उन्हाळ्यात प्रत्येकाच्या तोंडावर रोज एकदातरी ही वाक्य येतातच. "केवढ गरम होतय आज" रोज मध्ये हा आज असतो. "काय उन पडलय कडकडीत", "बाहेर नकोस वाटतय उन्हामुळे", "कधी संपेल हा उन्हाळा ?"
उन्हाळ्याकडे आपण ह्याच दृष्टीने बघतो. तो नकोसा वाटतो. गर्मि ने जीव हैराण होतो. खरच आहे ते. पण ह्यातले आपण फक्त अवगुणच पाहतो. पण ह्यात पण बरेच गुण आहेत. उन्हाळ्यातच मुलांना आणि आपल्याला मार्च एप्रिल पासून सुट्टीचे वेध लागतात. गावाला जायचे, फिरायला जायचे बेत आखायला सुरूवात होते. मे महीना म्हणजे काय मजेला उधाणच. मामाच्या गावाला ह्याच दिवसांत जायला मिळते. शाळेला सुट्टी मिळुन झोपेवरचे, खाण्यावरचे बंधन नाहीसे होते. मजा, मस्ती, खेळ, हुंदडण्यात ती रमुन जातात. माहेरवाशीणींना माहेरची मायेची माणस भेटतात, थोरांनाही आपली मुल, नातवंड भेटल्याचा आनंद होतो. नवर्यालाही जरा बायकोपासुन मोकळीक मिळते काही जण लांब सफरीला जातात. प्रेक्षणीय स्थळे ह्या दिवसांत आपल्याला पाहायला आलेल्या गर्दी मुळे धन्य होतात तर अनेक आजी आजोबा आपल्या परीवारा सोबत तिर्थ स्थळांना भेटी देउन धन्य होतात.
ह्याच दिवसांमध्ये बहुतांशी जिकडे तिकडे लग्न सोहळे साजरे होत असतात. लग्न घर आनंदाचे सोहळे अनुभवत असतात. नविन नाती जन्माला येतात. तरूण-तरुणी वैवाहीक बंधनात गुंततात आणि नविन स्वप्नांमध्ये तरंगत असतात. प्रेमभावना आणि प्रेम अनुभवत असतात. मोगर्याचा सुगंध ह्या दिवसांची आठवण अजरामर करुन ठेवतो.
उन्हाळ्याच्या दिवसांत निसर्गाचा उत्सव असतो. अनेक कवी पावसांवर कविता करुन त्याचे पावसाळ्याचे स्वागत करतात पण रंगपंचमी रंग उधळत उन्हाळ्याचे स्वागत करते. आमराई बहरुन येते, फळांचा राजा आंब्याचे आगमन होते, फणसाचा वास घुमू लागतो. कोकमाची झाड रसरशीत भरतात, राना वनात जांभळ, करवंद, आळू, रांजण, जाम, आवळे झाडांच्या फांदी फांदी वर डोलू लागतात.
कडक उन्ह पडायला लागली की सांसारीक बायकांची टिकवण्याचे पदार्थ बनविण्याची लगबग चालु होते. प्रत्येक अंगणात गच्चीवर पापड, कुरडया, फेण्या, शेव असे पदार्थ वाळताना दिसतात, मसाल्यांच्या गिरणिंना ह्या दिवसांत उसंत नसते. ताज्या ताज्या मसाल्याचा वास सगळीकडे दरवळत असतो. लहान मुल ही सुकवलेली आंबोशी, आवळे, फणसपोळी भर उन्हात पळवुन मजा लुटत असतात. लोणची, मुरांब्यांच्या भरलेल्या बरण्या स्वयंपाक घरात मिरवू लागतात.
ह्या दिवसात पाणी म्हणजे जीवन हा समानअर्थी शब्द अधिक तिव्रपणे पटतो. कैरीचे पन्हे, कोकम सरबत, आमरसांच्या गाड्या बाजारपेठेत तळ ठोकुन बसतात.
उन्हामुळे तप्त झाल्यामुळेच पावसाच्या पहिल्या सरीने मातीला मनमोहक सुगंध पसरतो.
प्रतिक्रिया
20 Mar 2009 - 3:04 pm | सुमीत
पावसाची गंमत, उन्हाचे चटके सोसल्या वर वाढते.
तसे आंबा चाखण्या साठी तरी उन्हाळा पाहिजेच.
21 Mar 2009 - 1:32 pm | नरेश_
प्रेक्षणीय स्थळे ह्या दिवसांत आपल्याला पाहायला आलेल्या गर्दी मुळे धन्य होतात
सहमत. ;-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
20 Mar 2009 - 3:16 pm | अमोल नागपूरकर
आम्ही लहानपणी उन्हाळ्यात अंगणात झोपत असू. मार्च महिन्यापासून ते थेट पावसाळा सुरू होइपर्यन्त ह कार्यक्रम चालत असे. मध्यरात्री अंगणातील मोगरा फुलायचा. तो मन्द सुगन्ध वीस वर्षांनन्तरसुद्धा ताजा वाटतो.
20 Mar 2009 - 3:56 pm | सँडी
उन्हाळ्याचं नाव ऐकुन आत्ताच घाम फुटला!
20 Mar 2009 - 3:56 pm | सूहास (not verified)
<<<नवर्यालाही जरा बायकोपासुन मोकळीक मिळते >>>
हे मात्र बरोबर्,माझ्या भावाच्या चेहर्यावरचा आ॑नद बर्याच वेळा पाहिला आहे,वहिनी माहेरी गेल्या की .
छान लेख !!!
आम्हाला जरा उन जास्त आवडत!!!
त्यात पुण्यात गाडीवर(हो मी अजुन गाडीच म्हणतो आणी मरोस्तवर म्हणणार) उन्हात फिरायला तर जरा जास्तच!!!माठातल थ॑डगार ताक !!!लि॑बुपाणी !!! रात्रीच गच्चीवर झोपण !!!मग चालु होतो कॅरम कट्टा!!!अहाहा!!
चा॑गल्या आठवणी जाग्या केल्यात,
धन्यवाद @१००% $
सुहास..
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
20 Mar 2009 - 4:46 pm | राजा
आम्हाला हि खुप वाटते अंगणात झोपावे पण नविनच लग्न झाल्यामुळे जमत नाहि.
अवांतर- अंगणात खुप मछर आहेत व आम्हाला मच्छरदाणित झोप येत नहि.
20 Mar 2009 - 7:42 pm | शिवापा
पितात सारे गोड हिवाळा सारखी उन्हाळ्यावर कविता कधि वाचली नाहि. कोणितरी ट्राय करा ना रे!
20 Mar 2009 - 10:46 pm | क्रान्ति
लेख वाचून भर उन्हाळ्यात गारवा [तोही कूलर न लावता] मिळाला. छान लिहिलाय.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
21 Mar 2009 - 12:02 pm | जागु
सुमित, अमोल, सँडी, सुहास, राजा, शिवापा,क्रांती तुमचे मनापासुन खुप धन्यवाद.
21 Mar 2009 - 1:57 pm | आनंदयात्री
छान लिखाण जागु.