नमस्कार मिपाकर,
खालील शास्त्रीय प्रयोग करण्यास मदत हवी आहे.
शेवटच्या क्षणी बहीणीच्या मुलाने विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्याचे ठरवले. भाच्याला प्रयोग करण्याकरीता काही उमेदवार मिळाले. पण तरीही संख्या खूप कमी आहे. (जेमतेम १०-१२) . जर मिपाकरांनी खालील प्रमाणे चाचण्या घेऊन आपली निरिक्षणे नोंदवली तर प्रयोगासाठी खूप मदत होईल.
प्रयोग - खाली दिलेल्या चित्रातील रंग ओळखून प्रत्येक चाचणी देण्यासाठी किती वेळ लागतो , चाचणी देणार्याचे वय आणि स्त्री कि पुरूष हे नमूद करायचे आहे. शब्दांचा फक्त रंग ओळखायचा आहे. शब्द वाचायचे नाहीत. रंग मोठ्याने म्हणायचे. चुकले तरी चाचणी न थांबवता चूक सुधारून चाचणी पूर्ण करायची.
निरिक्षणे पुढिलप्रमाणे नोंदवायची आहेत.
चाचणी १ चा वेळ (सेकंद मध्ये), चाचणी २ चा वेळ , चाचणी ३ चा वेळ , वय, स्त्री कि पुरूष
खरोखरीचे (ऍक्च्यूअल) वय न सांगता वयाची रेंज सांगितली तरी चालेल . जसे १० -२० वर्ष , २०-४० , ४०-६० , ६० च्या पुढे.
वाचन न येणार्या पण रंग सांगू शकणार्या लहान मुलांना या चाचण्या पूर्ण करण्यासाठी प्रौंढांपेक्षा कमी वेळ लागतो असा एक अंदाज आहे . आपल्या घरात लहान मुले असतील तर त्यांचीही निरिक्षणे नोंदवल्यास ती माहिती उपयोगी पडेल.
आता सध्या खूप घाईत असल्याने या प्रयोगाबद्द्ल १-२ दिवसात लिहीनच. सर्वांचे मनःपूर्वक आभार.
प्रतिक्रिया
18 Mar 2009 - 12:33 am | लिखाळ
नमस्कार,
प्रयोग मजेदार आहे. या आधीसुद्धा या तर्हेचे प्रयोग पाहिले आहेत.
मला
चाचणी १ = १३ सेकंद
चाचणी २ = २४ सेकंद
चाचणी ३ = १६ सेकंद
असा वेळ लागला.
निरिक्षणे -
१. मी या चाचण्या इंग्रजी मधून शब्द उच्चारुन दिल्या. त्यामुळे पहिली चाचणी फार सहज झाली. (शब्द इंग्रजी असल्याने.)
२. दुसर्या चाचणीच्या वेळी वरील रंगांमधील गुलाबी सदृष रंगासाठी नक्की शब्द कोणता वापरावा अशी शंका आल्याने आवंकलो आणि निष्कारण वेळ गेला. (चाचणीमध्ये अक्षराचा ठसा महत्त्वाचा की रंगाचा मह्त्त्वाचा हाच उद्देश असेल त्यामुळे तो थोडा साध्यही झाला. पण रंग सहज ओळखण्याजोगा असता तर तो वेळ वाचला असता. प्रत्येकाच्या मॉनिटरवर अश्या रंगछटा थोड्या वेगळ्या दिसणार. रंगांधळे लोक काळा की निळा हा विचार करत बसणार :))
३. तीसरी चाचणी सोपी झाली कारण रंग आणि त्यांची नावे ओळखीची झाली होती. :)
४. हीच चाचणी जर मराठी रंगांची नावे घेऊन घेतली तर पहिल्या चाचणीला वेळ लागतो कारण इंग्रजी शब्द समोर दिसत असतो.
चाचणी मजेदार आहे.
-- लिखाळ.
आपण वय आणि स्त्री की पुरुष असे विचारले आहे. अशी माहिती संकेतस्थळावर देणे सर्वच लोक पसंत करतील असे नाही.
तो अंदाज आपल्याच बांधावा लागेल असे दिसते.
