<तुझ्या नशेविना>

मराठमोळा's picture
मराठमोळा in जे न देखे रवी...
18 Mar 2009 - 8:32 pm

प्रेरणा : शिवापा यांची "तुझ्या दु:खाविना" ही कविता

अजुन किती वेळ जाईल?
तुझी नशा कुठपर्यंत राहिल?
रात्र संपलीय पण हँगओव्हर छळतोय
नशेत झिंगल्यागत मी अजुन चालतोय
कुठलाच विचार येत नाहि तुझ्या नशेविना

अवचित फुटलेला ग्लास काळजाचे ठोके चुकवतो
टेबलावरचा प्रत्येक प्याला तुझाच भासतो
प्रत्येक रात्री वाट पहात राहतो बाटलीची
झोपही येत नाहि तुझ्या नशेविना

जाग आल्यावर लिंबु सोड्यासाठी घसा आसुसतो
तुझी नशा उतरल्यावर एकदम बावरतो
कधितरी थांबेलच पिणं, झिंगणं हे सर्व
हँगओव्हरचे हेहि संपेल पर्व

बेवड्यांच्या रांगेत पुढे सरकतांना
बार बंद व्हायची वेळ आली हे कळताना
पिणे सोडणे तेव्हढेसे कठिण रहाणार नाहि
अवेळी प्यायची ईच्छा ही होणार नाहि

तुझी आठवण तेव्हांहि येईल
पण तुझ्या नशेविना

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

सूहास's picture

18 Mar 2009 - 8:35 pm | सूहास (not verified)

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

शिवापा's picture

18 Mar 2009 - 9:37 pm | शिवापा

भो खरचं सांगतो
मीच तुझं विडंबन केलं है का काय असं वाटुन राह्यलय. पण लय भारी

मराठमोळा's picture

18 Mar 2009 - 9:49 pm | मराठमोळा

विडंबन हलकेच घेतल्याबद्दल!!!

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!