दुसरा कुणीच नाही....

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
22 Mar 2009 - 3:29 pm

पैशापरी जवळचा दुसरा कुणीच नाही
माणूस माणसाचा झाला कधीच नाही

गणगोत आप्त सारे जमले उगाच नाही
टाळूवरील लोणी उरले(पुरले) मुळीच नाही

शमले तसेच सारे देहातले निखारे
वणव्यास पावसाची नड भासलीच नाही

काळोख तुंबलेला दाही दिशात सारा
सूर्यात आग पुरती का पेटलीच नाही

डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले
पाऊस का सखा मग झाला कधीच नाही

सरणावरी कळाले उपभोग फार झाला
उपयोग जीवनाचा केला कधीच नाही

जयश्री अंबासकर

गझलप्रकटन

प्रतिक्रिया

दशानन's picture

22 Mar 2009 - 3:34 pm | दशानन

वाह !

सुंदर कविता !

आवडली !

+१

श्रावण मोडक's picture

22 Mar 2009 - 3:36 pm | श्रावण मोडक

शमले तसेच सारे देहातले निखारे
वणव्यास पावसाची नड भासलीच नाही वा.

डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले
पाऊस का सखा मग झाला कधीच नाही छानच.

सरणावरी कळाले उपभोग फार झाला
उपयोग जीवनाचा केला कधीच नाही उपभोग, उपयोग... सुंदर.

अवलिया's picture

22 Mar 2009 - 3:36 pm | अवलिया

वा!

--अवलिया

घाटावरचे भट's picture

22 Mar 2009 - 7:36 pm | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

विसोबा खेचर's picture

22 Mar 2009 - 4:22 pm | विसोबा खेचर

वा जयू,

सुंदर काव्य..! जियो..!

आपला,
(जयूचा फ्यॅन) तात्या.

मदनबाण's picture

22 Mar 2009 - 4:36 pm | मदनबाण

फारच सुरेख... :)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

अनिल हटेला's picture

23 Mar 2009 - 2:15 pm | अनिल हटेला

सुरेख !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मीनल's picture

22 Mar 2009 - 6:35 pm | मीनल

खूप खूप छान
मीनल.

अनामिक's picture

22 Mar 2009 - 6:37 pm | अनामिक

कवितेतली ओळ अन ओळ सुंदर. खुप आवडली!

-अनामिक

प्राजु's picture

22 Mar 2009 - 7:12 pm | प्राजु

जयूताई,
जबरदस्त गझल.
नवीन आणि वेगळ्या आहेत सगळ्या कल्पना. मस्तच
शेवटचे तीन शेर तर सगळ्यात खास!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लिखाळ's picture

22 Mar 2009 - 10:49 pm | लिखाळ

सहमत आहे.
सुंदर गजल.
-- लिखाळ.

राघव's picture

23 Mar 2009 - 9:31 am | राघव

क्लास लिहिलंय!

राघव

शिप्रा's picture

24 Mar 2009 - 12:06 pm | शिप्रा

सहमत
>>सरणावरी कळाले उपभोग फार झाला
उपयोग जीवनाचा केला कधीच नाही

सुंदर लिहिले आहे...

शितल's picture

22 Mar 2009 - 8:52 pm | शितल

जयवी ताई,
सलाम तुझ्या प्रतिभेला. :)
प्रत्येक शेर सुंदर. :)

स्वाती राजेश's picture

22 Mar 2009 - 8:57 pm | स्वाती राजेश

कविता मस्त, आवडली....:)
डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले
पाऊस का सखा मग झाला कधीच नाही

खासच!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Mar 2009 - 9:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता !

सहज's picture

23 Mar 2009 - 9:25 am | सहज

शेवटचे कडवे खासच!

जयवी's picture

23 Mar 2009 - 2:11 pm | जयवी

दोस्तांनो.....इतके सुरेख अभिप्राय........ खूप खूप सुखावले.......असंच प्रेम असू द्या :)

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Mar 2009 - 4:48 pm | बिपिन कार्यकर्ते

क्ला सि क

बिपिन कार्यकर्ते

सँडी's picture

23 Mar 2009 - 4:53 pm | सँडी

वास्तववादी.

खुपच छान!

चंद्रशेखर महामुनी's picture

23 Mar 2009 - 6:19 pm | चंद्रशेखर महामुनी

गझल खुप आवड्ली.....

चेतन's picture

23 Mar 2009 - 6:54 pm | चेतन

सगळेच शेर आवडले

शेवटचा तर खासच्

चेतन

क्रान्ति's picture

23 Mar 2009 - 7:17 pm | क्रान्ति

काय बोलू? शब्द मुके झाले जयुताई! अप्रतिम!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

जयवी's picture

24 Mar 2009 - 11:39 am | जयवी

लिखाण जरी आत्मानंदासाठी असलं तरी.... कुणाला आपण लिहिलेलं आवडलं ही जाणीव फार सु़ख देते आणि तुम्ही लोकांनी ते मल भरभरुन दिलंत. मनापासून आभार लोक्स :)

जागु's picture

24 Mar 2009 - 11:50 am | जागु

जयवी खुपच छान.