18 Mar 2009 - 1:26 am | वेलदोडा
आतापर्यंत चाचणी दिलेल्यांचे खूप धन्यवाद
लिखाळ म्हणतात त्याप्रमाणे वय आणि स्त्री की पुरुष अशी माहिती संकेतस्थळावर देणे सर्वच लोक पसंत करतील असे नाही.
त्यास मी सहमत आहे.
स्त्री की पुरुष हा अंदाज मी बांधू शकेन. फक्त खरोखरीचे (ऍक्च्यूअल) वय न सांगता वयाची रेंज सांगितली तर प्रयोगावरून निष्कर्ष काढणे सोपे जाईल. जसे १० -२० वर्ष , २०-४० , ४०-६० , ६० च्या पुढे.
व्य. नी केलात तरी चालेल. पण वयाची रेंज कळणे जरूरी आहे. धन्यवाद.
18 Mar 2009 - 12:41 am | अनामिक
मजेदार प्रयोग आहे... दुसर्या चाचणीत एकदा चूक झालीच!
चाचणी १ = १२ सेकंद
चाचणी २ = १६ सेकंद
चाचणी ३ = १३ सेकंद
(अगदी घाईत वाचलेले नाही.)
-अनामिक
18 Mar 2009 - 12:45 am | टिउ
चाचणी १ = १२ सेकंद
चाचणी २ = १७ सेकंद
चाचणी ३ = १६ सेकंद
दुसर्या चाचणीत क्षणभर गोंधळ झाला. मग वाचायचं नाही. फक्त बघायचं असं ठरवलं. तिसर्या चाचणीत चुक होउ नये म्हणुन वेग कमी केला. नाहीतर अजुन लवकर झालं असतं कदाचीत.
18 Mar 2009 - 1:01 am | बिपिन कार्यकर्ते
मजेदार चाचण्या!!!
चाचणी १ - १३.९३
चाचणी २ - २०.८९
चाचणी ३ - १५.१९
बिपिन कार्यकर्ते
18 Mar 2009 - 1:04 am | प्राजु
पहिली चाचणी = १२ सेकंद
दुसरी चाचणी = २५ सेकंद
तिसरी चाचणी = १३ सेकंद
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Mar 2009 - 1:33 am | धनंजय
१) १२.८३
२) १५.९८
३) १३.६७
वरील आकड्यांत शतंशाचा अंक निरर्थक आहे - स्टॉप्वॉचची बटणे दाबायला सेकंदाच्या दशांशापेक्षा अधिक वेळेचे कमीअधिक होईलच. पण स्टॉपवॉच शतांशात वेळ दाखवते, म्हणून बिपिनदासारखी शतांशात वेळ दिलेली आहे.
आता हा प्रयोग मराठीत शब्द वाचून करायला हवा.
मराठीत "नारंगी" हा शब्द सुरुवातीला अडखळला म्हणून पुढीलप्रमाणे
१) १४.९० (येथे इंग्रजी शब्द मुद्दामून बाजूला सारून मराठी शब्द मनात आणण्यात झालेला त्रस जाणवला.)
२) १६.०४ (नारंगी वर अडखळलो, नाहीतर ०.५-१ सेकंद वाचला असता)
३) १२.९८ (आतापर्यंत सर्व रंगासाठीचे शब्द पटकन आठवू लागले होते.)
द्वैभाषिकांकडून ही चाचणी करून घेतल्यास काही नवीन निष्कर्ष निघू शकतील. तुमच्या भाच्याकडून अनपेक्षित असे मूलभूत (ओरिजिनल) संशोधन होईल!
या स्ट्रूप रंग-शब्द चाचणीबद्दल अधिक माहिती येथे (दुवा) मिळू शकेल.
18 Mar 2009 - 1:25 am | चतुरंग
चाचणी - वेळ (सेकंद) - निरीक्षण
१ - ९ - ह्या चाचणीत रंग आणि शब्द ह्याची जोडी जमलेली असल्याने चाचणी सहज पूर्ण झाली.
२ - २० - इथे रंग आणि रंगांचीच नावे असलेले शब्द विजोड असल्याने आणि विचाराला वेळ लागला.
