ठाऊन ?

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

चेतन's picture

24 Mar 2009 - 11:15 am | चेतन

कन्सेप्ट मला तरि काहितरिच वाटला. कदाचित डोक्यावरुन गेला किंवा हा पिक्चर पाहण्याआधी मी जस्ट कटिंग ऍज बघितला होता म्हणुन बोअरिंग वाटला असेल.

तरी एकदा पाहू शकता

चेतन

सुमीत's picture

24 Mar 2009 - 12:50 pm | सुमीत

पण श्यामलन चे "सिक्स्थ सेन्स" आणि " अनब्रेकेबल" नंतर इतर चित्रपट नाही आवडले.
त्या मुळे हा चित्रपट पाहीला नाही पण आता प्रयत्न करेन.

क्रान्ति's picture

24 Mar 2009 - 7:16 pm | क्रान्ति

उत्तम परिक्षण. अवश्य पाहीन.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

चकली's picture

24 Mar 2009 - 7:38 pm | चकली

नक्की बघेन
चकली
http://chakali.blogspot.com

भाग्यश्री's picture

25 Mar 2009 - 8:25 am | भाग्यश्री

सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद..
बर्‍याच जणांना आवडला नाहीये हा पिक्चर असे दिसते... :(
असो.. ज्यांनी बघितला नाहीये त्यांनी त्यांच्या जबाबदारीवर पाहणे! :)