<अस्वस्थ मन!>

मराठमोळा's picture
मराठमोळा in जे न देखे रवी...
18 Mar 2009 - 10:21 pm

प्रेरणा: प्रेरणा यांची "मन" ही कविता..
काय करु आज विडंबनाची हुक्की आली.. ह. घ्या.

कधी सकाळी उगाच पोट दुखुन येतं..
टाकीतलं पाणी नेमकं तेव्हाच आटुन जातं..

पाण्याची जाण, फक्त, कोरडा नळ देतो!
तेव्हा फक्त टिश्यु पेपर मदत करु पाहतो..

थरारलेल्या क्षणांमागे मन जाऊन लपतं..
ते क्षण सरले की मग खुद्कन हसतं!

काल काय खाल्ले मन पुन्हा उकलू पाहतं..
पुन्हा असे खायचे नाही, वेडं, शपथ घेउन जातं!

भरलेल्या ताटावरती पुन्हा फिरून येतं..
थरारलेले क्षण पुन्हा विसरुन जातं..

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

नरेश_'s picture

18 Mar 2009 - 10:30 pm | नरेश_

आयला, एवढं मस्त विडंबन कसे काय करतात देव जाणे.
तुमच्याकडे विडंबनं पाडायचा साचा आहे की काय ;-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

पिवळा डांबिस's picture

19 Mar 2009 - 4:23 am | पिवळा डांबिस

आज हे काय?
विडंबन झालंय मस्तच...
पण,
एकदम पु. भा. भाव्यांनी वि. आ. बुवांचं पेन ढापून लिहायला सुरवात केल्यासारखं वाटलं...
:)
एनिवे, विडंबन्-क्लबमध्ये हार्दिक स्वागत!!

सँडी's picture

19 Mar 2009 - 6:32 am | सँडी

थरारलेले क्षण
=)) लै भारी! चालु द्या!

अनिल हटेला's picture

19 Mar 2009 - 9:18 am | अनिल हटेला

>>>थरारलेले क्षण =))

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्राजु's picture

19 Mar 2009 - 7:31 am | प्राजु

इतकी वेळ येईपर्यंत मिपावर पडीक राहू नये आणि राहिलं तरी मग पाकृ विभागात डोकावू नये.. आणि डोकावलं तरी फ्लॉवर मटार करंज्या, कानडी सागू, कोलंबी-शेवगा, चिकन -सुरणाचे वडे, कचोर्‍या, लज्जतदार मका, खजुराचे लाडू.... असं सगळं एकदम खाऊ नये. मग अजिर्ण होतं. (ह. घ्यालच ) :)
असो.. विडंबन एकदम जबरा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अवलिया's picture

19 Mar 2009 - 9:09 am | अवलिया

बापरे !!! तुम्ही पण? :O
वा ! विडंबकांच्या भाउगर्दीत तुमचे हार्दिक स्वागत... :)
विडंबन चांगले जमले आहे... प्राजुताईंचा सल्ला घ्या मनावार ;)

--अवलिया

क्रान्ति's picture

19 Mar 2009 - 9:58 pm | क्रान्ति

;;) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}