३ - १७ - इथे रंग आणि शब्द ह्यांचा अर्थाअर्थी काही संबंध नसल्याने आणि फक्त रंगच बघायचाय ही मेंदूची धारणा पक्की झाल्याने चाचणी किंचित लवकर संपली.
रंग, रंगाचे नाव दर्शवणारा शब्द आणि इतर सर्वसाधारण शब्द ह्यातले साहचर्य आणि त्याचा मोजणीच्या कालमापनावर होणारा थेट परिणाम मजेदार आहे! :)
चतुरंग
18 Mar 2009 - 7:01 am | पक्या
मजेदार चाचण्या
माझा वेळ पुढीलप्रमाणे
चाचणी १ - ७
चाचणी २ - १४
चाचणी ३ - १३
वय - २०-४० मध्ये
रंग जसे वर दिलेत तसेच (इंग्लीश मध्येच) म्हटले. त्यामुळे चाचणी १ ला कमी वेळ लागला.
18 Mar 2009 - 7:02 am | छोटा डॉन
नमस्कार वेलदोडाशेठ,
सकाळी सकाळी हा प्रयोग करुन पाहिला ( तो करताना मित्र हसत होते पण तो भाग वेगळा ;) , प्रयोग निश्चितच मजेदार आहे. या आधीसुद्धा या तर्हेचे प्रयोग कधीही केला नव्हता त्यामुळे ह्यावेळी जरा उत्सुकता होती ...
चाचणी १ = १२.३६ सेकंद
चाचणी २ = १६.५९ सेकंद
चाचणी ३ = १३.६२ सेकंद
वय : २४ वर्षे , पुरुष ...!!!
मात्र प्रयोग करताना "नारिंगी" ह्या रंगाला ऑरेंज हा शब्द न वापरता मी प्रतिक्षिप्तक्रियेने "सॅफ्रन" हा शब्द वापरला ...
प्रयोग २ : १ चुक झाली होती पण ती लगेच लक्षात आल्याने पुढच्या चुका टाळता आल्या. जिथे "रेड" ह शब्द "पर्पल" ह्या रंगात लिहला आहे तिथे गडाबड झाली होती. नंतर मात्र ही चुक झाली नाही. ...
मात्र मज्जा आली हे जरुर नमुद करतो ....
ह्या चाचणीअंतीचे निष्कर्ष वाचायला आवडतील, आम्ही शक्य ती सर्व माहिती दिल्याने आपला अंदाज काय आहे हे जरुर कळवा, आम्ही वाट पहातो आहोत ...
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
18 Mar 2009 - 10:41 am | नितिन थत्ते
आमच्या ऑफिसमध्ये इमेजेस ब्लॉक्ड असतात म्हणून चाचनी देता आली नाही. रात्री बाहेरून प्रयत्न करीन.
अवांतरः या चाचणीचा उद्देश काय ते कळले नाही. म्हणजे मी चुकीचा रंग वाचला आणि तो चुकीचा आहे हे मला कळलेच नाही (हा गुलाबी नै कै, राणी कलर आहे) तर चाचणी लवकर संपू शकते. अर्थात चित्रे बघितलेलीच नाहीत त्यामुळे चाचणी नेमकी काय आहे तेच कळलेले नाही.
खराटा
(रंग माझा वेगळा)
18 Mar 2009 - 11:18 am | सुप्रिया
चाचणी १ - १५ सेकंद
चाचणी २ - १९ सेकंद
चाचणी ३ - १६ सेकंद
वयोगट - २० ते ४० स्त्री
18 Mar 2009 - 11:20 am | मुक्ता २०
फारच मजेदार चाचण्या होत्या..! :)
निष्कर्ष
चाचणी १: ८ से.
चाचणी २: १५ से.
चाचणी ३: ११ से.
वयोगटः २०-४०, स्त्री.
निष्कर्ष नक्की कळवा. :)
18 Mar 2009 - 1:20 pm | सुमीत
चाचणी १: ७.८९
चाचणी २: १५.५८
चाचणी ३: ११.४१
२९ वर्ष, पुरुष.
निष्कर्ष समजून घ्यायला आवडेल, नक्की कळवा
18 Mar 2009 - 1:22 pm | सुमीत भातखंडे
चाचणी १ - ६ से.
