सहज मनात आले. मि.पा. शी गट्टी होण्याआधीचा माझा दिनक्रम कसा होता आणि मि.पा. नंतरचा कसा आहे ह्यावर लिहायचे ..( हं म्हणजे शादीसे पहले आणि शादी के बाद या चालीवर )
आधी एका इतर मराठी संकेतस्थळावरचे लेख वाचायचो. तसे ३/४ दिवसातून एकदा ते स्थळ उघडायचो आणि जे जे काही नवे लेख आहेत ते वाचायचो, प्रतिक्रिया द्यायचो. कधीही स्वतः एक म्हणून लेख लिहीला नाही. लोकं प्रतिक्रिया देणार नाहीत असे वाटले. तसेच मराठी टंकायचा कंटाळा आणि शुद्ध लिहायची (एकही इंग्रजी शब्द नको) धास्ती. त्यामुळे त्या स्थळाशी जेमतेम ओळख झाली. पुर्वी माझा दिनक्रम असा असायचा...
(मि.पा. के पहले)
सकाळी ऑफिसमध्ये पोचल्यावर
१)सामना (महत्वाच्या बातम्या, अग्रलेख, क्रिडालेख, संझगिरींनी सचिनचे नेहमीप्रमाणे अतिकौतूक केले असलेले लेख, सचिन जरी मला आवडत असला तरी अतिकौतूक नको वाटते)
२) लोकसत्ता - अग्रलेख (सुमार केतकर किती गरळ ओततात हे पहायला), भविष्य, काही महत्वाच्या बातम्या.
३)क्वचित म.टा, सकाळ, पुढारी,
४) याहूमेल,
५) जीमेल
६) सगळ्यात शेवटी ऑफिसची मेल - कारण यानंतर काम सुरू करायचे असते.
७) दुपारी कधीतरी एखादे मराठी संकेतस्थळ, रेडिफ, शेयरबझार वगैरे.
रात्री घरी आल्यावर तूनळी किंवा ऑर्कुट किंवा एखादी फ्लॅश गेम साईट.
शनिवार/रवीवारी - घरी असलो तर साधारण असाच आंतरजालीय वेळ घालवायचो.संगणक खेळ, चित्रपट,सर्व मराठी पेपर यातच शनी/रवी निघून जायचे.
तसे इतर सुद्धा खास माहिती असलेली संकेतस्थळे बघतो पण सर्व गोष्टी येथे देणे अवघड आहे.
(मि.पा.का व्यसन लगने के बाद)
असेच एकदा कोठून तरी मि.पा. विषयी वाचले. सहज म्हणून सभासद झालो. एकदा एका लेखाला प्रतिक्रिया दिली. तेथे कोणीतरी माझी खेचली. त्याला मी प्रत्यूत्तर दिले. हळुहळू कळले सुद्दा नाही की मी कधी मि.पा.च्या आहारी गेलो. अजून जास्त लेख जरी नाही लिहिले तरी भरपूर वाचन आणि प्रतिक्रिया ( माझ्याद्रुष्टीने भरपूर) दिल्या. माझा सध्याचा दिनक्रम असा आहे.
सकाळी ऑफिसमध्ये पोचल्यावर
१)मि.पा.
२) सामना
२)लोकसत्ता .( पुर्ण वाचायचे सोडले. कधीतरी चाळतो).
३)क्वचित म.टा, सकाळ, पुढारी.
४) याहूमेल,
५) जीमेल
६) परत मि.पा. (काम सुरू करण्याआधी..पहिल्यांदा सुरू केलेली खिडकी चालूच असते आणि दिवसभर काय नवीन लेख/प्रतिक्रिया आल्या ते पहातो.)
६) सगळ्यात शेवटी ऑफिसची मेल
७) दुपारी कधीतरी दुसरे मराठी संकेतस्थळ (हल्ली मा.बो. बघतो) , रेडिफ, शेयरबझार वगैरे. दिवसभरातून १० वेळा तरी मि.पा. वर लक्ष असते.
रात्री घरी आल्यावर परत मि.पा. आणि नंतर बाकीची स्थळे. आजकाल मि.पा. मुळे संगणक खेळ खेळणे कमी झालेय.
शनिवार/रवीवारी - घरी असलो तर मि.पा. तर चालूच असते.
बर्याच वेळा असे होते की समजा एखादा दिवस बाहेर हिंडत असलो आणि मि.पा. बघायला वेळ नाही मिळाला तर चुटपूट वाटते आणि जेव्हा संगणक चालू करेन तेव्हा प्रथम मि.पा. च उघडतो.
या सर्वाचा अर्थ एकच.. मी मिपाचा व्यसनी झालो आहे. मला मि.पा. आवडण्याची काही म्हणजे कारणे ( बर्याच जणांनी आधी सांगितलेली कारणे परत देतोय)
१) शुद्धलेखनाचा आणि शुद्ध मराठीचा जाच नाही.
२) लोकांनी एकमेकांची फिरकी घेतलेली फार आवडते.
३) बरचसे सभासद ( जरी कोणाला प्रत्यक्ष भेटलो नाही) तरी आपलेसे वाटतात ते त्यांचा लेखांमुळे. काही नवे सभासद पहिल्या पहिल्या लेखातच आपल्याला जिंकून घेतात.
४) इतरांच्या ख.व. वाचून करमणूक होते. काही सभासदांना इतके लोक चांगले सल्ले देतात तरी ते सुधारत नाहीतच. तसे त्यांच्या पुढच्या लेखातच मागच्या बर्याचशा चुका आणि त्या चुका होण्याची कारणे दिसून येते. कदाचित अती सल्ल्यांमुळे त्यांना कोणाचे ऐकावे हाच प्रश्न पडला असावा. पुर्वी काहींची भांडणे वाचून करमणूक व्हायची पण आजकाल कोणाचेही वादविवाद सुरू झाले की लवकर मिटावेत असे वाटते. कदाचित या वादविवादामुळे कोणी चांगले सभासद मि.पा. सोडू नये असे वाटत असल्याने लवकर समेट घडो असे वाटते.
