मन!

प्रेरणा's picture
प्रेरणा in जे न देखे रवी...
18 Mar 2009 - 4:17 pm

कधी जुन्या आठवांनी मन भरून येतं..
शुभ्र काळ्या ढगांनी आभाळ दाटून येतं..

पावसाची जाण, फक्त, वैशाखाचं रान देतं!
सोबतीला आषाढाची ओल धरून येतं..

भारलेल्या क्षणांमागे पुन्हा जाऊ बघतं..
झुळुकीवरती कळीसारखं हळूच फ़ुलून येतं!

नात्यांची वीण जरा पुन्हा उकलू पाहतं..
निसटलेली रेती, वेडं, पुन्हा धरु जातं!

जुन्या जुन्या वाटांवरती पुन्हा फिरून येतं..
सरलेले दिवस जरा पुन्हा जगून येतं..

प्रेरणा

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

18 Mar 2009 - 4:37 pm | श्रावण मोडक

जमलीये कविता.

क्रान्ति's picture

18 Mar 2009 - 8:23 pm | क्रान्ति

सुरेख आहे कविता. सगळ्याच ओळी मनाला भावतात.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

18 Mar 2009 - 9:16 pm | प्राजु

प्रत्येक शेर खास आहे.

नात्यांची वीण जरा पुन्हा उकलू पाहतं..
निसटलेली रेती, वेडं, पुन्हा धरु जातं!

मस्तच.

मन तरंग होऊन पाण्यवरती फिरते
अन क्षणात फिरूनी आभाळाला भिडते..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शिवापा's picture

18 Mar 2009 - 10:13 pm | शिवापा

सरलेले दिवस जरा पुन्हा जगून येतं..

केवळ सुरे़ख