चाचणी २ - १३ से.
चाचणी ३ - ८ से.
वयः २५ वर्षे , पुरुष.
खरंच मजा आली.
निष्कर्ष वाचायला आवडतील.
18 Mar 2009 - 1:36 pm | पंकज
चाचणी १ - ०६.८ से.
चाचणी २ - १७.३ से.
चाचणी ३ - १४.८ से.
वयः ३१ वर्षे , पुरुष.
18 Mar 2009 - 1:54 pm | स्मिता श्रीपाद
मी दुसर्या आणि तिसर्या चाचणीत एकदा एकदा चुकीचं वाचलं..म्हणजे रंग वाचण्याऐवजी शब्द...
पण मज्जा आली.... :-)
पहिली चाचणी = ८ सेकंद
दुसरी चाचणी = १५ सेकंद
तिसरी चाचणी = १२ सेकंद
वयोगटः २०-४०, स्त्री.
-स्मिता
18 Mar 2009 - 2:30 pm | गणपा
पहिल्या दोन चाचण्या काही वर्षांमागे एका ई-पत्रातुन आल्या होत्या, त्यामुळे अंदाज होता.
तिसरी चाचणी मात्र नविनच होती. पण ती दुसर्या चाचणी पेक्षा सोपी वाटली.
चाचणी १ - ८.४ से.
चाचणी २ - १८.३२ से.
चाचणी ३ - १५.४५ से.
वयः ३३ वर्षे , पुरुष.
-गणपा.
18 Mar 2009 - 3:09 pm | सँडी
मजा आली! बाजुवाली पहात होती, पण लक्ष अजिबात विचलीत नाही होऊ दिलं!
हे ह्या माझे निकाल!
चाचणी १ - ८ सेकंद
चाचणी २ - १५ सेकंद (एकदा धडपड्लो होतो!)
चाचणी ३ - १४ सेकंद (एक चुकलं होतं)
वयः २७ वर्षे, पुरुष.
अवांतर : अहो वेलदोडा(वयानुसार भौ, काका, मामा, दादा), चाचण्या, परिक्षा म्हट्ले कि डोक्याची लागते...पण आपल्या भाच्यासाठी आहे, मग तर करायलाच पाहिजे!
त्यात तुम्ही घाईत "सर्वांचे मनःपूर्वक आभार." मानले, मी ते चाचणी चांगली दिल्याच्या खुशीत आणि माझ्या घाईत "स्वत:चे मनःपूर्वक आभार." वाचले! :)
असो, भाच्याला शुभेच्चा!
प्रगती पुस्तक पाठ्वा!
18 Mar 2009 - 3:32 pm | सहज
फक्त मराठीत किंवा फक्त इंग्रजी मधे रंगाचा उच्चार करायला अवघड गेले. खिचडी होत होती.
सुरवातीला अडखळलो पण थोड्या सरावाने जमले.
चाचणी १ - १२ सेकंद
चाचणी २ - १७ सेकंद
चाचणी ३ - १२ सेकंद
18 Mar 2009 - 4:26 pm | राघव
छान चाचणी :)
पुरूष, ३०.
चाचणी १ - ०९ सेकंद
चाचणी २ - १२ सेकंद
चाचणी ३ - ११ सेकंद
राघव
18 Mar 2009 - 7:11 pm | सागर
चाचणी १ = ७ सेकंद
चाचणी २ = १२ सेकंद
चाचणी ३ = ११ सेकंद
टेक्स्ट न वाचता डायरेक्ट रंग व्हिजुअलाईज केला तर चाचणी सोपी होते... :)
18 Mar 2009 - 8:40 pm | क्रान्ति
मजेदार चाचण्या आहेत.
चाचणी १ = १० सेकंद
चाचणी २ = १७ सेकंद
चाचणी ३ = १५ सेकंद
४०-६० स्त्री
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
18 Mar 2009 - 10:54 pm | श्रावण मोडक
चाचणी १ - ११.४० सेकंद
चाचणी २ - १६.८६ सेकंद
चाचणी ३ - १२.१२ सेकंद
रंगांचा शब्दोच्चार मराठीत.