मुख्य कारण म्हणजे नाव मिसळपाव. कोल्हापुरी असल्याने व लहानपणापासून मि.पा. खाण्यासाठी कायमच हपापलेला असल्याने सुरुवाती सुरूवातीला या स्थळावर सारखे भेट द्यायचो आणि नंतर मग चव लागली. ज्या कोणाचे हे नाव द्यायचे डोके चालले त्याचे आभार ( तात्या तुम्हीच का ते डोकेबाज..? ) . हेच जर वडापाव किंवा शेवपुरी असे नाव असते तर इतके जास्त कदाचित मी लक्ष दिले नसते. जरी मला शेवपुरी, पाणीपुरी, वडापाव आवडत असले तरी मि.पा. इतके प्रेम कोठल्याही खाद्यपदार्थावर नाही. अजून मला या नावांची संकेतस्थळे आहेत का नाहीत हे सुद्धा माहित नाही. (हा लेख झाल्यावर शोध घेतो. ). गंमत म्हणजे मि.पा. च्या जीवावर आणखी दोन तीन स्थळे सुरू झालीत आणि त्यांची मुख्य कामे म्हणजे मि.पा.वर आणि मि.पा.करांवर शिंतोडे उडवणे. आता ही स्थळे थंड पडलीत.
जाऊ दे .. ४-५ ओळी लिहायच्या ठरवल्या होत्या. जास्तच झाल्यात. मि.पा. वरती खर्च करत असलेले आठवड्याचे तास जर कामात घातले तर कदाचित जास्त पैसे मिळतील. पण या सर्व सुखाला मुकेन. त्यामुळे मी सध्या व्यसनी जरी असलो तरी सुखी आहे.
खादाडमाऊ
प्रतिक्रिया
22 Mar 2009 - 12:42 am | विसोबा खेचर
मिपाबद्दल आपुलकीभरल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे..
बाय द वे, मिसळपाव हे नाव मलाच सुचले आहे! :)
आपला,
(कृतज्ञ आणि कृतार्थ) तात्या.
22 Mar 2009 - 1:27 am | योगी९००
खरं म्हणजे तात्या मि.पा. चालू करून इतक्याजणांशी गाठ घालून दिल्याबद्दल मीच आपला आभारी आहे.
खादाडमाऊ
22 Mar 2009 - 12:59 am | प्राची
>>मि.पा. बघायला वेळ नाही मिळाला तर चुटपूट वाटते आणि जेव्हा संगणक चालू करेन तेव्हा प्रथम मि.पा. च उघडतो.
अगदी खरे बोललात खादाडमाऊ.
लेख आवडला.:)
तात्या,तुम्हाला मिसळपाव हे नाव सुचल्याबद्दल हॅट्स ऑफ. =D> =D> =D>
22 Mar 2009 - 4:25 am | प्राजु
मिपाचे व्यसनच लागते. कित्येक लोकं माझ्या माहितीत अशी आहेत जी मिपाची सदस्य नाहीत पण नियमित वाचक आहेत. त्यांच्याही डेस्कटॉप वर मिपाची खिडकी सदानकदा उघडी असते. हा निश्चितच मिपाचे मालक आणि सभासद यांनी राखलेल्या खेळकर आणि मोकळ्या वातावरणाचा परिणाम आहे.
तुम्ही कोल्हापूरचे .... सह्ही!! मी सुद्धा.
म्हणजेच कोल्हापूरी झटका देणारी बरीच लोकं आहेत मिपावर!!!
लगे रहो!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Mar 2009 - 12:49 pm | केदार_जपान
झकास्च लेख लिवला आहे :)
मला तर तात्यांचे खास कवतिक करायाचे आहे... ;)
मिसळ्पाव हे नाव डायरेक्ट कोल्हापुरात घेउन जाते, आणि मी तर बर्याच वेळेला मिसळ्पावाचा फोटो बघयल साईट उघडुन बसतो..
फोटु लै भारी आहे ...एकदम रसरशित आणि झणझणित..
----------------------------------------
केला नाद झाला बाद!!, पंचगंगा काठ सदा ताठ!!...
(पुरेपुर कोल्हापुरी) केदार जोशी
22 Mar 2009 - 2:38 pm | दशानन
म्या बी हाय कोल्हापुरी गडी :)
22 Mar 2009 - 1:17 pm | नरेश_
साधकबाधक चर्चा अशीच चालू द्या !!
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
22 Mar 2009 - 3:18 pm | खादाड
मी नावाप्रमणे खादाड असल्यामुळे जास्तवेळा पा.क्रु. मधे डोकावत असतो .
पण रोज एकदा तरी १५-२० मि. कमीतकमी असतोच.
" लेख आवड्ला"
22 Mar 2009 - 9:31 pm | अबोल
मला मराति उपाहारग्रुहात गेल्यावर मिसळपावच खायला आवडतो, तसेच नेटवर बसायला जमलेच तर या साइटला भेट दिल्या शिवाय जमतच नाहि९
22 Mar 2009 - 10:02 pm | शब्द बापुडे
मी पण नवीन सभासद आहे. मी अजुनतरी काही लिहित नाही पण मला ही साइट खूप आवडली. मराठी टंकलेखन खूप सोपे आहे. त्यामुळे प्रतिसाद देता येतात.
*चिरविजयी*