एकाही चाचणी चूक नाही. पण संथपणे रंगांचा उच्चार.
अर्थातच, वर धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे पायवाटेवर चालत शतांशांत नोंद.
पुरूष, ४०.
24 Mar 2009 - 3:10 am | अश्विनीका
वेलदोडांच्या वतीने इथे लिहीत आहे.
चाचणी दिलेल्या सर्व मिपाकरांचे वेलदोड्यांकडून धन्यवाद.
स्ट्रूप इफेक्ट हा प्रयोग चांगला झाला. विज्ञान जत्रेत भाग घेतलेल्या सर्व मुलांना प्रशस्तिपत्रक मिळाले. विजेता न. १ , न. २ असा काही प्रकार नव्हता.
स्ट्रुप नावाच्या माणसाने १९३० च्या दशकात यावर संशोधन केले. म्हणुन त्यांचे नाव या टेस्ट ला देण्यात आले.
वाचन हि मेंदूसाठी सहज क्रिया आहे पण रंग ओळखणे हि नियंत्रीत क्रिया आहे. त्यामुळे चाचणी २ ला चाचंणी १ पेक्षा निश्चितच वेळ लागतो. आता प्रयोगासाठी मुख्य प्रश्न होता की Does age and gender affect Stroop Effect Test?
एकूण ४० लोकांच्या ( २० पुरूष आणि २० स्रीया ) चाचण्या घेऊन त्यावर आधारीत निष्कर्ष काढले. यात १५ मिपाकरांच्या चाचणीचे निकाल वापरले. ज्या मिपाकरांनी वय सांगितले होते त्यांचे निकाल वापरले.
चाचणी २ - चाचणी १ = किती जास्त वेळ ...(चाचणी १ पेक्षा चाचणी २ पूर्ण करायला. )
यावरून पुरषांना व स्त्रीयांना लागलेला सरासरी जास्तीचा वेळ काढला. तो आला ८.१४ सेकंद स्त्रियांना आणि ८.३५ सेकंद पुरषांना.
वयाच्या बाबतीत ५-१० , ११-२० , २१-३० , ३१-४० , ४१-६० , ६० च्या पुढे अशी विभागणी केली. त्यांना लागलेला सरासरी जास्तिचा वेळ अनुक्रमे पुढीलप्रमाणे ८.४० , - (११-२० ह्या वयोगटात कोणीच नव्हते), ५.८२, ९.३१, ९.००, १५.०० सेकंद.
ह्यावरून असे अनुमान काढले की वयाचा स्ट्रूप टेस्ट वर निश्चितच परिणाम होतो. वय वाढत गेले की चाचणी २ - चाचणी १ हा फरक वाढत जातो. स्री पुरूषांमध्ये स्त्रीयांना कमी वेळ लागला. पण ८.३५ - ८.१४ हा फरक खुपच कमी असल्याने जेंडर चा स्ट्रूप टेस्ट वर ढळढळीत परिणाम होतो कि नाहि ते सांगता येणार नाही. चाचणी घेण्यासाठी सॅम्पल साइज (उमेदवारांची संख्या) अजून मोठा घेतल्यास निष्कर्ष बदलतो का ते तपासावे लागेल.
अधिक माहितीसाठी http://www.snre.umich.edu/eplab/demos/st0/stroopdesc.html
http://www.juliantrubin.com/encyclopedia/psychology/stroop_effect.html
स्ट्रुप इफेक्ट टेस्ट चे बरेच क्लिनिकल उपयोग आहेत. मुख्यत्वे ADHD (Attention Deficit Hyperactive Syndrom) च्या पेशंट्सची ही टेस्ट घेण्यात येते.
24 Mar 2009 - 5:12 am | धनंजय
श्री. वेलदोडा यांच्या भाच्याचे अभिनंदन!
24 Mar 2009 - 10:55 am | श्रावण मोडक
धन्यवाद आणि अभिनंदन.
24 Mar 2009 - 6:42 am | सँडी
आपले धन्यवाद! भाच्याला नविन संशोधनासाठी शुभेच्छा!
24 Mar 2009 - 11:02 am | वेताळ
१---८
२---१८
३---१४
धन्यवाद
वेताळ